मुलांमधील केसांची वाढती समस्या

मुलांमधील केसांची वाढती समस्या

hair

आजच्या अत्याअधुनिक जीवनशैलीचे अनेक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. मुलांमध्ये केसांबाबत वाढत्या समस्यादेखील याचाच एक भाग आहे. केस पांढरे होणे, केस गळणे, डोक्यात कोंडा होऊन खाज येणे, केस तुटणे (स्प्लिटस) अशा समस्यांचे प्रमाण लहान वयातच आढळू लागले आहे. किशोरावस्थेमधील मुलांमध्ये तर ही सर्वसामान्य बाब आढळून येत आहे.

[ad name=”HTML”]

स्वत:च्या केसांबद्दल सर्वांनाच प्रेम असते. केसांची निगा राखण्यासाठी सर्वचजण प्रयत्नशील असतात. किशोरावस्थेमध्ये आरशा समोर वारंवार जाणे, केसांवरून वारंवार हाथ फिरवणे, केसांची निरनिराळी स्टाइल करणे हे काही गैर नाही. पण केसंसोबत प्रयोग करणे आणि त्या प्रयोगाचे केसांवर होणारे परिणाम जाणून घेणेदेखील आवश्यक आहे. केसांची निगाह राखण्य सोबत, ती राखत असतांना साधकबाधक मुद्दे जाणून घेणे गरजेचे आहे.

[ad name=”HTML”]

सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक

कृत्रिम सौंदर्य प्रसाधनांचा वाढता वापर केसांना हानी पोहोचवत आहे. त्यातील रसायने केसांच्या मुळांना दुखापत पोहोचवतात व केस ठिसूळ होऊन तुटतात. नुकत्याच एका संशोधनातून असे आढळून आले आहे की अमोनिया असलेले शॅम्पू केसांसाठी हानिकारक आहेत. त्याकरिता एक प्रयोगदेखील करीण्यात आला. जे लोक रोज आपल्या केसांसाठी आमोनियायुक्त शॅम्पू वापरत होते त्यांची नखंदेखील तुटायला लागली. त्यातून निष्कर्ष काढण्यात आला की अमोनियामुळे केसांची मुळे दुखावली जातात. तसेच शॅम्पूच्या अतिवापरामुळे अनेकांना अर्धशिशीचा त्रासदेखील वाढत्या प्रमाणात आढळू लागला आहे. कुठल्याही शॅम्पूच्या मागे जर रसायनांची यादी पहिली तर त्यातील अनेक रसायने हे पॉलीहायड्रोकार्बन असल्याने केस पातळ होतात व लवकर तुटतात. त्याचबरोबर केस पांढरेदेखील होतात.वारंवार केसांची स्टाइल बदलणे

वारंवार केसांची स्टाईल बदल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते. केसांना सातत्याने हाताळल्याने किंवा केसांचे ठेवण बदल्याने हे नुकसान जास्त प्रमाणात आढळून येते. यालाच स्ट्रक्चरल डॅमेज म्हणतात. यामुळे केस तुटण्यासोबत केस विरळदेखील होतात.

[ad name=”HTML”]

अनियमित झोप

अनेक मुले अभ्यासाच्या निमित्ताने रात्री उशिरा झोपतात. त्यामुळे शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात. परिणामी केस विरळ होतात व गळतात. अभ्यास हेच एक निमित्त नसून, लेट नाईट चाटिंग हेदेखील याचे मोठे कारण आहे. याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनियमित आहार व तेलकट तुपकट पदार्थांच्या अतिसेवनाने देखील केसांची समस्या वाढत चालली आहे.

हेअर डाय

आपले केस रंगीबेरंगी करण्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, रासायनिक बदलांमुळे नैसर्गिक केसांची ठेवण बदलते आणि केसांना हानी होते. सल्फेट्स, फॉसफेट्स यासारखे घटक केसांवा वाईट परिणाम करतात. केसांची निगा कृत्रिमरित्या जोपासण्याऐवजी नैसर्गिकरित्या जोपासल्यास मुलांमधील केसांच्या समस्यांना नक्कीच आळा घालता येईल.

Leave a Reply