marathi lagna patrika wordings kavita – wedding cards

Here you will get information about how to write Lagna Patrika Nimantran or Wedding Invitation Amantran? Please check your self.

majakur lagnapatika

majakur lagnapatika

If you want more Lagna Patrika or Wedding invitation matter in Marathi then go here – पत्रीकेच्या अजून कवितांसाठी येथे क्लिक करा 

 

 

marathi lagna patrika matter7

majakur lagnapatika

marathi lagna patrika matter9[ad name=”HTML-1″]

marathi lagna patrika matter4marathi lagna patrika matter5marathi lagna patrika matter6marathi lagna patrika matter10 marathi lagna patrika matter11marathi lagna patrika matter12marathi lagna patrika matter13

How to increase platelet count in Marathi Platelet…

D-Company suffers yet another jolt as Sharad Shett…

Information about kite in marathi

shivaji maharaj rajmudra meaning in english

मराठी लग्नपत्रिका कशी लिहायची ते पहा येथे …

lagnapatrika content, lagnapatrika kavita, Marathi lagnapatrika, Comedy lagnapatrika, लग्नपत्रिका मजकूर, लग्नपत्रिका कविता, मराठी लग्नपत्रिका, विनोदी लग्नपत्रिका, lagna patrika format in marathi, marathi lagna patrika wordings, lagna patrika mayna, lagna kundali, lagna patrika matching, marathi lagna patrika format download, lagna chart, lagna patrika in english,

देहबोली – उभे राहण्याच्या पद्धतीतून व्यक्ती आणि स्वभावाची ओळख

मंत्र स्तोत्र उपासना सिद्धि कैसे प्राप्त की जा सकती है उसे जानने के लिये यहाँ क्लिक करें|

अजून लग्नपत्रिकेंच्या कवितांसाठी येथे या.

स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या.

19 thoughts on “marathi lagna patrika wordings kavita – wedding cards

  1. mala maja aaji ajobancha 60th wedding anniversary ahe ….tar mala invitation card sathi chanshi kavita havi hoti….please tumi compose karun deu shakata ka…

  2. mala lagnpatrikesathi ek asa format hawa ahe jyat ek vadil tyancha mulich klahanpanapasun varnan kartoy ti kashi lahanapasun mothi zali ani ata tya vadilana tyancha mulila nirop dyaychi vel aali ahe…as kahi majkur tumhi compose karu shakta ka…???

    • तो बाप असतो…
      तो बाप असतो…
      चांगल्या शाळेमध्ये
      पोरांना टाकायची धडपड करतो..
      donation साठी उधार आणतो,
      वेळ पडली तर हातापाया पडतो
      ……….तो बाप असतो

      कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो,
      स्वतः फाट्क बनियन घालून
      तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
      ……..तो बाप असतो.

      स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile
      घेऊन देतो,
      तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो,
      तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
      …….तो बाप असतो..

      love marriage करायला कोणी निघाल तर
      खूप चिडतो,
      “सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो,
      “बाबा तुम्हाला काही समजत का? “अस ऐकल्यावर खूप
      रडतो,
      ……..तो बाप असतो..

      जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो,
      माझ्या चिऊला नीट ठेवा
      असे हात जोडून सांगतो,
      …….तो बाप असतो..

    • ॥ 1 ॥
      खरच सांगतो तुला
      तू जन्माला येणार
      या साठीच माझा जन्म झाला
      खरे वाटत नाही तुला ?
      वादळवार्‍यात भिजणार्‍या
      बापाच्या नाडीचे ठोके
      मुलीच्या जातीला कळतात.
      मूल जन्माला येत,
      बाबा असतो तिशीत
      त्याला पुढचे सगळे
      दिसतेच असेही नाही
      मुली तुझे डोळेच
      त्याचा दिवा असतो अंधारात…
      दुथडीभरून पूर येतो घराभोवती
      त्याला काळजी वाटत नाही कसली
      तू त्याची होडी असतेस
      दोन हातांची…….
      बेरीज वजाबाकी
      गुणाकार भागाकार
      सगळे हिशोब
      चुकत गेले त्याचे
      जमले नाही त्याला
      गणित आयुष्याचे..

      तू कविता
      असतेस बाबांची
      गणित पुसून टाकता येते
      पाटीवरचे
      कविता लिहिली जाते हृदयात…
      तू दचकून

      chitra-1
      ॥ 2 ॥
      उठतेस
      झोपेतून
      मला स्वतःलाच
      आयुष्यातून उठल्यासारखे वाटते..
      आपले काही चुकले तर नाही ना?
      सहज चाळवते
      तुझी झोप
      तुला स्वप्नेही
      पडत असतील
      रंगीबेरंगी
      तू झोपेतून
      का दचकून उठतेस ?
      कळत नाही
      तुला आणि मलाही..

      ॥ 3 ॥
      ज्योतिषाने तुझी
      पत्रिका पाहिली
      कागदावर लिहून दिले
      हिच्या उजव्या हातावर
      पिंपळाचे पान आहे
      डाव्या हातावर
      आंब्याचे पान आहे
      कपाळावर मोगर्‍याचे
      ङ्गुल उमलेले आहे
      तुम्हाला कसलीच
      काळजी नाही
      थकून गेले
      तुमचे मन
      थकून गेला
      तुमचा चेहरा
      तरीही
      स्वप्नात येत राहतील
      पिंपळ पानाच्या सावल्या..

      ॥ 4 ॥
      चित्रकलेचे मास्तर
      तुला सांगायाचे
      चौकोनी कागदावर
      तू पतंग उडवताना
      कशी दिसतेस
      स्वतःचेच चित्र काढ..

      तुझा पतंग
      चौकोनी कागदावर
      कधी थांबलाच नाही..

      ॥ 5 ॥
      चिमणीचे पिल्लु
      गच्चीत येऊन थांबले

      पंख ङ्गुटल्यावर
      पाखरू उडून गेले

      तू वहीत
      त्याचे चित्र काढलेस
      चित्राखाली लिहीले

      वहीतल्या पाखराला
      पंख ङ्गुटत नाहीत.

      chitra-2

      ॥ 6 ॥
      बाप असतो
      जन्मतःच चित्रकार
      दररोज रेखाटत असतो
      एक एक चित्र..
      प्र्रत्येक चित्र
      निळ्या शाईने रंगवलेलं
      दुसरा कुठलाच रंग
      सापडत नाही बापाला
      निळे आभाळ
      स्वच्छ आभाळ
      असते त्याच्या मनात
      चित्रकाराशिवाय
      बापाला काहीच होता येत नाही…
      त्याने कवी व्हायचं ठरवलं तर
      दोन्ही डोळे भरून येतात..
      जग जात नाही
      कवितेजवळ
      कवितेच्या प्रत्येक शब्दाला
      मोजावे लागतात श्‍वास..

      बाप चित्रकार होतो…
      मनाच्या कॅनवासवर
      रंग भरत जातो
      प्रत्येक चित्राला
      शीर्षक असते
      मुलीच्या
      अंगाई गीताचे…
      ॥ 7 ॥
      मुलगी झिम्मा खेळते
      मुलगी सागरगोट्या खेळते
      मुलगी बुद्धिबळ खेळते…
      मुलगी खेळत
      असते खेळ
      जे बापाच्या अंगणात
      खेळता येतात.
      ती जाते
      अंगणाच्या बाहेर
      तिला आठवतात
      सगळे खेळ
      बापाचे अंगण
      सारवलेले असते
      मायेच्या हाताने..
      इथे तर तिला
      स्वतःलाच अंगण व्हावे लागते..

      ॥ 8 ॥
      बाप असतो
      कधी कधी
      अभिमन्यू
      तो अडकतो रिंगणात
      ााहेर कसे पडायचे
      कळत नाही त्याला..
      संध्याकाळी दिवेलागणीला
      तू वाट पाहत असतेस
      उंबरठ्यावर त्याची..
      त्याला सगळे आठवते
      त्याला रिंगण दिसतच नाही
      तू दिसतेस उंबरठ्यावर
      उभी असलेली..
      तो रिंगणातून
      कसा बाहेर पडला
      कुणालाच कळत नाही..
      दिवेलागणीला
      त्याला परतायचे असते
      तुझ्याकडे…

      झरीळी ला
      आयङ्गेल ढेुशी च्या
      रस्त्यावरून जाताना
      रिमझिमत होता पाऊस..
      तू घेतली एक छत्री माझ्यासाठी
      इथल्या पहिल्या पावसात
      ती मोडून पडली
      स्वप्नातच
      आयङ्गेल ढेुशीच्या जवळून वाहणार्‍या
      डशळपश च्या नदीत
      छत्री सोडून दिली..
      नदी सारे काही
      सामावून घेत असते
      इथे आणि तिथेही.
      स्वप्नात सारे प्रश्‍न सुटतात…


      दुपारी जावळीच्या उन्हात
      गारांचा पाऊस पडला..
      तू पाहिल्या नव्हत्या
      कधी गारा
      झेलल्या नव्हत्या
      ओंजळीत गारा…
      गारांचा पाऊस
      घेऊन गेलो
      आपण पुढच्या प्रवासाला..
      उन्हात गारांचा पाऊस
      नसतो कुणाच्या नशिबात ..
      तू उन्हावर रागावलीस का ?
      नाहीतर तो कसा
      आला असता
      आपल्या वाटेवर
      उन्हात गारांचा
      पाऊस घेऊन …


      मुलीचे कसे असते मन
      बापाला कोड असते क्षणोक्षणी…
      वाढता वाढता वाढते झाड
      आभाळाला मारते हाक..
      ङ्गुलून येते ङ्गुलासारखी
      पाखरू होते घरटयासाठी..
      रस्ता शोधता शोधता
      वाटेवर उभी रहाते..
      मागे वळून पाहता पाहता
      बापाला शोधत असते…

    • वडील, बाबा, पप्पा, daddy, पिता.
      लिहिण्याला, बोलण्याला खुप चांगलं वाटतं,
      पण आपण प्रत्येकजण सहजपणे, नेहमी, जाणून बुजून शब्द उच्चारतो, तो म्हणजे “बाप” होय होय “बाप”
      त्याच बापाविषयी थोडसं…।

      आई घराचं मांगल्य असतं, तर बाप घराचं अस्तित्व असतं,
      पण घराच्या या अस्तित्वाला खरच कधी आम्ही समझून घेतलंय का?
      वडिलांना महत्व असूनही, त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही.
      कोणताही व्याख्याता, त्यांच्याविषयी जास्त बोलत नाही, लिहित नाही
      पण कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त बोलत राहतो.
      संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलेलं आहे.
      देवादिकांनी आईचंच तोंडभरून कौतुक केलंय.
      चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते.
      पण बापाविषयी कुठंच फारसं बोललं जात नाही.
      काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा.
      समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही, पण चांगल्या पित्यांबद्दल काय?

