Drug smuggler Dharmaraj Kalokhe’s Baby
ड्रग्ज तस्कर धर्मराज काळोखेची बेबी… आणि बेबीची माया!
मुंबई : गेल्या 15 वर्षांपासून ड्रग्ज तस्करीतून बेबी पाटणकर नावाच्या महिलेनं करोडो रूपयांची माया जमवलीय. बेबीचा बॉयफ्रेंड आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे याच्या चौकशीतून हा गौप्यस्फोट झालाय. बेबी पाटणकर माया मेमसाब कशी बनली पाहुयात…
[ad name=”HTML-1″]
नाव – शशिकला उर्फ बेबी रमेश पाटणकर
वय – ५० वर्षे
काम – अंमली पदार्थांची तस्करी
सध्या – मुंबई पोलीस डायरीत फरार आरोपी
‘बेबी पाटणकर का इंतजार तो ग्यारह जिलों की पुलिस कर रही है… लेकिन बेबी को पकडना मुश्कील ही नही… नामुमकीन भी है…’ कारण ती कुणी साधीसुधी बाई नाहीय… तर ती आहे देशातील सर्वांत मोठी महिला ड्रग्ज तस्कर…
[ad name=”HTML-1″]
गेली 30 वर्ष बेबीनं अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात घालवलीयत. या गोरखधंद्यातून तिनं करोडो रूपयांची कमाई केली. वरळीच्या सिद्धार्थ नगरातल्या बेबीचं घर म्हणजे घर नाही तर तब्बल 24 खोल्यांचा बंगला आहे. यावरून तिच्या साम्राज्याची आणि दहशतीची कल्पना तुम्हाला येऊ शकेल.
बेबी पाटणकरचे पोलिसांशी घनिष्ठ संबंध होते. तिच्या नावाखाली अनेक वेळा पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केलीय… तर पोलीस दलात राहून राजकीय नेत्यांच्या खास माणसांशी जवळीक साधून, धर्मराज आणि बेबीनं अनेक अडथळे दूर करत अंमली पदार्थ तस्करी करुन मिळणाऱ्या काळ्या पैशांतून देशभरात कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनवली.
[ad name=”HTML-1″]
बेबी पाटणकरची महाराष्ट्रातली संपत्तीच चक्रावून टाकणारी आहे.
- वरळी सिद्धार्थ नगर येथे २४ खोल्यांचे घर
- मुंबई, नवी मुंबई येथे बेनामी फ्लॅटस्
- रत्नागिरी, चिपळूण, वेंगुर्ला, सावंतवाडीत घरे आणि जागा
- एक स्विफ्ट गाडी, एक टाटा मांझा गाडी
- दोन टू व्हिलर आणि बेनामी महागड्या गाड्या
- बेबीच्या अकाऊंटमध्ये सापडले ९७ लाख रुपये
ही झाली राज्यात जमवलेली माया… त्याशिवाय आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गोव्यातही बेबीची करोडोंची मालमत्ता आहे.
आपण जो काळा व्यवसाय करतोय त्यात कधी ही आपल्याला अटक होऊ शकते हे लक्षात घेऊन धर्मराज काळोखे आणि बेबी पाटणकर यांचे कुटूंब ऐशो-आरामाचं आयुष्य जगत होते. सचिन तेंडुलकरची शेवटी मॅच असो की, आयपीएलच्या मॅच असो अगदी व्हीआयपी तिकिटांवर त्यांनी मॅच बघितल्या आहेत. शिवाय पिकनिक म्हणून देशभर भ्रमंतीदेखील केलीय.
धक्कादायक बाब म्हणजे अंमली पदार्थ तस्करीच्या या काळ्या धंद्यात बेबी पाटणकरची दोन मुले, सुना आणि जवळपास सर्वच नातेवाईक मदत करत होते.