निर्जीव केसांना द्या पुनरुज्जीवन!

आपल्या डोक्यावर साधारणपणे १ , ०० , ००० केस असतात . यातील प्रत्येक केस तीन थरांचा बनलेला असतो , त्यावर क्युटिकल असते . बाहेरील थर हा आतील थरांचं संरक्षण करतो .

चमकदार केस हे आरोग्यपूर्णतेचं लक्षण असतं कारण यातील क्युटिकल थर हा सपाट असतो . जेव्हा क्युटिकलचे खवले सपाट असतात तेव्हा ते एकमेकांवर घट्टपणे आच्छादलेले राहतात . त्यामुळे आतील बाजू या दोन थरांचं उष्मा , सूर्य , क्लोरीन तसंच इतर धोकादायक घटकांपासून संरक्षण करू होऊ शकतं .

व्यक्तीच्या केसांची ठेवण वा रचनेचा , म्हणजे ते सरळ असोत वा कुरळे त्याचाही चमकदारपणावर परिणाम होतो . सेबम नावाचं एक नैसर्गिक तेल केसांवर असतं . सरळ केसांवर ते कुरळ्या केसांपेक्षा अधिक व्यवस्थित पसरलेलं राहतं म्हणून तर कुरळ्या केसांपेक्षा सरळ केस अधिक चमकदार दिसतात .

केस तुटणे : केसांवरील छोटे छोटे खवले जाड बनतात वा कमकुवत होतात तेव्हा केस तुटू शकतात . ही प्रक्रिया कधी कधी डोक्याच्या त्वचेजवळच घडते त्यामुळे अशा व्यक्तीचे केस कधी फार लांब वाढतच नाहीत . केसांच्या टोकाशी जेव्हा केस तुटतात तेव्हा ते दुभागतात आणि हे दुभाजन थेट मुळापर्यंत जाऊ शकते . केस तुटण्याच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे रंग लावणे पर्मिंग आणि टिण्टिंग यासारख्या रासायनिक केशप्रक्रियांचा चुकीचा वार . वारंवार केसांवर ब्रश वा कंगवा फिरवून ते विंचरणे किंवा ब्रश , कंगवा चुकीच्या पद्धतीने वापरणे यामुळेही केस तुटतात . केसांना गंगावन लावून वाढवणं आणि घट्ट वेण्या वळण्यानेही केस तुटतात . मोठे केस मोकळे सोडल्याने वा चुकीच्या पद्धतीने विंचरताना ओढणे यामुळे केस तसंच डोक्याच्या त्वचेला दुखापत होते वा केसही तुटतात .

केस तुटणे , कोरडे शुष्क होणे हे क्वचित एखाद्या शारीरिक असंतुलनाचं लक्षणही असतं म्हणजे हायपोथायरॉडिझम किंवा अपचन . तुम्ही केसांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया करत नसाल वा विविध केशरचनेची साधने वापरत नसाल आणि तरीही तुमचे केस तुटत असतील तर तुम्ही ट्रायकॉलॉजिस्टकडे जा .

ट्रायकॉरहेक्सिस नोडोसा : हा केसांच्या मध्यस्तराचा एक नेहमी आढळणारा दोष आहे . ज्यामध्ये केसांचे खवले मोडतात आणि नंतर तुटतात . याचं मुख्य कारण आहे मॅकॅनिकल वा रासायनिक पेच प्रसंग याचं वगीर्करण हे केसांचा शॅफ्ट मोडणए असं केलं जातं . ज्याप्रमाणे क्ष – किरण यंत्रांनी आपल्याला हाडाची मोडतोड कळू शकते अगदी त्याचप्रमाणे ट्रायकोअॅनालिसिस केल्याने आपल्याला केस शॅफ्ट मोडला आहे , काय ते कळू शकतं .

केस गळणे वा केसांना दुखापत

केसांच्या बाबतीत दुखापत म्हणजे क्युटिकल क्षतीग्रस्त होणे वा केसांच्या दांड्याचे बाहेरील आवरण खरखरीत , तुटके , कोरडे होणे वा कुस्करले जाणे . केस खराब करण्याच्या कारणांची यादी खूप मोठी आहे . म्हणजे यामध्ये केस वारंवार धुणे , विंचरणे व ब्रश वापरणं यापासून ते केसांवर रासयनिक प्रक्रिया करून घेण्यापर्यंत सर्व आली . तुम्ही योग्य काळजी न घेतल्यास खाऱ्या पाण्यात पोहोण्यामुळेही केसांची मुळे दुखावू शकतात .

केस खराब होण्याची सर्वसाधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत .

रसायने : ब्लीच , कायमस्वरूपी रंग , कुरळे करणे व सरळ करणं यमुळे क्युटिकलचे खवले खरबरीत होतात

भौतिक वापराच्या वस्तू : बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल पण घर्षणामुळे बरेच नुकसान होते . एखादा खरखरीत ब्रश वा कंगवा . पोहून आल्यानंतर वा कामानंतर केसांमध्ये राहिलेला खारट ओलावा आणि उशआंवर डोके घासल्याने होणारे घर्षण त्याचबरोबर केसांना लावण्यात येणारे रबर , स्बरबॅण्ड्स बॅरेट्स आणि घट्ट पोनिटेल्स .

लक्षात ठेवा :

नुकतेच धुतलेल्या केसांची ताणण्याची आणि सळसळीची क्षमता कमी असते .

उष्णता : खूप जास्त तापमानाचे ब्लो ड्रायर्स , हॉट रोलर्स आणि कलिर्ंग अर्थात केस कुरळे , सरळ करणं अशा प्रक्रियांमुळे क्युटिकल तडकतात .

हवामान : अतिनील किरणांमुळे केसांमधील प्रथिनांचे बंध तुटतात . साध्या उन्हाचा आरोग्यपूर्ण केसांवर फारसा विपरीत परिणाम होत नाही . केस तुटण्याची इतर कारणे आहेत

नियमितपणे तेल न लावणं व कंडिशनिंग न करणे

केसांचं दुभाजन थेट केसांच्या दांड्याला पोहोचण्यापूवीर् केसांची टोके न कापणे

केस घट्ट आवळून , बांधून झोपणे

डोक्यापासून घट्ट वेण्या घालणं

काही औषधयोजना व आजारपण

दुखावलेल्या केसांच्या मुळांना हळुवारपणे जपण्याची खूपच गरज असते .

समस्येचं मूळ कारण शोधून ते पमिर्ंग वा टच – अप असेल तर केसांवरील सर्व रासायनिक उपचार ताबडतोब बंद करा . दुखावलेले केस नीटपणे वाढेपर्यंत कुठलीही प्रक्रिया करू नका . एकदा कधीतरी रासायनिक प्रक्रिया केसांवर करणं ठीक आहे पण खूपच वारंवार आणि सारखी सारखी तीच ती करत राहिल्सास केस नक्कीच दुखावतात . आठवड्यातून किमान दोन वेळा केसांना तेल लावून कंडिशनिंग करा .

ट्रायकॉलॉजिस्टची मदत वा सल्ला हा अगदी अखेरचा उपाय समजू नका . समस्येवर तज्ज्ञांचा सल्ला आणि मदत जितक्या लवकर मिळेल तितक्या लवकर तुम्हाला उपाय करता येतील . म्हणूनच तुमची ट्रायको तपासणी लगेच करून घ्या .

Leave a Reply