केसांची चंपी

केसांची काळजी घ्यायची म्हणजे , खोबरेल तेल खसखसून लावायचं अशी पूर्वीची व्याख्या होती . आता मात्र , बदामापासून कोरफडीपर्यंत विविध प्रकारची तेलं केसांना लावली जातात .
बदाम तेल – यामुळे केस मऊ , चमकदार होतात आणि त्यांना पोषणही होतं .
आवळा तेल – केसांचा काळेपणा टिकून राहण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी याचा उपयोग होतो . आवळा तेलामुळे केसांखालच्या त्वचेची नाहीशी झालेली आम्लता परत येते .
[ad name=”HTML”]
तिळाचं तेल – याचं महत्त्व आयुर्वेदातही सांगितलं आहे . तिळाच्या तेलात व्हीटजर्म , जोजोबा , बदाम , जिरॅनियम , रोजमेरी , मोनियारोशा अशा अॅरोमाथेरपी तेलांपैकी तेल मिसळून ते लावल्यास चांगला फायदा मिळतो . मात्र , ही तेलं निर्जंतुक करून घ्यावीत .
जास्वंदाचं तेल : जास्वंदाचे विविध प्रकार असतात . त्यापैकी लालभडक पाकळ्या असलेल्या जास्वंदाचं तेल थंडपणा देतं . या तेलानं केशवर्धन होतं आणि शांत झोप लागते .
[ad name=”HTML”]
ब्राम्ही तेल : केसांसाठी अत्यंत गुणकारी असलेलं ब्राम्ही नैसर्गिक रुपात वापरणं केव्हाही चांगलं . मात्र , ब्राम्हीची पानं मिळणं अत्यंत अवघड झालं आहे . त्यासाठी शुद्ध , उच्च दर्जाच्या ब्राम्हीच्या पानांपासून बनवलेली पावडर वापरकता येईल . ब्राम्ही थंड असल्यामुळे ते लावणं मेंदूसाठी चांगलं असतं .
कोरफड गर किंवा तेल : केसांमधल्या जुन्या , मृत पेशी काढण्याचं काम कोरफड करते . कोरफडीच्या नियमित वापरामुळे कोंडा कमी होतो आणि केसही वाढतात . कोरफडीचा गर काढणार असाल , तर त्याच्या पानांच्या आत असलेला पांढरा चीक वापरावा . पान तोडल्यावर निघणार लालसर द्रव केसांसाठी अपायकारक असतो .
[ad name=”HTML”]
माका तेल : माक्यामुळे केस भुंग्यासारखे काळेभोर होतात . शांत झोप लागण्यासाठी माका उपयुक्त आहे .
खोबरेल तेल : शुद्ध खोबरेल केसांसाठी चांगलं . त्यात अॅरोमा थेरपी तेलंही घालता येतील .
गो नॅचरल – अभिनेत्री इशा कोप्पीकर.
रणरणत्या उन्हाळ्यात थंड आणि ताजेतवाने राखण्यासाठी नैसर्गिक घटकांचा जास्तीतजास्त वापर करा असं सांगतेय ,  शक्य तेवढा नॅचरल लुक ठेवायचा प्रयत्न करते . घामाने त्वचा फार चिकचिकीत होते . त्यामुळे ती क्रीम निवडताना त्यात पुदिन्यासारखे नैसर्गिक थंडावा देणा ‍‍ रे पदार्थ असतील याची काळजी घेते . यामुळे त्वचा टवटवीत राहते . केसांच्या बाबतीत चांगल्या शॅम्पूसोबतच चांगल्या कंडीशनरलाही इशा तितकंच महत्त्वं देते . तर कपड्यांच्या बाबतीत सुती आणि शक्यं तेवढे अंग झाकणारे कपडे घाला असं इशा म्हणते .

 

Leave a Reply