प्राचीन अद्भुत

महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. जी अतिप्राचीन असून पर्यटकांनी अद्याप त्याचा कानोसा घेतलेला नाही. चला तर मग महाराष्ट्रातील अशाच अतिप्राचीन स्थळांची माहिती घेऊया.

हरिश्चंद्र गड .. ठाणे, पुणे आणि नगर जिह्याच्या सीमेवर हरिश्चंद्र गड वसला असून तीन हजार वर्षांपूर्वीपासून हा गड अस्तित्वात असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.१७ व्या शतकात हा गड मोघलांकडून मराठय़ांनी आपल्या ताब्यात घेतला. गड समुद्रसपाटीपासून उंच माथ्यावर असल्याने येथे बराच गारवा जाणवतो, तर गडा भोवतालची दरी पावसाळय़ात हिरवळीने नटते. गडावर गणेश मंदिर, व्याघ्र शिल्प आणि शंकराची पिंड असून येथील शिळाही कोरण्यात आल्या आहेत. तर गडावर मूषकवाहन मकर-रती अशा अनेक कोरीव प्रतिमा पाषाणावर आढळतात. हरिश्चंद्र गड मुंबईपासून २०० कि.मी. अंतरावर असून वाहनाद्वारे या गडावर पोहोचता येईल.

 छत्तीसगड.. दंतेवाडा जिह्यात एका गडावर गणेशाची अतिप्राचीन मूर्ती होती. काही समाजकंटकांनी ती मूर्ती ५० फूट खोल दरीत फेकून दिली. गडावर मूर्ती जशीच्या तशी बसवण्याचा गावकऱयांनी विडा उचलला आणि जिल्हाधिकाऱयांसह सगळेच कामाला लागले. अखेर शोध मोहिमेनंतर भंजन झालेल्या मूर्तीचे अवशेष गावकऱयांनी गोळा करून पुन्हा जोडले व १३०० वर्षे गणेशाची मूर्ती पुन्हा ढोलकल गडावर विराजमान झाली. या घटनेमुळे कोणाच्याही ठायी नसलेला ऐतिहासिक ‘ढोलकल पर्वत’ पर्यटकांच्या नकाशावर आला आणि पर्यटकांची पावले आपसूकच या गडावर वळायला लागली. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. जी अतिप्राचीन असून पर्यटकांनी अद्याप त्याचा कानोसा घेतलेला नाही.

नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेने नटलेला महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत आजही अव्वल आहे. इथले अभेद्य महाकाय गडकिल्ले प्राचीन असून आजही ताठ मानेने उभे आहेत. इथली ऐतिहासिक मंदिरे, लेणी आजही पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र या ऐतिहासिक स्थळांची नोंद पुरातत्व खात्याकडे होऊनही या पर्यटन स्थळांचा हवा तसा विकास झालेला नाही. ऐवढेच काय तर ही अद्भुत ऐतिहासिक स्थळे अजूनही लपलेलीच आहेत. प्रसिद्धीअभावी ही स्थळे पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात आलेली नाहीत.

शिवथर घळ .. रायगड जिह्यातील बारसगावजवळच शिवथर वसले आहे. घाटमाथ्यावर नयनरम्य गुहा असून येथे समर्थ रामदास स्वामींनी सुमारे २२ वर्षे वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. याव्यतिरिक्त शिवथर येथे धबधबा असून पावसाळय़ात येथील निसर्गाचे विहंगमय दृष्य पाहण्यासारखे असते. हे मुंबईपासून २०० किमी अंतरावर असून कोकण रेल्वेने वीर स्थानकात उतरून जाता येईल.

घृष्णेश्वर..  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर पुरातन मंदिर संभाजीनगरमधील दौलताबादजवळ आहे. हे मंदिर १८व्या शतकातले आहे. येथील प्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटक येतात; परंतु या मंदिराला भेट न देताच ते निघून जातात.

मानसरः..नागपूरमधील रामटेक येथे मानसर वसले आहे. प्राचीन परंपरा, पराक्रम याचे अद्भुत दर्शन मानसर येथे पुरातत्व मंदिर आणि येथे आढळलेल्या पौराणिक वास्तूंमधून दिसून येते. दगडात कोरलेली प्राचीन मंदिरे आणि काही शिल्पे आजही डौलाने उभी आहेत. उंच डोंगरमाथा व भोवताली असलेले तलाव हे मानसर, रामटेकच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिकच भर घालतात. मानसर मुंबईपासून ८८१ किमी अंतरावर असून नागपूर येथे विमानाद्वारे अथवा रेल्वेद्वारे रामटेक स्थानकात उतरता येईल.

कोंढाणा गुंफा..  लोणावळय़ातील कार्लागडापासून १६ किमी अंतरावर कोंढाणा गुंफा आढळून येते. बुद्ध गुंफापैकी एक असलेल्या कोंढाणा गुंफेत प्राचीन शिल्पे आढळून येतात. या गुंफामध्ये स्तुप आढळून येतात. ३३व्या शतकात झालेल्या एका भूकंपात या गुंफांचा  काही भाग कोसळला. मात्र काही अवस्थेत आजही गुंफेचा काही भाग शिल्लक आहे. कोंढाणा गुंफा मुंबईपासून ७५ कि.मी. अंतरावर असून वाहनाद्वारे जाता येईल.

Leave a Reply