Hair Care in Winter

हिवाळ्यात केसांची विशेष निगा राखावी लागते. हिवाळ्यात केस कोरडे पडून त्यामध्ये कोंडा होतो. केस गोठल्यासारखे होतात. त्यांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. बऱ्याचदा केस दुभंगण्याचाही त्रास याच काळात अधिक प्रमाणात जाणवतो. टाळूची त्वचा कोरडी पडल्यामुळे तिला खाज सुटते. सर्वांदेखत केस खाजवताना खूप अवघडल्यासारखं होतं. हिवाळ्यात केस, टाळूची त्वचा कोरडी पडणं आणि केस दुभगंण इत्यादी त्रासपासून वाचायचं असेल तर केसांची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी टाळूच्या त्वचेला पुरेसं मॉइश्चरायझर मिळणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे टाळूची त्वचा कोरडी पडते. तसंच दररोज केसांवरून आंघोळ केल्यामुळेही कोंडा होतो. परंतु इन्फेक्शन, टाळूची त्वचा तेलकट असल्यास कोंडा होतो. कोंड्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर केस गळतात. थंडीमधल्या कोरड्या हवामानामुळे टाळूच्या त्वचेवरील मॉइश्चर कमी होऊन त्वचा कोरडी होते.

आयुवेर्दामध्ये कोंड्यावर उत्तम उपाय आहे. केसांसाठी खास आयुवेर्दिक शॅम्पू, मॉइश्चरायझर आहेत. थंडीत केसांमध्ये कोंडा होऊ नये म्हणून काही टिप्स:

# नियमित केस व्यवस्थित विंचरायला हवेत. केस नियमित न विंचरल्यामुळे टाळूवरील मृत त्वचा निघत नाही.

# आठवड्यातून तीन वेळा तरी केस धुवा.

# कोंड्यामुळे केस खराब होतात. त्यामुळे कोंड्यावर उपयुक्त ठरेल असा शॅम्पू वापरा.

# कोंड्यावर उपयुक्त ठरेल असं तेलही बाजारात मिळतं. ते केस धुण्या आधी एक तास केसांच्या मुळांशी लावा.

# शॅम्पू लावून झाल्यावर केस हलक्या हाताने चोळून धुवा.

# कंडिशनरमुळे केसांना मॉइश्चर मिळतं. हे मॉइश्चर केसांच्या मुळांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतं.

# आहारात व्हिटॅमिन्स आणि खनिजांचं योग्य प्रमाण ठेवा.

# सूर्यकिरणांामुळे केसांना इजा पोहोचते. म्हणून उन्हात जाताना डोक्यावर टोपी घाला किंवा स्कार्फ बांधा.

# स्ट्रेटनिंग, पमिर्ंग आणि कलरिंगसारख्या केमिकल ट्रिटमेण्ट शक्यतो करू नये. त्यामुळे केसांना नुकसान पोहोचतं.

# प्रमाणाबाहेरील उष्णता केसांना आणि टाळूला हानिकारक ठरते.

# शरीर निरोगी राहण्यासाठी काळजी घ्या. कारण अती ताण हे कोंडा होण्याचं मुख्य कारण आहे.

# नियमित व्यायाम, योगासनं, मेडिटेशनमुळे ताणतणावांना दूर ठेवता येतं.

कोंडा पूर्णत: बरा होण्यासारखा आहे. पण त्यासाठी नियमित उपचार घेणं गरजेचं आहे. काही आयुवेर्दिक शॅम्पूमुळे कोंडा कमी होऊ शकतो.

# झिंक प्रिथिवन  : केसांमधील बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतं.

# सेलेनियम सल्फाइड : यामुळे टाळूमधील तेलग्रंथीमधल्या तेलनिमिर्तीचं प्रमाण कमी होतं.

# कोल टार : अँटीफंगल इन्फेकशनवर परिणामकारक आहे.

# केटोकोन्झोले : केसांमध्ये अँटीफंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून टाळूच्या त्वचेवर सुरक्षा आवरणासारखा उपयोग होतो.

कोंड्यासाठी नैसगिर्क घटक असलेला शॅम्पूही वापरता येतो. त्यामधील काही उपयुक्त घटक :

# चहापाती तेल: कोंड्याला प्रतिकार करतं.

# दाक्षाच्या बिया, ब्राह्माी, तुळस: कोंड्यावर परिणामकारक

# कोरफड, अनंतमूळ आणि रोझमेरी: यामुळे केसांना मॉइश्चर आणि पोषण मिळतं.

कोंड्याच्या समस्येने आज सगळेच त्रासले असले तरी यावर भरपूर उपाय आहेत. आयुवेर्दात खास कोंड्यासाठी बरेच उपचार दिलेले आहेत. याची सुरुवात आयुवेर्दिक घटक असणाऱ्या उत्पादनांच्या वापराने करा. कारण वनस्पतींच्या माध्यमातून निसर्गापासून आलेला चांगुलपणा आपल्या केसांसाठी केव्हाही चांगलाच आहे.

Leave a Reply