Brendon Mccullum’s fielding

 

मॅक्युलमच्या जबरदस्त फिल्डिंगचा व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल

क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत अनेक थरारक प्रसंग पाहिले असतील. मग ते क्रिकेटमधील कॅच असो, वा दमदार बॅटिंग. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅण्डन मॅक्युलमची एका सामन्यातील फिल्डिंग ही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती. मॅक्युलमच्या फिल्डिंगचा हा व्हिडिओ सध्या यू-ट्यूबवर व्हायरल झाला आहे.

[ad name=”HTML”]

न्यूझीलंडमध्ये श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सात वन डे सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. यातील एका सामन्यात ब्रॅण्डन मॅक्युलमने कॅच पकडण्यासाठी मारलेली डाईव्ह थरारक होती. कॅच जरी सुटली असली तरी क्रिकेटप्रेमींकडून मॅक्युलमच्या डाईव्हची वाहवा होत आहे.

[ad name=”HTML”]

वन डे सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये मिशेल मॅक्लेनेगनचा बॉल श्रीलंकेच्या नुवान कुलशेखराने टोलवला. मॅक्युलमने जॉन्टी ऱ्होड्स स्टाईलने डाईव्ह मारली आणि झेल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅच सुटली, पण मॅक्युलमने चपळाई दाखवत बॉलरच्या दिशेने बॉल फेकला आणि कुलशेखरा रनआऊट झाला.

[ad name=”HTML”]

VIDEO

Leave a Reply