चमकदार केसांसाठी

एका वाटीत थोडं दही घ्या. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. एकत्र केलेलं हे मिश्रण २५ ते ३० मिनिटं केसांना लावा. मग, चांगल्या शाम्पूने केस धुवा. नियमित हा उपाय केल्याने केस चमकदार आणि मजबूत होतील.

[ad name=”HTML”]

# केस गळत असल्यास रात्री झोपण्यापूवीर् केसांना गरम खोबरेल तेलाने मसाज करा. दुसऱ्या दिवशी केस धुण्यापूवीर् गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो टॉवेल केसांना गुंडाळून वाफ द्या. तीन मिनिटं तरी हा टॉवेल केसांवर राहू दे. तीनदा केसांना अशा तऱ्हेने वाफ द्या. केस धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात दोन ते तीन चमचे लिंबाचा रस टाका आणि चांगल्या शाम्पूने केस धुवा. यामुळे केस गळण्याची तुमची समस्या कमी होईल.

[ad name=”HTML”]

# एक अंडं, १०० ग्रॅम दही, एका लिंबाचा रस आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑइल एकत्र करून तयार झालेली पेस्ट केसांना लावा. एक तासाने शाम्पूने केस धुवा. नियमित हा उपाय केल्यास केसांना चमक तर येईल शिवाय, केस सॉफ्ट होतील.

# केसांना मेंदी लावताना त्यात थोडं दही आणि लिंबाचा रस टाका. दीड तास ही मेंदी केसांना लावा आणि मग केस धुवा. केसांना छान रंग येईल.

[ad name=”HTML”]

# तुमचे केस तेलकट असतील, तर दर दोन दिवसांनी केस धुवा. केस कोरडे असल्यास आठवड्यातून दोनदा केस धुवा.

Leave a Reply