      आईकडे अश्रुंचे पाट असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात.
      आई रडून मोकळी होते, पण सांत्वन बापालाच करावं लागतं.
      आणि रडणाऱ्यापेक्षा, सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो.
      कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना?
      पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं.

      रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते,
      पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहजपणे विसरून जातो
      आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही,
      स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं,
      आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींना आधार व्हायचं असतं,
      पत्नी अर्ध्यावरच सोडून गेली तरी, पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.

      जिजाबाईनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं ,
      पण त्यावेळी शहाजी राजांची ओढाताण सुद्धा लक्षात घ्यावी.
      देवकीचं, यशोदेचं, कौतुक अवश्य करावं,
      पण पुरातून डोक्यावरून पोराला घेवून जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा.
      राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल,
      पण वियोगात तडफडून मरण पावला, तो पिता दशरथ होता.

      वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलं कि त्यांचं प्रेम कळतं,
      त्यांची फाटकी बनियान पाहिली कि कळतं, आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियानला पडलीय.
      त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.
      मुलीला गाऊन घेतील, मुलाला नवीन pant घेतील,
      पण स्वतः मात्र जुनी pant वापरायला काढतील.
      मुलगा सलूनमध्ये २०-२५ रुपये खर्च करतो, मुलगी Beauty Parlour मध्ये तीसेक रुपये खर्च करते,
      पण त्याच घरातला बाप, दाढीचा साबण संपला म्हणून, आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडत असतो.
      अनेकदा तो नुसता पाणी लाऊन दाढी करतो.

      बाप आजारी पडला तरी, पटकन दवाखान्यात जात नाही.
      तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील, याची त्याला भीती वाटते.
      कारण पोरीचं लग्नं, पोराचं शिक्षण बाकी असतं, आणि घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं.
      ऐपत नसली तरी मुलाला, मेडीकलला, इंजीनियरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो.
      ओढाताण सहन करून, त्या मुलाला, दर महिन्याला पैसे पाठवले जातात.
      पण सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात कि,
      ते तारखेला पैसे येताच, मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात,
      आणि ज्या बापाने पैसे पाठवले, त्याच बापाच्या नावाने एकमेकांना हाका मारतात, वडिलांची टिंगल करतात.

      ज्या घरात बाप आहे, त्या घराकडे वाईट नजरेने कोणीही बघु शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो.
      तो जरी काही करत नसला, तरी तो त्या पदावर असतो, आणि घरच्यांचं कर्म बघत असतो.
      कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं, पण बाप कधीच बाप होणं टाळत नाही.
      आईच्या असण्याला किंवा आई होण्याला बापामुळेच अर्थ असतो.

      कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते,
      कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते,
      पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप, कुणाच्याच लक्षात येत नाही.
      पयलीटकरणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची कुणीही दखल घेत नाही.

      चटका लागला, ठेच लागली, फटका बसला तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो,
      पण हायवेला रस्ता ओलांडताना एखादा ट्रक जवळ येऊन अचानक ब्रेक लावतो, तेव्हा, “बाप रे” हाच शब्द बाहेर पडतो.
      कारण छोट्या – छोट्या संकटांसाठी आई चालते, पण मोठी मोठी वादळं पेलताना बापच आठवतो.
      कोणत्याही मंगल प्रसंगी, घरातील सर्व मंडळी जातात, पण मयताच्या वेळी बापालाच जावं लागतं.

      कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नाही,
      पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो.
      तरुण मुलगा उशिरा घरी येतो, तेव्हा त्याची आई नाही, बापच जागा असतो.
      मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
      घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप, खरच किती ग्रेट असतो ना?

      वडिलांचं महत्व कोणाला कळतं,
      लहानपणी वडील गेल्यावर, अनेक जबाबदाऱ्या लवकर पेलाव्या लागतात,
      त्याला एका एका वस्तूसाठी तरसावं लागतं.
      वडिलांना खऱ्या अर्थाने समझून घेते, ती त्या घरातली मुलगी.
      सासरी गेलेल्या, अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला, बापाशी फोनवर बोलताना बदललेला आवाज एका क्षणात कळतो.
      मग ती अनेक प्रश्न विचारते.
      कोणतीही मुलगी, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून, बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोल्यावर चढते.
      मुलगी वडिलांना जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असच आपल्याला जाणावं, हीच बापाची किमान अपेक्षा असते …!!!

      • dear admin,
        please mala maza bahinicha lagn ahe, tyasathi wedding card madhe lihnyasathi simple n 4-5 line cha massage dya na

        thanks

    • लक्षात नसलेला बाप
      स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारीअशा अनेक ओळी, कविता, चारोळ्या, तुम्ही ऐकल्या असतील वाचल्या असतील.एवढेच नाही तर आई या विषयावर आपल्या थोर लेखकांनी पुस्तकच्या पुस्तक लिहून ठेवली आहेत आणि तुम्हाला आठवतअसेल की आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला आपल्या बाई किंवा गुरुजींने पण आपल्याला आई ह्याच विषयावरच निबंध लिहायला किंवा भाषणे बोलायला सांगितली असतील. अशी ही आहे आईची महती आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत वाचत आलो आहोत. काय चुकीच आहे त्यात, आई आहेच मुळात एवढीश्रेष्ट.
      पण आईला महत्व देता देता आपण आपल्या बापाला म्हणजेच वडिलांना कधी विसरलो ते समजले देखील नाही. वडील, पप्पा, डॅडी, बाबा हेच शब्द ऐकायला किती बरे वाटतात पण ह्याच शब्दांची जागा आता एका ‘बाप’ या शब्दानी घेतली.आपण एकाध्या ला विचारताना सहज विचारतो की अरे तुझ्या बापाचे नाव काय ? पोरा पोरानं मध्ये आपण एकाध्याला सहज त्याच्या बापाच्या नावाणे चिडवतो किंवा हाक मारतो पण मुळात आपण हेच विसरतो की त्याच बापामुळे आपली आज ओळख आहे अस्तित्व आहे. काही महारथी पोर आपल्या बापाचा उल्हेख ‘हिटलर’ म्हणून देखील करतात ते बोलताना सहजच बोलतात की ‘अरे आज घरी शांतता आहे कारण आमचा हिटलर घरात नाही’. तोच बाप घरी आला की बोलतात आला हिटलर घरात.
      खरचं का हा बाप आहे एवढा वाईट ? हा प्रश्न तुम्हीच तुमच्या मनाला विचारा. दारू पिणारे आणि दारू पिऊन शिव्या देणारे, मारणारे बाप देखील असतील ना. नाही कुठे बोलतो मी, पण शंभरातले दोन टक्केच असतील. आपण आता पर्यंत नाण्याची एकच बाजू बघत आलेलोआहोत, पण ह्या बापाची दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्नच कधी केला नसावा किंवा गरजच वाटली नसावी.
      आई घराचे मांगल्य असते पण बाप त्या घराचे अस्तित्व असतो पण ते अस्तित्वआपण मान्यच करत नाही. उलट त्या अस्तित्वाची आपल्याला एका प्रकारे भीती वाटते किंवा त्रास होतो. पुराणात पण आईलाच जास्त महत्व दीले गेले आहे. तिच्यावरचं कविता आणि श्लोक लिहिले गेले आहेत. जिजाऊणे शिवाजी घडवला पण त्या साठी शहाजीने मात्र जीवाचे रान केले. श्रीकृष्णातील देवकी व यशोधा आपण पहिल्या पण भर पावसातून श्रीकृष्णाला आणलेल्या वासुदेवाला मात्र आपण विसरलो. राम हा कौसल्याचा पुत्र असला तरी पुत्र शोकाने मात्र दशरथच मरण पावला. हे फार कमी लोकांनाच माहिती आहे.
      आईकडे अश्रूंचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात. रडणारी आई सर्वांनाच दिसते पण आतल्याआत तडफडणारा बाप कोणाला दिसत नाही. आई रडून मोकळी होते पण सांत्वन मात्र वडलांनाच करावे लागते. शेवटी जोती पेक्षा समईच जास्त तापते ना ? तरी पणजास्त महत्व मात्र जोतीलाच मिळते. बिचाऱ्या या बापाला स्वताचा बाप मेला तरी रडता येत नाही, का तर लहान भावंडाना आधार द्यायचा असतो. स्वताची आई गेल्यावर लहान बहिणींना साभाळायचे असते. एखाद्या लग्न सोहळ्याला आपण सर्व जातो पण कोणाच्या अंत यात्रेला बापालाच जावे लागते. स्वताची पत्नी सोडून गेली तरी काही बोलता येत नाही कारण लहान पोरांना सांभाळायचे असते. आपल्या खेळण्या-बागडण्याच्या वयात लहानपणीच शिक्षण सोडून स्वताच्या भावनडांची आणि घराची जवाबदारी आपल्या नाजूक खांद्यावर घेण्याचे दु:ख काय असते ते फक्त या बापालाच माहिती असते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप मात्र आपण विसरतो.
      वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलेकी त्यांचे प्रेम कळते आणि त्यांची फाटकी बनियान पाहून कळते, आपल्या नशिबाची भोके त्यांच्या बनियानला पडलि आहेत. वडलांचा दाडी वाडवलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलगा सलून मध्ये जाऊन पन्नास-साठ रुपये खर्च करेल मुलगी दहा वेळा ब्युटी पार्लर मध्ये जायील, पण तोच बाप दाडीचा साबनसंपला तर अंगाचा साबण लावून दांडी करतो. तो आजारी पडला तर कधी लगेच डॉक्टरकडे जात नाही, त्याला आजारी पडण्याची भीती मुळीच नसते पण काळजी असते ती डॉक्टर घरी बसून आराम करायला सांगेल याची. तो पोरांना दर महिन्याला कपडे घेयील बायकोला महागातली साडी घेयील पण स्वता मात्रजुनेच कपडे वापरेल. का ? तर फक्त महिन्याचा बजेट सांभाळण्यासाठी. पोराला पोरीला अयपत नसेल तरी इंजीनीयरिंग, मेडिकलला घालेल. दर महिन्याला न चुकता पैसे देखील पाठवे. पण सर्वच नसले तरी काही कारटीत्याच पैशानी परमीट रूम मध्ये मित्रानां पार्ट्या देतात. घरामध्ये कोण जर खरच बापाला ओळखत असेल तर ती असते त्याची लेक म्हणजेच पोरगी. पण ती पण शेवटी कुणाच्या प्रेमात पडली तर तीही ह्या बापाल विसरते आणि त्याला सोडून सासरी निघून जाते. बाप सहसा श्रीमंत पोरीच्या घरी जात नाही. पण गरीब मुलीच्या घरी महिन्यातून एक तरी चक्कर नक्कीच मारेल. पोराला चांगली नोकरी मिळावी म्हणून साहेबाचा उंबरठा झिजवणारा बाप देखील हाच असतो. पण बायको आल्यावर बापाला वृद्ध आश्रमात पाठवणारा आणि बायकोच्या हातात पगार ठेवणारा पोरगा देखील तोच असतो. चटका बसला ठेचलागली तर आईग…. असा शब्द लगेच बाहेर येतो पण एखादा ट्रक समोर आला तर बापरे चं शब्द बाहेर येतो म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टीनं साठी आई चालून जाते पण मोठ्या गोष्टीनं साठीबापच लागतो. पोरगा पास झाल्यावर त्याचे कौतुक करणारी आई मात्र दिसतेपण गुपचूप पेडयांचा पुडा आणणारा बापकोणाला दिसत नाही.
      शेवटी काय तर कोणाचा मुलगा होणे टाळता येत नाही पण बाप होणे टाळता येते पण तो तसे करत नाही. जो पर्यंत बाप आहे तो पर्यंत त्या आईला महत्व आहे, बाप घरात असलेल्या घरात कोण वाकड्या नजरेने बघत नाही. का तर तो त्या घराचा कर्ता असतो वडीलधारा असतो. तो काही करत नाही पण घराला आणि घरातल्यांना एकत्र धरून असतो. म्हणूनच बाप बाप असतो. तरी पण या बापाला आपण अस का विसरतो ?

