Hair Care in Menopause

‘ मोनोपॉज’ ही स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाची शारीरिक आणि मानसिक बदल घडवणारी नैसगिर्क अवस्था आहे. स्त्रियांना कित्येक वर्षं प्रत्येक महिन्याला दोष बाहेर टाकण्याची सवय लागलेली असते आणि हळूहळू ती बंद झाल्यामुळे शरीरात बरेच बदल घडले जातात. शरीराची उष्णता अचानक वाढणं आणि त्याचा परिणाम बाह्य सौंदर्यावर पटकन होत असतो. केस पांढरे होणं तसंच गळणं, नखांवर चिरा पडणं, त्वचेवर काळे डाग वाढणं तसंच सुरकुत्या पडणं अशी अनेक सौंदर्यबाधक लक्षणं दिसतात. साधारणपणे वयाची ४५ वर्षं उलटली की हा काळ येतो. हळूहळू या गोष्टींची शरीराला सवय होते, पण सवय होईपर्यंत वातदोष कोपतच असतो आणि सौंदर्याचा वर्धक शुक्रधातू बंड करून उठतो.

[ad name=”HTML”]

केस पांढरे होणं हे सहाजिकच आहे. तसंच गळायला सुरुवात झाली असेल तर कोमट तेलाने केसांना मसाज द्यावा. कोरफड, जास्वंद, माका यांचा एकत्रित लेप केसांच्या मुळाशी लावावा.

केसांचा रुक्षपणा कमी होतो. केस मऊ होतात.

केस धुताना : कोणताही शॅम्पू लावा पण पाण्यात मिसळून त्याची तीव्रता कमी करा.

पोटात घेण्यासाठी : कॅल्यिशअमची कमतरता हे केस गळण्याचं कारण असू शकतं. अर्धा-अर्धा चमचा शतावरी, अश्वगंधा यांचं दुधाबरोबर सेवन केल्याने खूप उपयोग होतो.

सकाळी न्याहरी म्हणून दूध-पोळी खावी. साजूक तुपाचा समावेश आहारात करावा. तूप हे शरारीतील अग्नी सौम्य करतं. त्यामुळे तारुण्य कायम ठेवायला मदत करते.

[ad name=”HTML”]

प्राणायम करणं हाही योग्य व्यायाम या वयामधे गुणकारी ठरतो.

केसांना मसाज कसा करावा?

आतापर्यंत सतत सर्व जबाबदाऱ्या पेलवत आल्यामुळे शरीराबरोबर मनही थकलेलं असतं. केसांच्या मसाजमुळे उत्साह येतो. स्नायूंना स्वस्थता मिळते. शरीरातील विषारी दव्यं बाहेर फेकली जातात.

मसाज नेहमी दुसऱ्यांकडून करून घ्यावा.

वाटीत गरम तेल करावं. तेल शक्यतोवर आयुवेर्दिक पदार्थांनी युक्त असं असावं.

[ad name=”HTML”]

आपली पाचही बोटं तेलात बुडवावीत. टाळूपासून मागच्या दिशेने मसाजला सुरुवात करावी. चार बोटांच्या अग्रभागाने गोलाकार मसाज द्यावा. मसाज देताना खास करून प्रेशरकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जोरजोरात केस घासू नयेत आणि केसात जोरात चापट्या मारणं खूप हानीकारक असतं.

Leave a Reply