उन्हाळ्यात घ्या केसांची काळजी

ड्रायरमुळे केसांना जेवढं नुकसान पोहोचतं, तेवढंच नुकसान सूर्यप्रकाशामुळेही पोहोचतं. या सूर्यप्रकाशात केसांची काळजी कशी घ्यायची याच्या या काही टिप्स

…………………..

उन्हाळा म्हणजे सुट्टी, आराम. आरामाच्या या दिवसांत कुठे ना कुठे फिरणं होतच असतं. प्रचंड उन्हात फिरण्यामुळे आरोग्याच्या, त्वचेच्या समस्या उद्भवत असतात, तसंच केसांच्याही समस्या उद्भवू शकतात. सूर्यप्रकाशाची प्रखर किरणं आणि त्यातील अल्ट्रा व्हॉयलेट रेज (अतीनील किरणं) यामुळे केसांवर दुष्परिणाम होतो. काही वेळेस तर केसांचं आरोग्य सुधारण्यापलीकडे जातं.

उन्हाळ्यात फक्त त्वचेला घाम येतो, असं नाही तर डोक्यातही येतो. घाम आलेले केस सूर्यकिरणं/उष्णतेमुळे सुकतात. केस तसेच सुकले, तरी केसांचं आरोग्य नक्कीच यामुळे बिघडतं. हेअर ड्रायर केसांवर फिरवल्यामुळे केसांचं जेवढं नुकसान होतं, तेवढंच नुकसान सूर्यकिरणांमुळेही होत असतं. सूर्यप्रकाश, हवेतील आर्दता यांच्या परिणामामुळे केस रुक्ष, कोरडे होतात, तसंच त्यांना फाटे फुटतात. एकंदरच काय, तर केस डॅमेज होतात. म्हणूनच उन्हात बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात :

– घराबाहेर पडताना, समुदकिनाऱ्यावर फिरताना डोक्यावर टोपी घालायला विसरु नका. यामुळे केस आणि डोक्यातील त्वचा (स्काल्प) सनबर्नपासून वाचू शकतात.

– डॅमेज झालेल्या केसांचं आरोग्य पूर्ववत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रिमिंग. पण, अर्थातच नंतर औषधोपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेणं, अधिक योग्य.

– केस धुण्यासाठी सौम्य शाम्पू आणि कण्डिशनरचा वापर करा. हा शाम्पू आणि कण्डिशनर यूव्ही प्रोटेक्टेड असेल, हे बघा. यामुळे अल्ट्रा व्हॉयलेट रेजमुळे केसांचं होणारं नुकसान काही प्रमाणात तरी टळू शकेल.

– उकाड्यामुळे त्वचेला घाम येतो, तसंच डोक्यातही घाम येत असतो. घामाने केस चिकट होतात. म्हणूनच दर दोन दिवसांनी केस धुवायला हवेत. केस धुताना कोमट पाण्यानेच धुवा, गरम पाण्याने नाही. गरम पाण्याने केस धुतल्यास त्यांना अधिक नुकसान पोहोचू शकतं. उन्हाळ्यात केसांची काळजी अधिक घ्यावी लागते. केस धुण्यासाठी नेहमी सौम्य शाम्पूचाच वापर करायला हवा.

– केस धुतल्यावर त्यांना कण्डिशन करायला विसरू नका. शाम्पूमुळे केसांमधील नैसगिर्क स्वरूपात असणारं मॉइश्चरायझर कमी होतं. केसांना पुन्हा मॉइश्चर मिळवून देण्यासाठी कण्डिशनर लावणं फायद्याचं असतं. तसंच यामुळे केसांचं रक्षण होऊन केस मऊ आणि चमकदार होतात.

– कण्डिशनरमुळे केस तुटण्याचं प्रमाणही कमी होतं. केस गळण्याचं प्रमाण कमी करणारे कण्डिशनरही बाजारात उपलब्ध आहेत. ते वापरून केसांचं आरोग्य सुधारणं शक्य आहे.

– केसांची काळजी घेण्यासाठी नैसगिर्क वस्तूंचा/पदार्थांचा वापर करणं नेहमीच योग्य आणि फायद्याचं असतं. हीना, अंड, दही यासारख्या पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घेता येते. पण हे पदार्थ वापरणं कधीकधी कटकटीचं वाटतं. अशा वेळी नैसगिर्क पदार्थांपासून बनवण्यात आलेल्या शाम्पू आणि कण्डिशनरचा वापर करता येईल.

– तुमचे केस पातळ किंवा चांगले असतील, तर कण्डिशनरऐवजी लिव्ह ऑन लावा. लिव्ह ऑनमुळे केस सहज मॅनेज करता येतात. केसांचा बिघडलेला पोत सुधारण्यासाठी उपयुक्त असं लिव्ह ऑन माकेर्टमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे केसांना चमकही येते. उन्हात बाहेर पडण्यापूवीर् केसांना लिव्ह ऑन लावता येईल. यामुळे केसांचं रक्षण होतं. केसांचं भुरभुरणंही यामुळे कमी होतं.

– ब्लो ड्रायर, आयर्न, इलेक्ट्रिक कर्लरचा वापर तुम्ही करत असाल, तर उन्हाळ्यात त्याला ब्रेक द्या.

– उन्हाळ्यात हॉट कलिर्ंग करू नका. त्यापेक्षा अधिक मॅनेजेबल हेअरस्टाइल ठेवणं योग्य. मोकळे सोडता येतील असे लहान किंवा पोनी बांधता येईल असे जरा मोठे केस ठेवता येतील.

– केस मोकळे सोडत असाल, तरी क्लिप ठेवायला विसरू नका. गरम होऊ लागताच केस बांधायला ही क्लिप उपयोगी पडू शकते.

– याच मोसमामध्ये केसांमध्ये कोंडा होतो. म्हणूनच केसांची नीट काळजी घ्या.

Leave a Reply