Summer, hair and fashion

उन्हाळा, केस आणि फॅशन

 

केसांनी स्त्रियांचं सौंदर्य खुलतं यात शंका नाही. पण सर्वात जास्त केसांची काळजी कुठल्या ऋतूत घ्यायची गरज असेल तर ती उन्हाळ्यात. फक्त तुमची त्वचा उन्हात करपते, असे नाही तर केसंही करपू शकतात. म्हणूनच जेव्हाही उन्हाशी थेट संपर्क येणार असतो तेव्हा त्यांच संरक्षण स्कार्फ, कॅप किंवा हॅट ने करावं.

तुमच्या केसांना हायड्रेट ठेवण्याकरिता दिवसाला कमीतकमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या.

उन्हाळ्यात तुम्ही कंडीशनरचा पुरेपूर फायदा करून घेऊ शकता. तुमची त्वचा तुकतुकीत राहणे गरजेचं असत त्याचप्रमाणे केसंही मॉइश्चराइज्ड करणे गरजेचे असते.

उन्हाळ्यातील उष्णता तुमचे केस अशक्त करत असते. त्यात तुम्ही ब्लो-ड्राय, आयर्न आणि कलरच्या हीटने त्यांना आणखी इजा पोहोचवू नका. केसांना नॅचरली वाळू द्या, टॉवेलने किंवा हवेने. तुमच्या केसांना नॅचरल लूक देण्यासाठी हा महिना नक्कीच योग्य आहे.

उन्हाळी हेअर स्टाईल

उन्हाळा म्हटला की त्या अनुषंगाने शॉर्ट केसांची स्टाईल ही आलीच. अशात बॉब हेअर कट हा ह्या महिन्यातला सर्वात आवडता ठरतो. मग त्यात तुम्ही त्या बॉबला जरा हटके बनवू शकता, पुढून केस थोडे लांब ठेवून मागून जरा छोटे किंवा तुम्ही बॉबची लांबी सर्व बाजूंनी सारखी ठेऊन कपाळावर बँग्स किंवा फ्रिंजेस ठेऊ शकता. तुमचे केस जर कुरळे असतील तर वरून सरळ आणि खाली खांद्यावरती जरा कर्ल्स अप्रतिम दिसतात.

बॉब हेअर कट असतानाच जर तुम्हाला मानेवर केस जराही नको असतील तर पुढच्या म्हणजेच कपाळावरच्या केसांना हात न लावता इतर मागच्या केसांना पिनांनी वर बांधल्यास तुम्हाला एक उत्तम लूक मिळेल.

जर तुम्हाला केसांची लांबी कमी करायची नसेल तर हाय पोनीटेल किंवा साधी पोनीटेल तुमला फ्रेश ठेवेल.

तुमची हेअर स्टाईल जरा क्युट बनवायची असेल तर दोन वेण्याही कमाल करून जातात. त्याचबरोबर तुम्ही एकच वेणी घालून ती एका बाजूने पुढे घेऊन ठेऊ शकता. तोच प्रकार पोनीटेल सोबतही करू शकता.

तसेच जुडापिनच्या सहाय्याने तुम्ही केसाला दिलेले वेगवेगळे लूक तुम्हाला उन्हाळ्याच्या गरमीपासून तर वाचवतीलच पण जरा फॅशनेबलही बनवतील.

 

Leave a Reply