    • नदीवर धुणी धुण्याची जागा
      “नदीवर कुणी पोरं अंघोळ करीत असतील. कुणी बायका-मुली धुणं धुवत असतील आणि कुणी आल्या असतील पाणी भरायला.तिथेही धुणी-आंघोळी चालल्याच असतील आणि पाणी भरायला घागर घेऊन पुष्कळजणी येत-जात असतील.

      खरं तर…..
      लक्ष्मीबाईंच्या कवितेत अशा कुठल्या पाणोठय़ाचं वर्णन नाहीच. नावही नाही कुठल्या ठिकाणाचं. कुणी एक कुणा एकीशी बोलते आहे. पण बोलणारी प्रौढ असावी आणि ऐकणारी लहान. तरीसुद्धा हा संवाद पाणोठय़ाजवळचाच आहे.
      ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे
      तू उभी! लागले कुठे कुठे तव डोळे?
      कुणी लहान मुलगी पाण्यानं भरलेली घागर घेऊन निघाली आहे. घागर भरली आहे. म्हणजे पाणोठय़ावरून मुलगी परत निघाली आहे. पाणी भरून घेऊन निघाली आहे. ते काम तिचं नेहमीचंच असणार. सवयीचं असणार. रोजच तशी ती तिथे येत असणार. वय अगदी लहान असणार तिचं, पण अगदी चार-सहा वर्षांच्या चिमुरडय़ा मुली धाकटय़ा भावंडांना कडेवर घेऊन सांभाळतात आणि कष्टाची न झेपणारी कामंही करतात. हे तर सार्वत्रिकच दृश्य आहे की!
      पण तसं काम करणाऱ्या मुलीला काळाच्या एका मागच्या वळणावर एक विसाव्याची जागा होती. शरीराच्या कष्टांचीच खरं तर ती जागा, पण मनाच्या विसाव्याची. पाणोठा! तिथे दहा घरच्या बायका पाणी भरायला किंवा धुणं धुवायला यायच्या. एरवी माजघरापुढे पाय नाही टाकता यायचा. पण पाणोठा खुला असायचा. एकमेकींचं सुख-दु:ख कळायला, खुशाली कळायला तीच तेवढी जागा असायची आणि निकराच्या वेळेला उडी घेऊन आयुष्य संपवायचीही तीच वाट असायची.”
      -अरुणा ढेरे

