… अन नारळात पाणी

‘ देवाची करणी अन नारळात पाणी ‘ ही म्हण आपण कायमच ऐकत आलोय . नारळातलं हे पाणी खरोखरच अत्यंत गुणकारी असतं . उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी त्यासारखा दुसरा उपाय नाही .

समुद्रकिनारी वाढूनही सागराच्या पाण्याचा खारट गुण अंगी न ठेवता नारळाचं झाड नारळपाण्याच्या स्वरुपात सर्वांना अंतरंगीचा गोडवा देत असतं . कोणतंही कृत्रिम पॅकिंग , प्रिझर्व्हेटिव्ह न टाकता नैसर्गिक टेट्रा पॅकिंग असणारं शहाळं सहज साठवता येते . त्यासाठी फ्रिजची अथवा वरुन साखर किंवा रंग टाकण्याची आवश्यकता नसते . निसर्गाची करणी व नारळात पाणी या उक्तीनुसार आश्चर्यकारी औषध गुणधर्माचा लाभ नारळपाणी सेवनाने मिळतो .

[ad name=”HTML”]

शहाळ्याचं पाणी

नारळाच्या फुलाचं फलधारणेत रुपांतर होत असताना काही पुष्पद्रवाचे पाव भाग खोबरं तर उरलेल्या भागापासून नारळपाण्याची उत्पत्ती होते . यात साधारणतः तीन टक्के इतक्या अल्प प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं . क्षार , पोटॅशिअम , मॅग्नेशिअम , लोह अल्प प्रमाणात ‘ क ‘ जीवनसत्व हा साठा शहाळ्याच्या पाण्याद्वारे प्राप्त होतो . तीन स्तरांचं नैसर्गिक पॅकींग असल्याने कायम ताजं पाणी , कोणतेही कृत्रिम रंग , साखर , विषद्रव्यं मिश्रित न करता उष्म्यापासून संरक्षण करणारे नैसर्गिक पेय आहे . एप्रिल ते मे महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे येणारा थकवा , घामाद्वारे होणारा जीवनाश्यक घटकांचा ऱ्हास , उन्हाळी लागणं , मुत्र – योनीमार्गाची जळजळ होणं , शोष ( वारंवार तहान लागणे ), घशाला कोरड पडणे , किडनीस्टोन यासारख्या लक्षणांमध्ये शहाळ्याचे पाणी सेवन केल्यानंतर शरीरातील जलांश भरुन निघतो व त्याचा समतोल राखला जातो . मानसिक श्रमामुळे येणारा थकवा असल्यास मधासोबत नारळपाणी प्यावं . डिहायड्रेशन , उष्माघाताची विविध लक्षणं दिसल्यास तात्काळ नारळपाणी प्यावं . तसे केल्यास क्षणभरात सलाईनइतकी ताकद मिळते . मलईसोबत नारळपाणी म्हणजे शरीरासोबत मनासाठीही आल्हाददायक , प्रसन्नकर आरोग्यदायी चिकित्सा असते .

[ad name=”HTML”]

किडनीचे विकार असणारे रुग्ण , सर्दी , खोकला , दमा ( कफ विकृती , हृदयविकाराची अवस्था असणाऱ्या व्यक्तीनं वैद्यांच्या मार्गदर्शनानं नारळपाणी प्यावं . शक्यतो दुपारच्या वेळेस शहाळ्याचं पाणी पिणं उत्तम मानलं जातं . क्षणात तरतरी , जगण्याचा आनंद उत्साह देणाऱ्या नारळपाण्याचं कालांतराने मलईत रुपांतर होते . मलईचे खोबऱ्यात रुपांतर होत असताना पाणी कमी होऊन शेवटी खोबरं शिल्लक राहतं . त्या रुपांतराच्या अवस्थेत नारळाच्या गुणधर्मामध्ये थोडेफार बदल दिसतात . नारळपाण्यासोबत मलई , खोबरं , काथ्या , करवंटी , खोबरेतेल या प्रत्येक उत्पादनाचा उपयोग मानव कल्याणासाठी केला जातो . गर्भस्थ बालकाचा रंग उजळण्यासाठी नियमितपणे नारळपाणी किंवा नारळफुलांचा रस लिंबु सरबतासोबत मध टाकून पिणे . म्हणजे उत्तम लाभ होतो असा अनुभव आहे . अकाली येणारं वार्धक्य , चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या , त्वचा निस्तेज दिसल्यास हलक्या हाताने नारळाची मलई चोळावी . त्यामुळे त्वचा सतेज , टवटवीत दिसू लागते . नारळाच्या दुधात आमसूल टाकून केलेली सोलकढी प्यायल्यामुळे मसालेदार मांसाहाराचे सर्व दुष्परिणाम दूर होतात . सोलकढी उत्तम पित्तशामक असते . नारळाचं दूध पिऊन तासाच्या अंतराने एरंडतेलाचं रेचन घेतल्यास सुत्रकृमी हा जंत प्रकार कमी होतो . पोटातील आग कमी होऊन , मांसशक्ती वाढविणारे पौष्टिक ओलं खोबरं नियमित आहारात ठेवावे . प्रसुत स्त्रीने बालकासाठी स्तन्य चांगल्या मात्रेत यावे म्हणून खसखस , आळीवासोबत ओल्या नारळाची खीर खावी म्हणजे दुधाचं प्रमाण चांगल्याप्रकारे वाढतं . सतत ‘ एसी ‘ च्या संपर्कामुळे त्वचा रुक्ष बनते . अशावेळी सर्व अंगाला खोबरेतेलाने मालिश केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते , वर्ण उजळतो , सांधेदुखी लांब राहते . कडकडून गरम केलेल्या खोबरेतेलात लसणाची एक पाकळी ठेचून सोडावी . उरलेले तेल कानात टाकल्यास ठणक , वेदना कमी होतात . नाकात खोबरेतेलाचा बोट लावल्याने हवा , धुळ , प्रदूषणाची अॅलर्जी होत नाही . केसांच्या मुळाशी तेल जिरविल्यामुळे मुळासकट केस बळकट व काळे राहतात . लहान बालकास टाळू भरण्यासाठी तसंच अभ्यंगस्नानासाठी खोबरेतेलाचा वापर करावा . नारळापासून मिळणाऱ्या काथ्याची राख जखमेवर लेप करुन लावणं किंवा त्याची धुरी करावी . जास्त प्रमाणात रजःस्त्राव होणे या विकारात खडीसाखरेसोबत काथ्याचं सुक्ष्मतम चुर्ण सेवन करावं . खरुज , गजकर्ण , नायटा या विकारात करवंटीचं तेल जिरवावं .

[ad name=”HTML”]

कृत्रिम शीतपेयांचा मोह टाळून नैसर्गिक कोल्ड आणि हेल्थ ड्रिंक असणाऱ्या नारळपाण्याचा आस्वाद प्रत्येकाने घ्यावा म्हणजे आर्यु व आरोग्याला लाभ होतो .

Leave a Reply