गुपित आयुवेर्दातच दडलेले असल्याचे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितले.

या वयातही माझा आवाज चांगला आहे आणि डोक्यावर काळे केस आहेत, याचे गुपित आयुवेर्दातच दडलेले असल्याचे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितले.

आयुवेर्द औषधींच्या संतुलन आयुवेर्द या रिटेल चेनचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी संतुलन आयुवेर्दचे प्रमुख डॉ. बालाजी तांबे, डॉ. रघुनाथ माशेलकर, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, उद्योजक प्रल्हाद छाब्रिया आदी उपस्थित होते. यावेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मान्यवरांशी संवाद साधला.

लहानपणी आमची आई घरी केलेेले ब्रह्माीतेल डोक्याला लावायची आणि आवळा, बेहडा आणि त्रिफळा चूर्णाने आम्ही डोळे धुत आलोे आहोत. आज ७६ व्या वषीर्ही मला चष्मा नाही आणि केसही चांगले आहेत, असे भोसले म्हणाल्या. अॅलोपॅथी आणि आयुवेर्द दोहोंचा समन्वय साधला जावा, असे डॉ. कोल्हे म्हणाले. पारंपरिक ज्ञान आपली इंटलेक्चुअल प्रॉपटीर् असून त्यावर केवळ आपलाच हक्क असल्याचे डॉ. माशेलकर म्हणाले.

Leave a Reply