      ‘स्मृतिचित्रे’ हे मराठी आत्मचरित्रांचा मानदंड असलेलं पुस्तक आहे. लक्ष्मीबाई टिळकांचं हे अजर पुस्तक केव्हाही उघडावं आणि कोणत्याही पानापासून वाचावं. त्यांच्या कविताही प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या काही स्मृतिचित्रांसारख्या पुन:पुन्हा आठवत नाहीत. पण अधूनमधून एखाद्या वेळी त्यांची एक कविता मात्र आठवते. त्यातल्या घरगुती जिव्हाळ्यासाठी आठवते आणि आठवते तेव्हा अगदी पोटातून उमाळ्याने आठवते.
      काळाच्या प्रवाहात वाहण्याची अपरंपार गती घेण्याअगोदरचं वळण आहे या कवितेत. तिथे त्या वळणावर बायका सकाळची कामंधामं आटोपताहेत. नदीवर कुणी पोरं अंघोळ करीत असतील. कुणी बायका-मुली धुणं धुवत असतील आणि कुणी आल्या असतील पाणी भरायला.
      किंवा असेल हे एखाद्या विहिरीवरचं दृश्य. तिथेही धुणी-आंघोळी चालल्याच असतील आणि पाणी भरायला घागर घेऊन पुष्कळजणी येत-जात असतील.
      खरं तर लक्ष्मीबाईंच्या कवितेत अशा कुठल्या पाणोठय़ाचं वर्णन नाहीच. नावही नाही कुठल्या ठिकाणाचं. कुणी एक कुणा एकीशी बोलते आहे. पण बोलणारी प्रौढ असावी आणि ऐकणारी लहान. तरीसुद्धा हा संवाद पाणोठय़ाजवळचाच आहे.
      ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे
      तू उभी! लागले कुठे कुठे तव डोळे?
      कुणी लहान मुलगी पाण्यानं भरलेली घागर घेऊन निघाली आहे. घागर भरली आहे. म्हणजे पाणोठय़ावरून मुलगी परत निघाली आहे. पाणी भरून घेऊन निघाली आहे. ते काम तिचं नेहमीचंच असणार. सवयीचं असणार. रोजच तशी ती तिथे येत असणार. वय अगदी लहान असणार तिचं, पण अगदी चार-सहा वर्षांच्या चिमुरडय़ा मुली धाकटय़ा भावंडांना कडेवर घेऊन सांभाळतात आणि कष्टाची न झेपणारी कामंही करतात. हे तर सार्वत्रिकच दृश्य आहे की!
      पण तसं काम करणाऱ्या मुलीला काळाच्या एका मागच्या वळणावर एक विसाव्याची जागा होती. शरीराच्या कष्टांचीच खरं तर ती जागा, पण मनाच्या विसाव्याची. पाणोठा! तिथे दहा घरच्या बायका पाणी भरायला किंवा धुणं धुवायला यायच्या. एरवी माजघरापुढे पाय नाही टाकता यायचा. पण पाणोठा खुला असायचा. एकमेकींचं सुख-दु:ख कळायला, खुशाली कळायला तीच तेवढी जागा असायची आणि निकराच्या वेळेला उडी घेऊन आयुष्य संपवायचीही तीच वाट असायची.
      लक्ष्मीबाईंच्या कवितेतली लहानगी पोर भरली घागर घेऊन घरी निघाली आहे परत. पण तिचं मन थाऱ्यावर नाही. बैलगाडीचा खडखड आवाज ऐकूनही तिच्या छातीत धडधड होते आहे. चेहऱ्यावर सुखाच्या आठवणींचा आनंद आणि लगेच कसलीशी खिन्नता येऊन जाते आहे.
      तिला तसं पाहाणारी प्रौढा तिच्या त्या अवस्थेनं हेलावली आहे. एवढय़ा लहान वयात या मुलीच्या मागे संसाराचे कष्ट लागले आहेत. हे वय तिचं खेळाचं. पण लग्न होऊन सासरी आल्यावर खेळ कुठले?
      तू अल्लड साधी पोर! लाडके,
      गुरुजने कल्पिली थोर! लाडके,
      तुज कशास हा संसार! लाडके,
      हा दोन दिवसतरि टळो, म्हणुनिया झाले
      मन अधीर, गेले माहेरा बघ गेले
      आपण भाऊबीजेला तरी माहेरी जाऊ आणि प्रौढपणाचं ओझं फेकून देऊन मनसोक्त खेळू, असं तिचं मन म्हणत आहे. लक्ष्मीबाईंनी कवितेतल्या या लहानगीला माहेरी नेण्यासाठीच मूळ पाठवलं आहे. भाऊ किंवा वडील नव्हे, तर त्या छोटीची मावशी तिला न्यायला आली आहे. आईइतकीच तिचं मन ओळखणारी मावशी! मावशी-भाचीचं नातं लक्ष्मीबाईंनी या कवितेत कसं चिरंजीव केलं आहे.
      ये हासत आता, आलिंगी मज बाळे
      मी तुझी मावशी, तुला न्यावया आले!
      भरली घागर डोक्यावर घेऊन, कुठेतरी नजर लावून उभी असलेली या कवितेतली लहान मुलगी म्हणजे आपल्या सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थेच्या पटावरचं एक चित्रच आहे. लवकर लग्न होत असत. त्या काळात सासरघरी- अगदी सुखाच्या आणि प्रेमळ अशा सासरघरीसुद्धा मुलीच्या डोक्यावर एक भरली घागर असायचीच. प्रत्यक्षात दिसणाऱ्या, असणाऱ्या पाण्याच्या ओझ्याची घागर बहुतेकींच्या डोक्यावर असायची आणि डोळ्यांना न दिसणारी अशी सासरच्या घराचे रीतिरिवाज पाळण्याची, नातेसंबंध ओळखून वागण्याची, नवऱ्याचा भला-बुरा स्वभाव स्वीकारण्याची आणि एकूणच स्त्री म्हणून असणाऱ्या सर्व प्रकारच्या मर्यादांची ती काठोकाठ भरलेली घागर प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला वाहावीच लागायची.
      खरं तर आजही तसली घागर वाहणाऱ्या पुष्कळ मुली आहेत आणि ज्या रूढार्थानं स्वतंत्र, समजूतदार आई-बापांच्या लेकी आहेत, त्याही आपापल्या घागरीतून आणखी कसली-कसली ओझी वाहत आहेतच की! कुणी स्त्रीकडे पाहाण्याच्या समाजाच्या दृष्टीचं ओझं वाहते, कुणी परंपरेनं घालून दिलेल्या, पण आज कालबाहय़ झालेल्या मर्यादांचं ओझं वाहते. कुणी अंधश्रद्धेच्या खोल संस्कारांचं वाहते आणि कुणी स्त्रीच्या देहाला भोगवस्तूच मानणाऱ्यांच्या वासनांध वृत्तीचं वाहते- घागर तर आजही भरलेली आहेच.
      तस्लिमा नसरिन ज्या समाजात वाढली, त्या समाजात तर लहान मुलगी असतानाचं मर्यादांचं ओझं, मोठी मुलगी झाल्यावर जराही कमी झालेलं नसतं. लक्ष्मीबाईंनी छोटय़ा मुलीच्या डोक्यावर एक घागर पाहिली. तस्लिमा पायात अडकवलेलं अदृश्य बंधन पाहते. तिनं लिहिलेले आणि मृणालिनी गडकरींनी भाषांतरित केलेले शब्द असे आहेत-
      मला कोणी कधीच जाऊ दिलं नाही मैदानापलीकडे
      पुष्कळ वेळा केला प्रयत्न
      पण मधेच अचानक पकडलं त्यांनी मला
      आणि नेलं फरफटत पुन्हा घराकडे
      त्यांनी तिला दाखवली भीती बिबटय़ाची आणि झाडाच्या बुंध्याला विळखा घालून बसलेल्या जहरी सर्पाची. तेव्हा ती निरागस पोर रड रड रडली होती, कारण मैदानापलीकडे तिचं स्वप्न होतं..
      मैदानापलीकडे होतं राणीचं तळं,
      गुलमोहराचं रान, पांढरीशुभ्र कबुतरं
      चांदण्यासारखे चमचमणारे कितीतरी काजवे
      आणि रंगीबेरंगी फुलपाखरं..
      निरागस मुलींच्या कल्पनेच्या देशात आपण जाऊ देत नाही त्यांना. आपण समाज घटक म्हणून आपणच जाऊ देत नाही त्यांना एका मर्यादेपलीकडे. मग स्वप्नातही तस्लिमा पाहाते निळ्या पतंगांऐवजी हडळीचे पाय आणि नरभक्षकांचे देश आणि ती जेव्हा मोठी होते, समजूतदार होते, तेव्हा तर स्वप्नाऐवजी प्रत्यक्षच तिला दिसतात विषारी साप, राक्षसांची घरं आणि रानटी रेडे.
      मुलीला मुलग्यांप्रमाणेच आपलं बालपण निरागसपणे भोगता येऊ नये, ही केवढी उसवून टाकणारी गोष्ट आहे! त्या जरा कुठे मोठय़ा होऊ लागतात की, त्यांना जाणीव करून द्यावी लागते भोवताली वावरणाऱ्या अशुभाची, विपरिताची, विकृतीची, वासनांधतेची.. आणखीही कशाकशाची! त्या मुली आहेत, मुलगे नव्हेत; हे समजून घ्यावंच लागतं त्यांना नाईलाजानं!
      रेखा ठाकूर नावाच्या कवयित्रीची ‘अदृष्ट’ नावाची एक सुरेख कविता आठवते.
      अंगणात तोरडय़ा छुमछुमल्या
      आणि दिवाळीच्या लखलखत्या पहाटेसारख्या पोरी
      घरात उगवल्या..
      त्या बिटुकल्या आधी पाळण्यातल्या बाळाकडे धावल्या, मग मनीमाऊला कुस्करत, कसले कसले खाऊचे बकाणे भरत त्या परसदारी झपूर्झा घालायला गेल्या. मग मामानं लपवलेला फुलझाडांमधला पाईप हेरून एकमेकींना त्यांनी मनसोक्त भिजवलं आणि ओले फ्रॉक नेम धरून दोरीवर उडवून देत, आजीचं दटावणं गाभुळ्या चिंचेसारखं चाखत चाखत बिटक्या चड्डय़ांवरच त्या हिंडणभोवऱ्या भिरभिरत राहिल्या. कोवळ्या सोनकणसासारख्या उत्साहानं भरलेल्या त्या पोरी मग पुन्हा आल्या तशा आपल्याच नादात गेल्यासुद्धा!
      आजीनं डोळ्यांना लावलेला पदर तरी
      कोणाला कसा दिसावा?
      पोरींच्या खूप मागे
      नजरेच्या टप्प्यातदेखील न येणारा
      संथपणे सरकणारा अजगर
      आजीच्या अधू डोळ्यांनी मात्र
      नेमका टिपलेला असतो..
      मुलींचं बालपण गिळण्यासाठी संथपणे सरकत येणारा अजगर! तो अजगर मनमुक्ततेवर, निरागसतेवर घाला घालणाऱ्या काळाचाच फक्त नव्हे, वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या संवेदनांच्या निबरपणाचाच फक्त नव्हे, हुंदडणारे पाय आणि भिरभिरणारे मनाचे पंख छाटून टाकणाऱ्या मर्यादांचाच फक्त नव्हे.. जगाकडे पाहाणारे स्वच्छ, निरभ्र डोळे ओले करणाऱ्या भोवतालच्या कठोर परिस्थितीचाच फक्त नव्हे.
      तो अजगर जगण्याच्या आनंदाला हळूहळू गिळून टाकणाऱ्या भीतीचा आणि दु:खाचा आहे. आजीचे डोळे अधू आहेत, पण अनुभव तीक्ष्ण आहे. तिला तो अजगर दिसतो आहे, पण कासावीस होऊन जपमाळ ओढत राहाण्यापलीकडे ती काही करू नाही शकत. पण मला खात्री वाटते, अगदी नक्कीच खात्री वाटते की, रेखाच्या कवितेतल्या दिवाळीच्या पहाटेसारख्या लखलखत्या पोरी उद्या मोठय़ा होतील, तेव्हा आपलं निरागस बालपण हिरावून घेणाऱ्या जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यामधल्या निदान काहीजणींजवळ एक धारदार नकार असेल आणि गाभुळ्या चिंचेसारख्या आनंदाच्या प्रत्येक गोष्टीसाठी जिवंत, नाचरा होकार!
      अशा होकार-नकारांचं सामथ्र्य त्यांच्यात निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न करीत राहाणं, हे मात्र आपलं सगळ्यांचं काम आहे.

  3. लोकं लग्न का करतात?

    लेखाचे हे हेडिंग वाचल्यावर तुमच्या पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं लग्न का करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं असतं का?

    जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड पॉकेट मनी आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.

    नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग जर मुलगी असेल तर आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं हिला असं? आता लवकर उजवून टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते. स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू लागतात.

    मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,” काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.

    इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून आपणही करायचं का? सोशल अ‍ॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं म्हणजे आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय करायचं?

    तिच्याही मनात साधारण असेच विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??

    दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण हिम्मत दोघांचीही होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते. मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!

    पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं, आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको? बरोबरच्या मित्रांच्या पण लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र ढीम्म पणे बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.

    असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते. मधल्या काळात , एक तर तिचे लग्न ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो .

    हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं? हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण पणे मुलांच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने मन तयार करत असतं.

    ****

    लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती ्दुसरया कोणाशी तरी लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

    दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.

    काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात, आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते, तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?

    पण याच गोष्टीवरून एक लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली, तरीही समाजातलं अ‍ॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.

    काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे सगळे लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर , आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.

    बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या एकटेपणातुन बाहेर पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते. अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.

    अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो, आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं असतात.

    दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते, जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!

    धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.

    या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला. सेक्स हा पण उद्देश आहेच. पण केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे. सेक्स साठी म्हणून कोणी लग्न करत नाही.

    जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील. त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.

    जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची बायको , अमिताभची सून, त्या बाळाची आई.. इतके काही झाली लग्नानंतर. हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.

    सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

  4. मराठीच्या विविध बोलींपैकी एक असलेली अहिराणी भाषा मुख्यत: खानदेशात म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये बोलली जाते. अहिराणीच्या भाषिक समृद्धीचा आढावा उपलब्ध लोकसाहित्यातून घेता येतो.

    उत्तर महाराष्ट्राचे जळगांव, धुळे, नंदूरबार हे जिल्हे खानदेश म्हणून आजही ओळखले जातात. पूर्वी मुंबई इलाख्याचे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश हे दोन भाग होते. पुढे हा भूभाग जळगांव, धुळे आणि नासिक या जिल्ह्यंच्या नावाने ओळखला जाऊ लागला. खानदेश हा परिसर पूर्वेला वाघूर नदी, पश्चिमेला चांदवडचे डोंगर, उत्तरेला सातपुडा पर्वताच्या उंचउंच रांगा आणि दक्षिणेला िवध्याद्री पर्वताच्या रांगा यांनी वेढलेला आणि दळणवळणाच्या दृष्टीने इतर भूभागापासून तुटलेला असा प्रदेश होता. हा भूप्रदेश म्हणजे खानदेश आणि या परिसरात बोलली जाणारी बोली ही खानदेशी. खानदेशी ही या प्रदेशाची बोली जी या प्रदेशातील सर्व जातीजमातींनी दैनंदिन व्यवहारासाठी स्वीकारली आहे. खानदेश म्हणजे अहिर देश – अहिरांचा देश. आणि अहिरांची बोली ती अहिर वाणी किंवा अहिराणी.

