केस तुटणे

आपल्या डोक्यावर साधारणपणे १,००,००० केस असतात. यातील प्रत्येक केस तीन थरांचा बनलेला असतो, त्यावर क्युटिकल असते. बाहेरील थर हा आतील थरांचं संरक्षण करतो.

चमकदार केस हे आरोग्यपूर्णतेचं लक्षण असतं कारण यातील क्युटिकल थर हा सपाट असतो. जेव्हा क्युटिकलचे खवले सपाट असतात तेव्हा ते एकमेकांवर घट्टपणे आच्छादलेले राहतात. त्यामुळे आतील बाजू या दोन थरांचं उष्मा, सूर्य, क्लोरीन तसंच इतर धोकादायक घटकांपासून संरक्षण करू होऊ शकतं.

व्यक्तीच्या केसांची ठेवण वा रचनेचा, म्हणजे ते सरळ असोत वा कुरळे त्याचाही चमकदारपणावर परिणाम होतो. सेबम नावाचं एक नैसर्गिक तेल केसांवर असतं. सरळ केसांवर ते कुरळ्या केसांपेक्षा अधिक व्यवस्थित पसरलेलं राहतं म्हणून तर कुरळ्या केसांपेक्षा सरळ केस अधिक चमकदार दिसतात.

केस तुटणे : केसांवरील छोटे छोटे खवले जाड बनतात वा कमकुवत होतात तेव्हा केस तुटू शकतात. ही प्रक्रिया कधी कधी डोक्याच्या त्वचेजवळच घडते त्यामुळे अशा व्यक्तीचे केस कधी फार लांब वाढतच नाहीत. केसांच्या टोकाशी जेव्हा केस तुटतात तेव्हा ते दुभागतात आणि हे दुभाजन थेट मुळापर्यंत जाऊ शकते. केस तुटण्याच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे रंग लावणे पर्मिंग आणि टिण्टिंग यासारख्या रासायनिक केशप्रक्रियांचा चुकीचा वार. वारंवार केसांवर ब्रश वा कंगवा फिरवून ते विंचरणे किंवा ब्रश, कंगवा चुकीच्या पद्धतीने वापरणे यामुळेही केस तुटतात. केसांना गंगावन लावून वाढवणं आणि घट्ट वेण्या वळण्यानेही केस तुटतात. मोठे केस मोकळे सोडल्याने वा चुकीच्या पद्धतीने विंचरताना ओढणे यामुळे केस तसंच डोक्याच्या त्वचेला दुखापत होते वा केसही तुटतात.

केस तुटणे, कोरडे शुष्क होणे हे क्वचित एखाद्या शारीरिक असंतुलनाचं लक्षणही असतं म्हणजे हायपोथायरॉडिझम किंवा अपचन. तुम्ही केसांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया करत नसाल वा विविध केशरचनेची साधने वापरत नसाल आणि तरीही तुमचे केस तुटत असतील तर तुम्ही ट्रायकॉलॉजिस्टकडे जा.

ट्रायकॉरहेक्सिस नोडोसा : हा केसांच्या मध्यस्तराचा एक नेहमी आढळणारा दोष आहे. ज्यामध्ये केसांचे खवले मोडतात आणि नंतर तुटतात. याचं मुख्य कारण आहे मॅकॅनिकल वा रासायनिक पेच प्रसंग याचं वगीर्करण हे केसांचा शॅफ्ट मोडणए असं केलं जातं. ज्याप्रमाणे क्ष-किरण यंत्रांनी आपल्याला हाडाची मोडतोड कळू शकते अगदी त्याचप्रमाणे ट्रायकोअॅनालिसिस केल्याने आपल्याला केस शॅफ्ट मोडला आहे, काय ते कळू शकतं.

केस गळणे वा केसांना दुखापत

केसांच्या बाबतीत दुखापत म्हणजे क्युटिकल क्षतीग्रस्त होणे वा केसांच्या दांड्याचे बाहेरील आवरण खरखरीत, तुटके, कोरडे होणे वा कुस्करले जाणे. केस खराब करण्याच्या कारणांची यादी खूप मोठी आहे. म्हणजे यामध्ये केस वारंवार धुणे, विंचरणे व ब्रश वापरणं यापासून ते केसांवर रासयनिक प्रक्रिया करून घेण्यापर्यंत सर्व आली. तुम्ही योग्य काळजी न घेतल्यास खाऱ्या पाण्यात पोहोण्यामुळेही केसांची मुळे दुखावू शकतात.

केस खराब होण्याची सर्वसाधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत.

रसायने : ब्लीच, कायमस्वरूपी रंग, कुरळे करणे व सरळ करणं यमुळे क्युटिकलचे खवले खरबरीत होतात

भौतिक वापराच्या वस्तू : बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल पण घर्षणामुळे बरेच नुकसान होते. एखादा खरखरीत ब्रश वा कंगवा .पोहून आल्यानंतर वा कामानंतर केसांमध्ये राहिलेला खारट ओलावा आणि उशआंवर डोके घासल्याने होणारे घर्षण त्याचबरोबर केसांना लावण्यात येणारे रबर, स्बरबॅण्ड्स बॅरेट्स आणि घट्ट पोनिटेल्स.

लक्षात ठेवा :

नुकतेच धुतलेल्या केसांची ताणण्याची आणि सळसळीची क्षमता कमी असते.

उष्णता : खूप जास्त तापमानाचे ब्लो ड्रायर्स, हॉट रोलर्स आणि कलिर्ंग अर्थात केस कुरळे, सरळ करणं अशा प्रक्रियांमुळे क्युटिकल तडकतात.

हवामान : अतिनील किरणांमुळे केसांमधील प्रथिनांचे बंध तुटतात. साध्या उन्हाचा आरोग्यपूर्ण केसांवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. केस तुटण्याची इतर कारणे आहेत

नियमितपणे तेल न लावणं व कंडिशनिंग न करणे

केसांचं दुभाजन थेट केसांच्या दांड्याला पोहोचण्यापूवीर् केसांची टोके न कापणे

केस घट्ट आवळून, बांधून झोपणे

डोक्यापासून घट्ट वेण्या घालणं

काही औषधयोजना व आजारपण

दुखावलेल्या केसांच्या मुळांना हळुवारपणे जपण्याची खूपच गरज असते.

समस्येचं मूळ कारण शोधून ते पमिर्ंग वा टच-अप असेल तर केसांवरील सर्व रासायनिक उपचार ताबडतोब बंद करा. दुखावलेले केस नीटपणे वाढेपर्यंत कुठलीही प्रक्रिया करू नका. एकदा कधीतरी रासायनिक प्रक्रिया केसांवर करणं ठीक आहे पण खूपच वारंवार आणि सारखी सारखी तीच ती करत राहिल्सास केस नक्कीच दुखावतात. आठवड्यातून किमान दोन वेळा केसांना तेल लावून कंडिशनिंग करा.

ट्रायकॉलॉजिस्टची मदत वा सल्ला हा अगदी अखेरचा उपाय समजू नका. समस्येवर तज्ज्ञांचा सल्ला आणि मदत जितक्या लवकर मिळेल तितक्या लवकर तुम्हाला उपाय करता येतील. म्हणूनच तुमची ट्रायको तपासणी लगेच करून घ्या.

Leave a Reply