टकलावर उपाय दृष्टिपथात?

जगभरातील तब्बल ८० टक्के व्यक्तींना केस गळणे आणि टक्कल पडण्याचा त्रास होतो. उरलेल्या २० टक्क्यांनाही टक्कल पडण्याच्या भीतीने ग्रासलेले असते. या सार्वत्रिक समस्येवर उपाय काढल्याचा दावा जर्मनीतील संशोधकांनी केला आहे.

बलिर्नच्या टेक्निकल युनिव्हसिर्टीच्या संशोधकांनी पहिल्यांदाच स्टेम सेल्सपासून केसांचे फॉलिकल्स तयार केल्याचा दावा केला आहे. हे संशोधन प्राण्यांच्या पेशींवर केले असले, तरी एका वर्षाच्या कालावधीत मानवी स्टेम सेल्सपासून मानवी केसांच्या फॉलिकलची निमिर्ती करण्यात यश येईल, असा त्यांचा दावा आहे. स्टेम सेल्स या शरीराच्या मूळपेशी असतात. प्रयोगशाळेत या पेशींपासून मानवी शरीरातील रक्त, हाडे वा अवयवांच्या कोणत्याही पेशी तयार करता येतात. केसांचे फॉलिकल्स डोक्यावर ‘पेरण्याची’ ही उपचारपद्धती येत्या पाच वर्षांत उपलब्ध होऊ शकेल, असे मुख्य संशोधक प्रा.रोलॅण्ड लॉस्टर यांनी म्हटले आहे. शिवाय प्रयोगशाळेत केसांचे फॉलिकल्स तयार करणे शक्य झाल्यास सौंदर्यप्रसाधनांची सुरक्षितता तपासण्यासाठी प्राण्यांवर प्रयोग करण्याचीही गरज उरणार नाहीे. याआधी २००४मध्येही अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया युनिव्हसिर्टीच्या शास्त्रज्ञांनी स्टेम सेलच्या संशोधनातून टकलावर उपचार होऊ शकतात, असा दावा केला होता. मात्र त्यादृष्टीने अद्याप उपचारपद्धती विकसित झालेली नाही.

Leave a Reply