    खानदेशी बोली ही मुळात अहिर लोकांची अहिर वाणी म्हणजे अहिराणी बोली. या अहिराणीचा प्रभाव खानदेशभर, आणि म्हणून खानदेशातील बोली ही खानदेशी ह्य प्रादेशिक नावाने ओळखली जाते. अहिराणी ही केवळ अहिरांची बोली न राहता संपूर्ण खानदेशाची बोली झाली आहे, म्हणून अहिर (अहिराणी) या सामाजिक नावाने ती ओळखली जाण्यापेक्षा ती खानदेश (खानदेशी) या प्रदेशाच्या नावाने ओळखली जाते. (अर्थात या खानदेशी बोलीचे अनेक सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद पडतात.) अहिराणी- खानदेशी ही बोली आजही जळगांव, धुळे, नंदूरबार जिह्यत आणि औरंगाबाद व नासिक जिह्यंच्या काही तालुक्यांतून बोलली जाते. मेळघाटातील अमरावती, परतवाडा, चांदूर बाजार परिसरातील सुमारे पन्नास गावांतील गवळी लोक हीच बोली जतन करून आहेत. मात्र त्यांना अहिराणी बोली व खानदेश हा प्रदेश माहीत नाही. त्यांच्या परंपरा, रूढी, लोकसाहित्य हे अहिराणी बोलीतीलच आहे. मात्र ते तिला गवळी बोली म्हणून संबोधतात. आजवर अहिराणी बोलीच्या संशोधकांनाही या बोलीविषयीची कोणतीही कल्पना नव्हती. या अहिराणी व गवळी बोलीतील साधम्र्य वा एकरूपता ग्रिअरसन आणि अलीकडे झालेल्या डॉ. गणेश देवी यांच्या भारतीय भाषा सर्वेक्षणामधूनही सुटलेली आहे. ( या विषयीचा विस्तारित लेख Institute of Knowledge Engineering च्या Critical Enquiry Vol.VI. Issue IV Oct.- Dec 2014 मध्ये प्रकाशित झालेला आहे.)

    अहिराणीचा इतिहासच पाहावयाचा तर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांच्या साहित्यातसुद्धा अहिराणी बोलीचे असंख्य शब्द आढळतात. अहिर हे गोपाळ, गुराखी, गुरे राखणारे. अहिरांचा नंद, गोपाळ म्हणून रामायण महाभारतकालापासून उल्लेख आहेच. अहिरांच्या इतिहासाइतकाच अहिराणीचाही इतिहास हा जुना आहे. खानदेश हे नाव कान्ह देश, कान्हाचा देश, कृष्णाचा देश, किंवा महाभारतकालीन ऋषभदेश यावरून पडले आहे. अहिराणीचे लेखी पुरावेही काही शिलालेखातही मिळतात.

    इतर बोलीप्रमाणेच अहिराणी ही आपली संस्कृती, गोडवा जतन करून आहे. खानदेशात कानबाई ह्य दैवताची पूजा केली जाते. ‘कानबाईच्या वह्य’ ही परंपरागत लोकगीते गाऊन कानबाईची पूजा केली जाते. कानबाई- रानबाईचा उत्सव खानदेशात साजरा केला जातो. अहिराणी बोलीतील या कानबाईच्या ओव्या इतरत्र कुठेही आढळत नाहीत. खानदेशात प्रत्येक उत्सवाची आणि प्रसंगाची लोकगीते ही स्वतंत्र आहेत. त्यातून खानदेशातील उत्सवांचा, खानदेशी संस्कृतीचा ठेवा मौखिक परंपरेने जतन केला आहे. लोकनाटय़, दंतकथा, – गोठ्डाय़ानी (खेडय़ातून गोष्ट सांगणारे) गोट (गोष्ट), विवाह गीते, मरणाच्या वेळेची रडण्याची पद्धती, मोटेवरची गाणी, कृषिक्रियेच्या वेळी गाणी, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी, म्हणी यातून खानदेशची संस्कृती अहिराणी बोलीने आपल्या भाषिक वैशिष्टय़ांसह जतन करून ठेवली आहे.

    अहिराणी बोलीतून आता चर्चासत्रेही होऊ लागली आहेत. अहिराणीतून अलीकडे अहिराणी बोलीभाषेतून कविता, कथा, कादंबरी, नाटक हे साहित्य प्रकार हाताळले जाऊ लागले आहेत. अलीकडे फेसबुक व व्हाट्स अ‍ॅपमध्ये अहिराणी, खानदेशी, खानदेश, अहिराणी बोली, इ. अहिराणीचे असंख्य असे समुदाय आढळतात. अहिराणीतून चित्रपटनिर्मिती, कथाकथन व काव्य वाचन यामुळे अहिराणी बोलीविषयीचे चित्र पार पालटून गेले आहे. या सर्वामुळे अहिराणीचा गोडवा हा सर्वदूर पोचण्यास मदत होते आहे.

    अहिराणी बोलीतील सौंदर्यस्थळे

    खानदेशातील प्रत्येक सण-उत्सव हा वैशिष्टय़पूर्ण आहे. खानदेशातील आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा मानला जातो. आखाजी म्हणजे अक्षय्य तृतीया. हा सण संपूर्ण स्वातंत्र्याचा आविष्कार असणारा सण. या सणाला मुली आपल्या माहेरी जातात. प्रत्येक मजुराला सुटी असते. या दिवशी तो मजूर कुणाच्याही बंधनात नसतो. सालदाराचे साल याच दिवशी ठरते. मालकांकडून सालदाराला गोडधोड जेवण मिळते. पुरुष या दिवशी जुगार खेळतात. महिला गावाजवळच्या आमराईत झिम्मा फुगडय़ा खेळतात, गाणी गातात, झोका खेळतात. गौराईच्या पाण्याला जाताना ‘मोगल’ सजवितात. आखाजीच्या दुसऱ्या दिवशी गौरी विसर्जनासाठी नदीवर जाऊन तेथे झिम्मा फुगडी्, गाणी, इ. आटोपल्यावर नदीच्या दोन्ही काठावरील दोन गावांच्या स्त्रिया परस्परांना शिव्या देत, परस्परांवर दगड फेकून घराकडे परततात. थोडक्यात ही आखाजी पूर्ण स्वातंत्र्याची, आखाजी शेतमजुरांची, आखाजी जुगार खेळणारांची, आखाजी स्त्रीमुक्तीची, आखाजी गौराईची, आखाजी पितरांची, आखाजी बलुतेदारांची, अशी ही आखाजी असते तिची तयारी एकेक महिना आधीपासून केली जाते. अक्षय्य तृतीयेला गायल्या जाणाऱ्या गीतांमध्ये रामायण, महाभारत, पौराणिक वा इतर उपदेशपर कथा गुंफलेल्या असतात.

    खानदेशात बोलली जाणारी अहिराणी बोली हे खरोखरीच गोडवा असलेले मधाचे पोळे आहे. हे प्रत्येक पोळे गोड अशा मधाने काठोकाठ असे भरलेले आहे. यात खानदेशातील सणउत्सवातील, जात्यावरील, विवाह प्रसंगातील, मोटेवरील अशा विविध प्रसंगांतील गीतांचा आणि म्हणी, उखाणे, आहाणे या सर्वाचा विचार करावा लागेल.

    मुलगी लग्न होऊन सासरी जाते. वडील मुलीला सासरी पोचवितात. लग्न जमविण्यापासून ते सासरी लेक नांदताना तिला दिल्या जाणाऱ्या नतिक पाठापासून ते तिचे सासू, सासरे यांचा स्वभाव, सासरवास यांचे वर्णन या लोकगीतांतून पाहू या.

    लाडकीवं लेक,

    तुन्हा लाड आसा कसा!

    गगनना चंद्र

    तूले धरी देवू कसा?

    (या लाडक्या मुलीला तिच्या हट्टापायी आकाशीचा चंद्र तरी कसा पकडून द्यावा?)

    लाडकीवं लेक,

    नांव तुन्ह दुर्गा बाई,

    चांद सारकी लेक,

    सूर्या सारका जवाई.

    (दुर्गा, लाडकी लेक ही चंद्राप्रमाणे तर जावई हा सूर्यासारखा आहे.)

    आंगनमां झाडू,

    झाडू आंगननं पटांगन,

    लेकनं मांगनं,

    सोयरा घाले लोटांगन.

    (मुलगी गुणी, सुंदर असल्याने आणि हा नातेसंबंध योग्य असल्याने या लेकीला मागणीसाठी सोयरा मुलीच्या वडिलांकडे लोटांगण घालतो.)

    लाडकी वं लेक,

    लाडकोडना जवाई ,

    आंदन म्हांगस,

    आंबा खालेनी गव्हाई.

    (लाडक्या लेकीच्या लग्नात, लाडका जावई आंबा, आंब्याची फळे, बहर लग्नातील भेट-आंदण म्हणून मागतो.)

    लोकेस्नी दिध्यात लेकी,

    दानास्न्या कंग्या देखी,

    पिताजीनी दिध्यात लेकी,

    या सोयराना वग देखी.

    (इतरांनी मुली देताना धनदौलत, वैभव पाहून दिल्या मात्र पित्याने सोयऱ्याचा वर्ग -जात, कूळ, वर्ण पाहून दिल्यात.)

    भाऊ करु याही,

    माले भाऊ याही साजे,

    पायमां पजन मन्ह तयघर वाजे.

    (भावाला व्याही करण्याचा मानस, तोच योग्य आहे. खानदेशात बहिणीच्या मुलाला भाऊ आपली मुलगी देतो.)

    पानीनी पाऊस

    डोंगर कसाना कयस?

    सिताना न्हानीवर

    राम शिकार खेयस.

    (तहान- भूक, ऊन-वारा- पाऊस, डोंगराचा चढउतार हे कसले काय कळते? राम शुद्ध हरपून सीतेच्या न्हानीजवळ शिकार खेळतो आहे.)

    बारीक पिटनी भाकर

    गई कचेरीले,

    आस्तुरी पासीन तेज

    चढस पुरुसले.

    बारीक पिटना सिदा

    गया गोसाईले,

    आस्तुरी पासीन महिमा

    चढस पुरुसले.

    (पत्नीला अस्तुरीची उपमा दिली आहे. पुरुषाची महिमा, वा त्याचे वैभव हे त्याच्या या अस्तुरीसारख्या पत्नीमुळे त्याला प्राप्त होत असते. पत्नीला अस्तुरीप्रमाणे न म्हणता अस्तुरीच म्हटले आहे.)

    भरतारनं सूक,

    कोरा रांजननं पाणी,

    कितलं उपसू पानी

    माले वरजेना कोन्ही.

    (भ्रताराचे सूख नव्या, कोऱ्या रांजणाच्या थंडगार पाण्यासारखे आहे. ते मी कितीही उपसून काढले -ते मी कितीही उपभोगले तरी मला कुणीही मनाई करीत नाही. वरजनं = वज्र्य करणे, मनाई करणे.)

