दुभंगलेल्या केसांसाठी

टोकाशी दुभंगलेले केस म्हणजे सौंदर्यात व्यत्ययच. केस दुभंगणं म्हणजे केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नसल्याचंच चिन्ह. केस दुभंगून निस्तेज दिसू नयेत यासाठी त्यांच्या पोषणाची काळजी घेतलीच पाहिजे. पण ही काळजी नेमकी कशी घ्यावी, हेच अनेकांना माहीत नसतं. ही माहिती करून घेतानाची पहिली पायरी म्हणजे आपल्या केसांचा प्रकार ओळखणं. एकदा का केसांचा प्रकार कळला की ते निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी काय करायचं, हेही ठरवता येतं.

केसांचे प्रकार

टाळूवरून आपल्या केसांचा प्रकार ठरत असतो. तुमचे केस कलर केलेले, कुरळे, सतत गुंतणारे असतील. पण मुळात टाळूची त्वचा सर्वसाधारण, कोरडी आणि तेलकट अशा तीन प्रकारांत मोडते.

केसांचा प्रकार ओळखण्यासाठी

टाळूवरून केसांचा प्रकार ओळखणं अतिशय सोपं आहे. नॉर्मल केस तेलकट आणि चमकदार, कोरडी आणि तुटलेले नसतात. नॉर्मल केस कुरळे केले, कलर लावला तर आणखी उठून दिसतात. तेलकट आणि चमकदार केस लवकर चिकट होतात. तर टाळूच्या त्वचेला पुरेसं मॉइश्चर योग्य प्रमाणात मिळत नसेल तर केस कोरडी होतात. कोरडी केस तुटलेले आणि निस्तेज दिसतात.

केसांचं आरोग्य चांगलं राखण्यात टाळूची त्वचा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. टाळूची त्वचेची योग्य पद्धतीनं काळजी न घेतल्यास कोंडा होणं, केस गळणं, टाळूची त्वचा अधिक तेलकट किंवा अधिक कोरडी होणं, केस टोकाशी दुभंगणं इत्यादी समस्यांना तोंड द्यावं लागतं. टाळूची त्वचेचं आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही होतो.

टोकाशी केस दुभंगणं म्हणजे काय?

टाळूच्या उपत्वचेवरील संरक्षक थर निघून गेल्यामुळे केस निस्तेज आणि रोगट बनून टोकाशी दुभंगतात. बऱ्याचदा टोकाशी दोन ते तीन ठिकाणी ते दुभंगतात. कोरडी आणि कमजोर केसांमध्ये टोकाशी दुभंगण्याचा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो.

टोकाशी केस दुभंगण्यामागील कारणं:

टाळूची त्वचा आणि केस कोरडे असणे.

पुरेसं कण्डिशनर न मिळाल्यामुळे किंवा कण्डिशनरचा वापर न केल्यामुळे. (तेलकट केसांसाठी कण्डिशनर वापरू नये.)

हेअर ड्रायर अतिरीक्त वापर केल्यास आणि वारंवार हेअर स्टाइल केल्यामुळे.

नियमित ट्रिमिंग न केल्यास.

वारंवार केस कुरेळे करून त्यांना कलर केल्यास.

टोकाशी दुभंगलेले केस बरे होऊ शकतात. नियमित केस कापणं किंवा स्निप्पिंग हा टोकाशी दुभंगण्यावरील तात्पुरता उपाय आहे. परंतु वाढल्यानंतर पुन्हा केस टोकाशी दुभंगू लागतात. परंतु नियमित केस कापल्यामुळे किंवा आठ आठवड्यातून एकदा ट्रिमिंग केल्यामुळे केसांचं टोकाशी दुभंगणं कमी होतं. केसांवर वारंवार ब्लो ड्रायचा वापर करू नये. तसंच ब्लो ड्राय करताना ड्रायर केसांच्या अगदी जवळ नेऊ नये. केसांसाठी योग्य शॅम्पू निवडून त्यानेच केस धूवावे.

केस टोकाशी दुभंगू नये म्हणून बाजारात बरेच प्रोडक्ट उपलब्ध आहेत. हे प्रोडक्ट तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निवडा. टोकाशी केस दुभंगू नये म्हणून जेल, सिरम्स आणि कण्डिशनर अशा स्वरूपात बाजारात प्रोडक्ट उपलब्ध आहेत.

कोरडे आणि निस्तेज केस असणाऱ्यांच्या व्यक्तिंमध्ये टोकाशी केस दुभंगण्याची समस्या जाणवते. यासाठी नैसगिर्क उपाययोजना आहेत. केमिकल असलेल्या शॅम्पू आणि कण्डिशनरमुळे केस कोरडे होतात. म्हणून नैसगिर्क तत्त्व असलेल्या शॅम्पू आणि कण्डिशनर केसांसाठी वापरा. नैसगिर्क तत्त्व असलेले शॅम्पू आणि कण्डिशनर बाजारात सहज उपलब्ध होणारे आहेत. टाळूच्या त्वचा प्रकाराला योग्य ठरतील अशीच उत्पादनं वापरा. शॅम्पू किंवा इतर उत्पादनांवर त्यामध्ये कुठले घटक आहेत यांची नोंद केलेली असते. परंतु काही ग्राहक ते वाचण्याचे कष्ट घेत नाही. केस आणि टाळूच्या त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यापूवीर् त्यावरील माहिती वाचणं गरजेचं आहे.

टोकाशी दुभंगलेल्या केसांच्या समस्येसाठी शॅम्पू आणि कण्डिशनरमध्ये उपयुक्त ठरणारे घटक:

काबुली चणे, मेथी, तीळ – यामधून नॅचरल प्रोटीन मिळते.

आवळा, हिरडा – केसांच्या मुळांना टॉनिक मिळते.

ज्येष्ठमध – केसांच्या वाढीसाठी उपयुक्त

पळस – केस मजबूत होतात.

पपनस आणि कोरफड – केसांना आणि टाळूच्या त्वचेला यामधून पुरेसं मॉइश्चर मिळतं.

सूर्यफुल, कमळ आणि रोझमेरी – केस आणि टाळूच्या त्वचेसाठी उत्तम कण्डिशनर आहे.

माका – केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.

केस टोकाशी दुभंगू नये म्हणून काही टिप्स:

द्य कोरड्या केसामुळे आणि टाळूच्या त्वचेमुळे केस दुभंगतात. त्यासाठी केसांच्या आरोग्याला पोषक ठरेल असाच शॅम्पू वापरा.

चांगल्या दर्जाचा कण्डिशनर नियमित वापरा. कण्डिशनरच्या वापरामुळे केस मुलायम होतात. मुलायम केसांमध्ये गंुता कमी होतो.

केदार वृक्षाच्या फुलांमुळे केस मुलायम होतात. तसेच नैसगिर्क कण्डिशनर म्हणूनही उपयुक्त.

कृष्ण कमळामुळे केसांना उपयुक्त पोषक तत्त्वं मिळून केस मुलायम होतात.

केसांमधील गुंता काढण्यासाठी जाड दात असलेला कंगवा वापरा.

हेअर ड्रायरचा वापर कमीत कमी करा.

केसांची काळजी घेण्यासाठी त्यावर वेगवेगळे प्रयोग करू नका. तज्ज्ञांकडून आपल्या केसांचा प्रकार जाणून घ्या. आपल्या केसांना उपयुक्त प्रसाधनांचाच वापर करा.

Leave a Reply