कलर केसांची काळजी

आज सर्रास केसांना कलर केलं जातं. मात्र, केसांसाठी कलर निवडताना आणि कलर केलेल्या केसांची काळजी घेणं आवश्यक असतं. सलोनमध्ये केसांना रंग लावणं कमी कटकटीचं आणि सोपं होतं. पण ते खचिर्क असतं. ज्यांना हा खर्च परवडत नाही, त्यांना घरच्याघरीच केसांना रंग लावता येईल.

घरच्याघरी केसांना रंग लावताना घ्यायची काळजी :

* पहिल्यांदाच कलर करणार असाल, तर केसांच्या शेडपेक्षा वेगळ्या शेडचा रंग निवडा. पण, त्याच वेळी आपल्याला तो रंग शोभून दिसेल ना, याची काळजी घ्या. चांगल्या दर्जाचा रंग घ्या.

* कलर करण्यापूवीर् : केसांना कलर करण्यापूवीर् चांगल्या शाम्पूने केस धुवा. पण, कण्डिशनर लावू नका. तसंच ज्यात कण्डिशनर आहे, अशा शाम्पूने केस धुऊ नका. कण्डिशनरमुळे केसांवर रंग नीट बसत नाही.

* ओल्या केसांवर कलर करू नका.

* तुमच्या डोक्यातील त्वचा (स्काल्प) खूपच सॉफ्ट आणि संवेदनशील असेल किंवा केस तुटलेले किंवा दुभंगलेले असतील तर केस धुतल्यानंतर एका दिवसाने केसांना कलर किंवा ब्लीच करा.

* केसांना कलर करताना हातात ग्लोव्हज घाला. मानेभोवती जुना टॉवेल किंवा कापड गुंडाळायला हवं. जेणेकरून रंग अंगावर पडल्यास त्याचे डाग मानेवर पडणार नाहीत. कपाळावर, कानावर, मानेवर रंगाचा डाग पडू नये म्हणून तेवढ्या भागावर वॅसलिनसारखं क्रीमजेल लावा. जेणेकरून रंग तिथे चिकटणार नाही.

* कलर केलेले केस लिंबाचा रस घातलेल्या पाण्याने धुवावेत. यामुळे केसांना केलेला कलर दीर्घ काळ टिकून राहतो. तसंच प्रत्येक वेळी केस धुताना जो रंग तुम्ही केसांना लावला आहात, तो दोन चमचे रंग तुमच्या कण्डिशनरमध्ये मिसळा. शाम्पू केल्यानंतर ते कण्डिशनर केसांना लावा. यामुळे बराच काळ केसांचा कलर टिकण्यास मदत होते. हे कण्डिशनर तीन ते पाच मिनिटं केसांवर ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. केस धुण्याने जो रंग निघून गेला आहे, तो परत मिळवण्यासाठी हा उपाय करता येईल.

* केसांना कलर केल्यानंतर त्यातील मॉइश्चरचं प्रमाण खूप कमी होतं आणि परिणामी केस खूप कोरडे होतात. म्हणूनच असे केस धुण्यासाठी ‘कलर केलेल्या केसांसाठी खास’ असं नमूद केलेल्याच शाम्पू आणि कण्डिशनरची निवड करा. यात केसांसाठी आवश्यक असणाऱ्या मॉइश्चर अधिक प्रमाणात असतं. हे शाम्पू आणि कण्डिशनर चांगल्या दर्जाचेच असतील, याची खात्री करून घ्या. मेडिकल स्टोअर किंवा ब्युटी सलोनमध्ये तुम्हाला हे दजेर्दार प्रोडक्ट्स मिळू शकतील.

* हल्ली माकेर्टमध्ये हेअर मास्कही मिळू लागले आहेत. हे मास्क केसांवर पाच ते १५ मिनिटं ठेवून द्या आणि त्यानंतर नेहमीच्या कण्डिशनरप्रमाणे हा मास्क धुऊन काढा. यामुळे केसांना भरपूर प्रमाणात मॉइश्चर मिळेल.

* कलर केलेल्या केसांचं सूर्याच्या प्रखर किरणांपासूनही रक्षण करावं लागतं. कलर केलेले केस सूर्यकिरणांमधील अल्ट्राव्हॉयलेट किरणांच्या संपर्कात खूप वेळ आल्यास केस निजीर्व आणि निस्तेज होतात. म्हणूनच उन्हात बाहेर पडणार असल्यास केसांवर टोपी घाला. तसंच सन्सक्रीनचा समावेश असणाऱ्या शाम्पूचा किंवा स्प्रेचा वापर केसांसाठी करा.

* धुतलेले केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा. कारण, असे केस तुटण्याचं प्रमाण अधिक असतं.

* केस सुकवण्यासाठी ते टॉवलने जोरजोरात पुसू नका. असं केल्यास केस तुटू शकतात. त्याऐवजी डोक्याला टॉवेल गुंडाळून केसांमधील पाणी टॉवेलने शोषून घ्या.

* केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. अगदी घाईत असाल, तरच करा.

* केस वाढू लागल्यानंतर केसांच्या मुळांशी त्यांचा नैसगिर्क रंग दिसू लागतो. अशा वेळी केसांना टच अप करायला विसरू नका. ज्या रंगाने केस रंगवले आहेत, त्याच रंगाने केसांना टच अप करायला हवं. टच अप करताना केस मुळाशी आधी कलर करून घ्या. १५ मिनिटांनंतर बाकीच्या केसांना लावा.

* कलर करताना कोणती काळजी घ्यायची आणि केस किती वेळाने धुवयाचे, याची सूचना त्या पॅकवर केलेली असते. यासाठी पॅकवरील सूचना आधी नीट वाचून घ्या.
……..

कलरचे प्रकार

* टेम्पररी : केस धुवेपर्यंतच टिकणारा रंग

* सेमी टेम्पररी : केस चार ते सहा वेळा धुवेपर्यंतच टिकणारा रंग

* डेमी पर्मनण्ट : ज्यात अमोनिया खूप कमी प्रमाणात किंवा अजिबात नसतो. हा रंग सहा आठवड्यांपर्यंत टिकतो.

* सेमी पर्मनण्ट : अशा कलरमध्ये अमोनियाचं प्रमाण थोडं असतं.

* पर्मनण्ट : कायमस्वरूपी असा हा कलर. पण, यासाठी चार ते सहा आठवड्यांनी टच अप कराला लागतं.

Leave a Reply