    सासू करे सासरवास,

    नंदा करती झाक झुक,

    नादान लेक मन्ही,

    भरतारनं सूकं मोठं.

    (सासू, नंदा कितीही सासूरवास करीत असल्या तरी माझ्या लेकीला भ्रताराचे- नवऱ्याचे सुख हे खूप मोठे आहे.)

    सासू आत्याबाई

    तुम्हना पदरले ओवा,

    मी जास माहेराले,

    मन्हा रामले जीव लावा.

    (सासू ही आत्याच असते. वडिलांची बहीणच असते. आत्याबाई मी काही दिवस माहेरी चालले, माझ्या रामाला माझ्या माघारी जीव लावा, नीट सांभाळा, प्रेम द्या.)

    नका म्हनू नार,

    भरतार आला हाती!

    इच्चू त्या डंख देती,

    सांगता लह्यऱ्या येती.

    (हे नारी तू – आपला नवरा मुठीत आला अशा भ्रमात राहू नकोस, नवरा हा िवचवासारखा असा डंख देतो की वेदनेने शुद्धच हरपते.)

    दयन मी दवू जशी हारन पयस,

    माय तुन्ह दूद मनगटी खेयस

    (मी हरणाच्या वेगाने फिरणाऱ्या जात्यावर दळते , ह्या चपळतेचे कारण माझ्या मनगटात मातेचे दूध खेळते आहे.)

    सासूना सासरवास,

    काय आयकू बारीमास,

    बाप कसा म्हणे,

    जग दून्याना रहिवास.

    (सासूचा सासरवास किती दिवस सहन करायचा? असे मुलीने म्हणताच वडील सल्ला देतात ‘‘ हा तर जग दुनियाचा क्रमच आहे. त्यात वेगळे असे काहीही नाही. तो निमूटपणे सहन करावा.)

    सासू करी सासूरवास,

    नंदा करती कुरापती,

    चतुर भरतार,

    ग्यानं सांगती राती.

    (सासू सासरवास करते, नणंद ही कुरबुर करते. यातून मनशांती लाभावी, एकटेपणाची भावना येऊ नये म्हणून चतुर भ्रतार रात्रीचे वेळी ग्यान सांगतो, ज्ञान देतो, समजूत काढतो.)

    देरान्या जेठन्या,

    आपू एक ऱ्हावू,

    रांझनीनं पानी आपू

    चाऱ्हीझनी व्हाऊ.

    (सर्व देवराण्या – सर्व भावांच्या बायका- एकमताने घरात वागू, कोणत्याही कामाचा भार हा एकीवर पडू न देता चारही मिळून वाटून घेऊ. – देरानी= लहान दिराची राणी, जेठानी = नवऱ्याहून मोठय़ा भावाची बायको.)

    सासूनी सासरा,

    देव्हरा म्हातला देवं,

    तेस्ना जेवनमां

    कसा करु दुजाभाव.

    (सासू आणि सासरे हे देव्हाऱ्यातील देवांसमान आहेत, त्यांच्या जेवनात, आहारात मी कसा भेदभाव करु?)

    या सासर, वडील, आई, नवरा, यांच्याशी संबंधित ओव्या पाहिल्या. अहिराणी बोलीतील काही ओव्या ह्य मुलीने कसे वागावे ह्यासंबंधी नीतीपाठही देणाऱ्या आहेत. नतिक पाठ देणाऱ्या काही लोकगीतांच्या ओव्या पाहू.

    हासू नका नारी

    तुन्हा हासाना परकार,

    आसा उतरना

    तुन्हा चतुर भरतार.

    (परपुरुषासमोर बायकोने हसू नये. तू हसल्याने तुझा चतुर भ्रताराचा चेहरा लगेच पडला.)

    बाप कसा म्हणे पोरी,

    मरजीले ऱ्हायजो,

    पाटपोट झाकी पानी

    गिरनांनं व्हायजो.

    (बापाने लेकीला सासरी कसे वागावे हा सल्ला दिला आहे. सर्वाची मर्जी सांभाळ, आणि गिरणेचे पाणी वाहून आणतांना पाठ, पोट पदराने व्यवस्थित झाकून रस्त्याने चालत जा.)

    बोलूनी चालूनी

    आगय घालवा मनले,

    कोम्हायेल तोंड

    दिसू दिवू नई जनले.

    (एकलकोंडे न राहता आपल्या आप्तेष्टांशी, मित्रांशी बोलून चालून मनाला आगळ घलावी, मनाला विरंगुळा द्यावा. आपल्या चेहऱ्यावरील दु:ख – आपले कोमेजलेले तोंड- जगाला दिसू देऊ नये.)

    पाची पकवाननं जेवन,

    उल्टं झायं हूई माखीनं

    तानीया बाय मन्हा,

    वलससंद सोडी दे दासींनं.

    (जेवण तर पंचपक्वान्नाचे होते, मग उल्टी- ओकारी – का झाली ? कदाचित आहारात माशी पडल्यानेही झाली असेल. पण लाडक्या मुली तू दासीची संगत सोडून दे. मुलीच्या चारित्र्याविषयी संशयही अशा मोजक्या शब्दांतून मांडला आहे.)

    गरवाना जाब

    नको देवू तू गांध्यारी,

    थोडा दिननं चांदनं,

    बहू दिननी आंध्यारी.

    (हे स्त्रिये तू गर्वाने उत्तर देऊ नकोस. गर्व हा जास्तीचा काळ टिकत नसतो. चांदण्या रात्रींचा काळ हा अंधाऱ्या रात्रींच्या काळाहून फार कमी असतो. म्हणून तुझी ही गर्वाने वागण्यासारखी परिस्थिती ही क्षणिकच राहणारी आहे.)

    गरवं गुमानं

    आसू दिवू नई जीवले,

    गीऱ्हानं लागसं,

    चंदरं सारका देवले.

    (कुणीही गर्वाने वागू नये, चद्रांलाही एक दिवस ग्रहण लागतेच ना?)

    धनं संपत्तीनी वाट,

    मन्हंशे बोबडी बोलनी,

    दुफारनी छाया

    एक घडीमां कलनी.

    (श्रीमंतीच्या तोऱ्यात ती बोलताना चेष्टेखोरपणे, बोबडेपणे बोलली. पण ही श्रीमंती दुपारच्या सावलीसारखी आहे. ती क्षणात पुढे सरकते, कलते.)

    नको म्हणू नार,

    मन्हंशे आसं कोन्हं नई,

    लंकाना रावनं,

    त्यान्हबी निभनं नई.

    (हे नारी, माझे वैभव आहे असे कुणाचेही नाही असा तोरा तू बाळगू नकोस, सोन्याची लंका असणारा रावण, त्याचाही निभाव लागलेला नाही. तर तुझे काय?)

    नका म्हनू नारं,

    मन्हशे आसं कोन्हं नई,

    चौदा चौकडानी लंका,

    एक रातमां बई गयी.

    (गर्वाचे घर खाली असते. रावणाची सोन्याची लंकाही एका रात्रीत जळून नष्ट झाली.)

    स्त्रीचे आपल्या कुटुंबावरील, नवऱ्यावरील प्रेम काही लोकगीतांच्या ओव्यांमधून प्रतििबबित होते.-

    देशी देवराया

    धनं संपत्ती थाडी, थाडी,

    कडय़ावर बाय अन

    भायेर नंदिस्नी जोडी.

    (देवा देशील तर दे थोडे वैभव – कडेवर बाळ खेळू दे आणि बाहेर दाराशी एक बलांची जोडी असू दे.)

    देशीतं देवराया,

    तू देशी तं नको देवू,

    कपायना कुकू,

    याले हात नको लावू.

    (देवा तुला वैभव द्यावयाचे तर दे, नाहीतर नको देवूस. मात्र माझ्या कपाळाच्या कुंकवाला हात नको लावूस)

    बाहेरख्याली पुरुषलाही आणि स्त्रीलाही पुढील ओव्यांनी नीतीपाठ देण्याचा प्रयत्न दिसतो.

    घरनी आस्तुरी

    जशी पुरननी पोयी,

    पराई नारसाट

    खिसामांनं चूई.

    (घरात पुरणाच्या पोळीसारखी गोरी, मऊ अशी अस्तुरी – बायको -असताना, हा बाहेरख्याली पुरुष परस्त्रीसाठी खिशात गुपचूप अशी चोळी, कंचुकी नेतो.)

    मायीना मयात लाल

    दांडीना शेवरा,

    चलवादी नारले

    हात जोडसं नवरा.

    (नवराच केवळ त्रास देणारा असतो असे नाही. तर बायकोही त्रास देणारी असू शकते. अशा बायकांना नवरे हात जोडतात.)

    खानदेशातील विवाह पद्धतीमध्ये अनेक उपविधी पार पाडले जातात. त्यात वधू संशोधन, साखरपुडा, नारय गोटा, सेलामुंदी, कुकू, बस्ता फाडनं, रासीपूजन, हायद फाडनं, देवदेवतं, मांडो टाकनं, आष्टवर जेवन, बेमाथनी पूजनं, हायद लागनं, काकन बांधनं, फुनकं मिरावनं, तेलन पाडनं, वडले वरननं, सुक्या सेवंती, टाई, झ्ॉल उडावनं, गृहप्रवेश, सोबा गायनं, बिद मिरावनं, मांडोकरन किंवा आहेर बजाडनं, हायद फेडनं, दाहींडा पाडनं, काकन सोडनं, सोपारी जिकनं, मानपान, दातनचिरी, थंडा करनं, पहिलं मूय, दूसरं मूयं, इ. विवाहपूर्व विधी, विवाह विधी आणि विवाहोत्तर विधी पार पाडले जातात. या सर्व विवाह विधी मध्ये विवाहगीते गायली जातात.

    खानदेशात आढळणारी विवाह गीते ही खानदेशभर आढळतात. मात्र अशा प्रकारची विवाह गीते इतरत्र आढळत नाहीत. या विवाह गीतातून खानदेशांच्या इतिहासावर, संस्कृतीवर आणि अहिराणी बोलीच्या शब्दसंग्रहांवर प्रकाश टाकता येतो. काही विवाह गीते अशी.

    गंगा जमना दोन्ही खेते,

    तठे काय देव पह्यंना रोपे,

    तठे काय सिता माई काते,

    तठे काय परभू उखले ताना,

    (इस्नू किस्नू कांडय़ा भरे,

    राई रुक्मीनी पोयते करे.)

