तुमची प्रकृती कोणती?

 

शरीराच्या स्वभावधर्माला आयुवेर्दात प्रकृती असं म्हटलंय. या प्रकृतीनुसार आहार विहार ठरवल्यास कायम निरोगी राहाल, असा मोलाचा सल्लाच जणू आयुवेर्दानं दिलाय. या लेखमालेतून स्वत:ची प्रकृती ओळखण्यापासून आहार कोणता घ्यावा, विशिष्ट ऋतूमध्ये कोणती काळजी घ्यावी, हे सांगण्यात येणार आहे. पण त्याआधी तुमची प्रकृती कोणती हे ओळखा.
…..

[ad name=”HTML”]

वैद्यकशास्त्रात प्रकृतीला खूप महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने आणि आजार झाल्यानंतर बरं होण्यासाठी आपली प्रकृती समजणं आवश्यक असतं. आजार बरा होण्यास रोग्याची मूळ प्रकृती साथ देणारी आहे का नाही, आजारातून रोगी बरा होईल की नाही, त्याबरोबर रोग्यावर साधे उपचार करायचे की विशेष, हे त्याची प्रकृती पाहून ठरत असतं.

प्रकृती म्हणजे शरीराचा स्वभावधर्म किंवा शरीर कसं चालतं ती पद्धत. शरीरस्वास्थ्य कायम राहावं म्हणून कोणता आहार आणि विहार ठेवावा हे सांगण्यासाठी प्रकृतीचं परीक्षण करावं लागतं. तसंच एखाद्याला कोणता रोग होण्याची शक्यता आहे, हेही प्रकृतीवरून समजतं. आई-वडीलांची प्रकृती, गर्भारपणात आईचा आहार आणि आपल्या जन्माचा ऋतू यावर आपली प्रकृती ठरत असते.

[ad name=”HTML”]

प्रकृतीप्रकार

* कफ : कफात्मक प्रकृतीच्या व्यक्ती दीर्घकाल निरोगी जीवन जगतात. एकंदरीतच, ही प्रकृती उत्तम समजली जाते. कफ प्रकृतीच्या व्यक्ती स्थूल असतात. या व्यक्ती आहार भरपूर घेतात आणि त्याचं पचनही व्यवस्थित होतं. शौचाला आणि लघवीलाही साफ होते. त्यांच्या नाडीचा वेग मंद असतो. झोप चांगली येते. केस काळे आणि दाट असतात. सांधे आणि हाडं बळकट असतात. ते तहान, भूक, दु:ख, क्लेश आणि उष्णता सहन करू शकतात. रुंद छाती, लांब बाहू, मोठं कपाळ, दाट केस, सुस्पष्ट, खणखणीत, गोड, आणि गंभीर आवाज असतो. तहान-भूक कमी लागते. चांगली झोप. नाडी आणि श्वासोच्छ्वासाची गती इतरांपेक्षा मंद आणि गंभीर असते. हे लोक विद्वान, बुद्धिमान आणि शास्त्रज्ञ वृत्तीचे असतात. चांगले मित्र मिळतात. मैत्रीही कायम ठेवतात. विपुल संपत्ती असते. दानधर्मही पुष्कळ करतात.

[ad name=”HTML”]

या प्रकृतीच्या व्यक्तींना भरलेली तळी, सरोवरं, कमळं, फुलं, चंद, चांदणं यांची स्वप्नं पडतात. यांचा स्वभाव हत्ती, सिंह, हंस, वृषभ यांच्या स्वभावाशी मिळताजुळता असतो.

* पित्त : संयोग किंवा वियोग यापेक्षा पचन किंवा रूपांतर करण्याची क्रिया ज्या शरीरात अधिक असते, अशा प्रकृतीस पित्त प्रकृती समजावं. यांचा जठराग्नि आणि धत्वांग्नि अधिक कार्यकारी असतो. त्यामुळे यांना इतरांपेक्षा तहान आणि भूक अधिक प्रमाणात लागते. शरीर नेहमी उष्ण असतं. खूप घाम येतो. तहानही खूप लागते. वार्धक्याची लक्षणं लवकर दिसू लागतात. या व्यक्ती मध्यम आयुष्य जगणाऱ्या असतात. ती गोरी, लालसर आणि स्पर्शाने उष्ण असतात. डोळे लहान, लालबुंद, केस विरळ आणि आखूड असतात. तळहात, तळपाय आणि तोंड लाल असतं. या प्रकृतीच्या व्यक्तींना उन्हाळा आवडत नाही. त्यांना सतत घाम येतो. सतत रागवणारा स्वभाव. नाडीचा वेग मध्यम. या व्यक्ती शूर, मानी, सुचिर्भूत आणि बुद्धिमान असतात. यांचं आयुष्य आणि बळ मध्यम असतं. त्यांना वीज, सूर्य, अग्नी, आकाशातील लाल रंग अशी स्वप्नं पडतात. वाघ, अस्वल, वानर, मांजर याप्रमाणे त्यांचा स्वभाव असतो.

* वात : संयोगापेक्षा वियोग आणि विघटन जास्त प्रमाणात असणाऱ्या शरीराची प्रकृती ही वात प्रकारात मोडते. या प्रकृतीच्या व्यक्ती कृश असतात. वातप्रकृती कनिष्ठ समजली जाते. या व्यक्ती रुक्ष, शरीराने पुष्ट नसलेल्या, लहान शरीरबांध्याच्या असतात. त्यांचा आवाज रुक्ष, क्षीण, घोगरा आणि सतत अडखळणारा असतो. बोलघेवडा स्वभाव. झोप व्यवस्थित येत नाही. वजनाने कमी पण त्यांची गती, शरीराची हालचाल किंवा काम करण्याचा वेग जास्त असतो. त्या अॅक्टिव्ह असतात. अवयव प्रमाणबद्ध नसतात. अंगावर शिरांची जाळी असते. त्या लवकर रागावतात आणि लवकर प्रेमही करतात. विरक्तही लवकर होतात. नाडीचा वेग जलद असतो. स्मरणशक्ती कमी असते. कमी आयुष्य, कमी बळ, कमी संपत्ती आणि संतति असते. ती अल्प समाधानीही असतात. आपण झाडावर, पर्वतावर किंवा अवकाशात गेलो आहोत, अशा प्रकारची स्वप्नं त्यांना पडतात. कुत्रा, उंट, गिधाड, उंदीर, कावळा यासारखा स्वभाव असतो.

Leave a Reply