    तठलं पोयतं … ले आनं,

    …ना बाप घाडे उना,

    बािशग मोती झडे उना,.

    मातीपये रतं उना,

    (राजा गया रतं उना)

    (गंगा आणि जमुना या दोन नदींच्या काठावर देवपऱ्हाटीची रोपे, त्या रोपांचा कापूस काढून सिता सूत कातते आणि विष्णू व कृष्ण सुताच्या कांडय़ा भरतात. त्या सुताचे पोयते नवरदेवासाठी बनविले जाते.)

    चुल्हा म्हणे मी चुल्हा देवं,

    लाया चंदनन्या खापोटय़ा,

    आन शिजे सव्वा खंडी,

    या आननी कीर्ती मोठी,

    लोकं जेवती लखापती.

    खाम म्हणू मी खाम देवं

    आठे घुसयेवं कोनं,

    आठे घुसयेवं राधा,

    इन्हा रही खाले डेरा,

    इन्हा तांबीयाना लोटा,

    इन्ही धरमजं वाटा.

    (विवाहप्रसंगी, चूल, खांब, उकिरडा, उंमरट यांचीही पूजा केली जाते. त्या कृतीला पोखनं असे म्हणतात. पोखनं म्हणजे विशिष्ट कृती करून पांखण्याची गाणी गाणे. या गाण्यात विवाह प्रसंगी चूल देवाला पूजले जाते आहे, त्याच्यावर अन्न शिजविले जाते आहे. चंदनाची लाकडे जाळली जात आहेत. त्यामुळे मंगलप्रसंगी सुगंध पसरून आल्हाददायक वातावरण बनले आहे).

    दाऱ्हुन म्हने मी दाऱ्हुन देव,

    आठे वापरे वं कोनं,

    आठे वापरे वं…

    (तर दुसऱ्या गीतात खांबाला पुजले आहे. त्या खांबांला गृहिणीने आजवर डेराभर दूध दूभते घुसळले आहे, तूप लोणी तयार केले आहे.)

    खांदी टाकल्या कुऱ्हाडी,

    गेले डोंगर परवडी,

    साग तोडीला निवाडी,

    साग गाडय़ात घतीला,

    सागं नाडय़ानं गुंफिला,

    सागं शेल्यानं झाकीला,

    टाका सुतारादारी,

    सुतार चौकट घडीला,

    दाऱ्हून जिनगर मढीला,

    लाया तुयबंदी पाटीया,

    लाया नवबंदी साकया,

    — —

    उखल्डा म्हणे मी उखल्डा देवं,

    उखल्डें पुंजा कोन टाके,

    उखल्डे पुंजा टाके,

    इन्ही सोनानी डालकी,

    इन्ही मोतयानी चेंभय,

    इन्हा सोनाना कऱ्हेंटा,

    झाडी उनी गाय गोठा,

    इन्ही उखल्डा कया मोठा,

    आया पोकथीन, बाया पाकथीन

    पोकथीन माम्या मावशा,

    सिमदर सुक्तं, पान मुक्तं,

    हायद कुकुले बलावज्या,

    दिवा म्हणे मी दिवलाया,

    दिवा निपजला कोठे,

    गांव त्या अजिंठय़ाना पेठे,

    या दिव्याचं मोलं काय?

    सव्वा लाख टक्का भायं,

    या दिव्याला घेतो कांनं,

    घेतो नवरदेवाचा बापं

    (या ठिकाणी पाच वेळा नवरदेवाचा बाप, पाच वेळा नवरदेवाचा चुलता हे शब्द वापरून गाणे गायले जाते.)

    विवाहोत्तर विधीतील गाणी

    कोन गाव पर्नाले

    गथा रे मन्हा मानिकडा,

    (गावाचे नाव) गाव पर्नाले

    गथा रे मन्हा मानिकडा,

    तुले कसानी

    खुटना पडनी रे मन्हा मानिकडा,

    तुल (जे मिळाले नाही त्या वस्तूचे नां) नी खुटना पडनी रे मप्हा मानिकडा,

    तु ( येथे सासरा, सासू, साली इ.) ले गहान ठेवता रे मन्हा मानिकड,

    ाोो

    हाई काय काकन सुटेनारे लाडा,

    या काकनले दोन दोन गाठा,

    नौरीना बननी (शिवी वजा शब्द) नी बांध,

    ाोो

    नवरदेव नवरी झुंबड खेये,

    नवरदेवना मांडीवर सोनानी िझगी,

    नवरदेवना बाप गया वं िनगी,

    ाोो

    अशा प्रकारे अहिराणी बोली ही मधाची डोली आहे. या लोक गीतातून विविध अशा प्रतिमांचा, शब्दांचा, काव्य कल्पनांचा वापर करण्यात आला आहे. लोक गीतांप्रमाणे अहिराणी बोलीतील म्हणी, वाक्प्रचार, अहिणे, उखाणे ही अवीट असा गोडवा जतन करून आहेत. या म्हणी, वाक्प्रचारामधून खानदेशाच्या लोकसंस्कृतीचे, इतिहासाचे आणि रूढी, परंपरा यांचे आणि बोलीतील सौंदर्यस्थळांचे दर्शन घडते. नमुन्यादाखल काही म्हणी पाहू.

    खानदेशात पुजल्या जाणाऱ्या देवदेवतांचा उल्लेख असणाऱ्या म्हणी-

    आईबाई नाडनी, कानबाई घडनी.

    गवराई सजनी, शंकरले पावनी.

    म्हसोबाल न बायको

    अन मुऱ्हईले न नवरा.

    सांगा सेंदूर तं उखली आना मरोती.

    (या म्हणीतून गौराई, कानबाई, शंकर, म्हसोबा मारोती इ. देवतांचा उल्लेख आहे. म्हणींच्या आधारे अहिर लोकांच्या सामाजिक जीवनाचा वा खानदेशातील देवदेवतांचा इतिहास मांडता येतो.)

    खानदेशातील सन आणि उत्सवांचा उल्लेख असणाऱ्या म्हणी-

    दिवाईले कुनबी शाना व्हस.

    आसनं तं दिवाइन,

    नसनं तं, हूई.

    हुईनी बोम तीन रोज.

    घरमान हूई अन भायेर दिवाई.

    (खानदेशात दिवाळी, होळी साजरी होते हे या म्हणींतील उल्लेखावरून पडताळता येते. दीपावलीला हंगाम आल्यावर शेतकरी म्हणतो आपण या वर्षी याऐवजी हे पेरले असते तर आपला खूप फायदा झाला असता. पण हे शहानपण दिवाळीला येते. असे -)

    इतिहास, पुराणे यांचा उल्लेखही या म्हणीतून आढळतो. जसे-

    गाव जये, हानुमान बोंबी चोये.

    घरमांन न दाना, म्हने बाजीराव म्हना.

    पल्हे बाजीराव व्हवा, मंग मस्तानी ठेव्वा.

    (हनुमान, बाजीराव, मस्तानी ही पात्रेही म्हणीतून उल्लेखलेली आहेत. मस्तानी ठेवायचीच तर आधी बाजीराव हो! असा सल्ला म्हणीतून दिला आहे.)

    उना कुनबी दूना राबे, आधला ना जागे पायली लागे,

    गाडा बरोबर नयानी जत्रा,

    कुचकी वडांगवर कोनहीबी पायदेस.

    जो करी बांद बंधनी तो खंडीना धनी.

    अशा प्रकारे कृषिक्रियां, वस्त्र, कालगणना, ऋतूचक्र, पशूपक्षी, कीटक इ. यांचा उल्लेख असणाऱ्या म्हणी आढळतात.

    अशा प्रकारे खानदेशात बोलली जाणारी अहिराणी बोली ही लोकसाहित्यांचा जिवंत असा झरा आहे. म्हणून म्हणावे लागते,

    मन्हा खानदेस मझारं भाषा चालस अहिराणी,

    काय इन्ही गोडी सांगू, जसं तूप गावराणी.

  5. पाणीसुद्धा न पिता वडील परत फिरले. सासरा-जावयाच्या या युद्धात ढसढसा रडण्याशिवाय आजीच्या हातात दुसरे काहीही राहिले नाही… काही माणसं अशी अगम्य अन्‌ विचित्र रसायनाची का बनतात, याचं कोडं अजून उलगडत नाही.

    एका लग्नाची ही चित्तरकथा घडून गेली, त्याला खूप वर्षं झाली. पण ती अद्याप मनातून हलत नाही… माझे आजोबा बापू तारकुंडे. हडपसरला त्यांची मोठी बागाईत जमीन होती. तिथं त्यांनी पानमळा केला होता. गावात त्यांचं लहानसं घर होतं. थोरली मुलगी गोदा दहा वर्षांची झाली; तरी आजोबा मुलीसाठी स्थळ बघायला बाहेर पडेनात. मग आजीनंच कंबर कसून मोहीम सुरू केली. माझे वडील पुण्याच्या शेतकी कॉलेजात कामाला होते. कामात पारंगत होते. लिंबांच्या रोपट्यांना संत्री-मोसंबीची कलमं करण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नव्हतं. नोकरी लागून दोन वर्षे झालेला, मुख्य म्हणजे “सरकारी नोकरी‘ असलेला हा मुलगा आजीला पसंत पडला!

    देण्या-घेण्याचा प्रश्‍नच नव्हता. वऱ्हाडानं औंधहून हडपसरला जायचं. लग्न लागल्यावर आजीनं वऱ्हाडाला पुरणपोळीचं जेवण द्यायचं आणि नंतर मुलीला घेऊन वऱ्हाडानं माघारी फिरायचं, असं ठरलं. दोन्हीकडची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. आमची तर फारच बिकट. आजीला फक्त मुलगा आवडला होता आणि सरकारी नोकरीचं तिला मोठं अप्रूप होतं.

    ठरल्याप्रमाणे जावळेकर मंडळी तीन-चार बैलगाड्या करून हडपसरला पोहोचली. तेवढ्यात आजोबांनी आजीला आणि दोन्ही मुलींना घरात कोंडून जाहीर केलं, की “या मुलाला मी माझी मुलगी देणार नाही. गावात घर नाही, रानात शेत नाही, अशा खुंटीवरच्या कावळ्याला मी माझी मुलगी कदापि देणार नाही. वऱ्हाडानं आल्या पावली परत जावं.‘ प्रसंग बिकट होता. गावातल्या व जवळच्या अनेक लोकांनी आजोबांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आजोबा अजिबात बधेनात. शेवटी मुहूर्त टळून गेला. आता काय करावं? कुणालाच काही कळेना.

    आजीच्या शब्दाला गावात मान होता. ती खिडकीतून शेजारणीशी बोलली. गावच्या पाटलाला बोलावून आणण्याचा निरोप तिनं शेजारणीला दिला. धोंडिबा मगर यांचे वडील पाटील होते. ते मगरपट्ट्यात राहत. आजीचा निरोप मिळताच ते तडक आले. त्यांनी प्रथम सामोपचारानं आणि शेवटी निर्वाणीचा इशारा देऊन आजोबांना ताळ्यावर आणलं. सकाळी दहाला होणारा विवाह पाटीलबुवांच्या साक्षीनं सायंकाळी गोरज मुहूर्तावर पार पडला. जावळेकर मंडळी नव्या नवरीला घेऊन पुण्याला परतली.

    आजोबा एक हेकट, तर वडील सात हेकट! लग्नाचा झालेला हा तमाशा आजीच्या मनाला फार लागून राहिला. लग्नाच्या दिवशी दोन घास धड खाता आले नाहीत, याचं तिला खूप वाईट वाटलं. लग्नाला सात-आठ महिने झाले. वडिलांनी सासुरवाडीचं नावच टाकलं होतं. शेवटी “माणसाचं आतडं तुटतं‘, या म्हणीनुसार वडिलांना जेवायला येण्याचे आमंत्रण देण्यास आजोबा राजी झाले. त्यांनी सर्व मंडळींना आग्रहानं आमंत्रण केलं. पण वडिलांसह सर्व मंडळींनी “नाही‘ असं स्पष्ट सांगितलं. आजोबांनी फारच गयावया केल्यावर वडिलांनी जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं. मात्र त्यांनी अट घातली, “मला सायकल देणार असाल, तरच जेवायला येईन!‘ आजोबांनी ती अट मान्य केली.

    घरी येऊन त्यांनी आजीला हे सायकल प्रकरण मुळीच सांगितलं नाही. जावई जेवायला येणार आहेत, एवढाच निरोप दिला. ठरलेल्या दिवशी आजी पुरण-वरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक करून तयारीत बसली. वडील दोन मित्रांना बरोबर घेऊन सासुरवाडीला पोहोचले. पाट मांडले, आजीनं ताटं वाढायला घेतली. वडील येऊन पाटावर उभे राहून म्हणाले, “सायकल देणार होता, ती कुठे आहे?‘ आजोबा उत्तरले, “सुताराकडं करायला टाकली आहे. जेवणं होईपर्यंत येईलच.‘ हे ऐकताच पाणीसुद्धा न पिता त्याच पावली वडील परत फिरले. सासरा-जावयाच्या या युद्धात ढसढसा रडण्याशिवाय आजीच्या हातात दुसरे काहीही राहिले नाही.

    काही माणसं अशी अगम्य अन्‌ विचित्र रसायनाची का बनतात, याचं कोडं अजून उलगडत नाही.

  6. आपण रोज Love Story / प्रेम-मैत्री कविता वाचतो….. हो ना…… ??

    मग आज या गरीबाची आई / अनाथांची आई – सिंधुताई बद्दल नक्की वाचा….

    “चिंधी” ही अभिराम साठे या अतिसामान्य शेतकऱ्याची मुलगी. हिला शाळेत जाण्याचा व नवीन गोष्टी शिकण्याचा खूप उत्साह. पण आईचे मत असे कि मुलीला शाळेत घालून, शिकवून काय उपयोग. लग्नाचे वय झाले कि लग्न करावे झाले. शिवाय घरकाम यायला पाहिजे त्यामुळे आई सतत घरात काही न काही काम सांगायची. शिवाय म्हशी चरायला नेणे हि पण “चिंधी” चीच जबाबदारी. बिचारी, म्हशींना चरायला सोडून अर्ध्या सुट्टीनंतर का होईना पण शाळेत दाखल होत असे. मन लावून अभ्यास करीत असे. उशिरा येऊन देखील मुलगी ४ थी पास होते. ४ थी पास झाल्यावर हिच्या आईला खूप घाई होते, कि आता हिचे लग्न करायचे. वडील मनाने आणि विचाराने पुरोगामी असतात, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. त्यामुळे ह्या १० वर्षाच्या मुलीचे एका टोणग्याबरोबर लग्न लावून देण्यात येते. सासरी २ दीर, सासू, सासरे व दिरांची मुले अशी बरीच मंडळी असतात. आता शिकणे वगेरे तर दूरच राहते, पण घरात सासूच्या हाताखाली राब राब राबावे लागते. त्यात सासू सारखी नवऱ्याचे काही न काही कान भरतच असते.

    या सगळ्या त्रासात देखील चिंधी तिच्या वाचनाचे वेड सोडत नाही. घरात कुठलाही पेपरचा कागद घरी आला कि त्यावर लिहिलेले सगळे वाचून काढायचे असा उपक्रम सुरु करते. बरेच वेळा ती वाचत असताना, सासू बोलते, तेव्हा कागद लपवून ठेवून नंतर वाचायचा असे करून तिचे वाचनाचे वेड पूर्ण करते.

    लग्न झाल्यानंतर माहेर तर सुटल्यासारखेच असते. वडील मधून-मधून चिंधीला भेटायला येतात. काही वर्ष्यांनी हिला ३ मुले होतात. यांच्या गावात जंगलात जाऊन शेण गोळा करायचे आणि ते गावातील कंत्राटदाराला द्यायचे. तो कंत्राटदार ते शेण जाऊन विकतो, पण गावातील लोकांना त्याच्या बद्दल काहीच मोबदला मिळत नाही. चिंधीच्या हे कधीच लक्षात येते, पण गावात कोणाचीच हिम्मत नसते याबद्दल बोलण्याची. त्याच दरम्यान चिंधीला चवथ्यांदा दिवस गेलेले असतात. चिंधी या कंत्राटदारा बद्दल मोठ्या वन अधिकाऱ्याकडे तक्रार करते. यामुळे चिंधी बद्दल सगळ्या गावात खूप आदर वाढतो. घरी पण अचानक सासू, आणि जावा तिची एकदम काळजी करायला सुरवात करतात.

    पण हे प्रेम काही खूप काळ टिकून राहत नाही. गावातील कंत्राटदार चिंधीच्या नवऱ्याचे कान भरतो कि तुझ्या बायकोच्या पोटातील मुल तुझे नसून माझे आहे. हिचा नवरा इतक्या हलक्या कानाचा असतो कि त्याला ते सगळे खरेच वाटते. आणि नवव्या महिन्यातील गर्भारशीला घराच्या बाहेर काढण्यात येते. कधीहि बाळतीन होणार अश्या स्थितीत असलेली, चिंधी कोठे जाणार? हि बिचारी घरातील गोठ्याचा सहारा घेते. आणि तिथेच तिचे बाळंतपण होते. कोणीच नाही जवळ, स्वताच बाळाची नाळ तोडते. ओळी बाळंतीण घर, गोठा सोडून माहेरी जायला निघते. हातात पैसे नाही, खायला अन्न नाही, हातात तान्हे बाळ, जाऊन जाऊन कुठे जाणार. चिंधी कसे बसे माहेरी पोचते. वडील काही वर्षापूर्वीच गेले असतात, फक्त आईच असते. आई तिला बघून म्हणते कि तू इथून निघून जा, तोंड काळे केल्यावर इथे का आलीस. इतक्या छोटा मुलीला घेऊन कुठे जाऊ असे विचारल्यावर आईचे उत्तर असते कि कुठेही जा, कुठेच नाही जमले तर विहिरीत उडी मार. अशी प्रतिक्रिया आल्यावर चिंधी अगदी हिरमुसली होते. आणि आत्म्यहत्या करायला म्हणून रेल्वेच्या रुळावर जाते. तिथे गेल्यावर तिचे नक्की होते, चिंधीची सिंधू कशी होते हे बघा “मी सिंधुताई सपकाळ” मध्ये.

    खरंतर इथे या सिनेमाचे कथानक लिहिणे कठीण आहे कारण एकतर सिंधुताईने जे काही भोगले ते शब्दात लिहिणे कठीण आहे आणि बहूतेक सगळ्यांनीच सिंधुताईच्या तोंडून त्याची गोष्ट ऐकली आहे. पण तरीही कथानक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमा खूपच छान आहे. सिंधुताई जेव्हा सांगतात त्याच्या जीवनातील प्रसंग, तेव्हाच डोळ्यातून पाणी येते. पण जेव्हा सगळे चित्र पडद्यावर बघितल्यावर तर रडायला येतेच येते. मुख्य म्हणजे मला चिंधीच्या आईची मानसिक व्यवस्था अजूनहि नीटशी समजलेली नाहीये. जेव्हा एकदम १-२ दिवसाचे बाळ घेऊन मुलगी घरी येते, तेव्हा कुठली आई आपल्या मुलीला घरातून हाकलून देऊ शकेल.

    सिंधुताई जसे तिच्या नवऱ्याला त्यांच्या आयुष्याला वळण दिल्याचे श्रेय देते, तसेच त्यांच्या आईने हाकलून दिल्यामुळे पण, चिंधीच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण झाली असावी. सिनेमा फ्लॅशबॅक मध्ये आहे. पण वर्तमान आणि भूतकाळ याचा संगम खूप छान केला आहे. तरुण वयाची चिंधी आणि वयस्कर सिंधुताई, दोघीही खूप छान. सिनेमा सगळ्यांनी बघावा असाच आहे. वाचकांना सिंधुताईच्या तोंडून त्यांच्या कामाची, आणि त्यांच्या आयुष्याची माहिती मिळावी म्हणून इथे त्यांच्या भाषणाची क्लीप इथे देते आहे.

    मला आवडलेले या सिनेमातील / सिंधुताईचे लक्षात ठेवण्यासारखे वाक्य. “देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस.”

  7. Mazya bhavacha lagna aahe November madhe tyasadhi aamhala chaan asa majkur asleleli patrika chaapaychi aahe
    tya madhe sakali sakharpuda , nantar haldi samarambh , duparchya velet vidhi cha karekram ani sandhyakali 6 la lagna mangal ashtaka .
    Ani tya nantar bhojan samarambh.
    He sagla kashya padhatile lihava ya sathi please tumchi madat havi hoti
    please help kartal ka……

Leave a Reply