Why occurs Kidney problems?

मूत्रपिंड विकार का होतात?

akid

मूत्रपिंड विकाराचे प्रमाण गेल्या काही काळात वाढताना​ दिसते आहे. त्याची कारणे समजावून घेतली तर त्यापासून बचाव करता येईल. अनेकदा मूत्रपिंड बदलण्याचीही वेळ येते. अशावेळी देणारा आणि घेणारा या दोघांनीही काळजी घेणे आवश्यक असते…

मूत्रपिंड विकाराची कारणं आणि प्रकार खूप आहेत. पण मुख्य मुद्दा म्हणजे या सर्वांत लघवीचं प्रमाण कमी होतं. लघवीत प्रथिने उतरतात आणि रक्तातील निरनिराळ्या घटकांचं प्रमाण बदलतं. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी आणि क्षार साठल्याने सर्वत्र सूज येते. या सर्वांचा अर्थ असा, की मूत्रपिंडाचं कार्य धीमे होत जाते. भारतात या आजाराबद्दल आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायाविषयी माहिती कमी आहे, मात्र, या अवस्थेतील मूत्रपिंडाच्या व्याधीविषयी माहिती होते.त्यामुळेच मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाविषयीही शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे.

मूत्रपिंडविकाराच्या किती पायऱ्या असतात?

सामान्य व किंचित वाढलेल्या गाळपासहितची मूत्रपिंडहानी l मूत्रपिंडकार्यात झालेली किंचित घट l मूत्रपिंडकार्यात झालेली मध्यम प्रमाणातील घट l गंभीर स्वरूपातील मूत्रपिंडकार्यात झालेली घट l मूत्रपिंड निकामी होणे

प्रत्यारोपणासाठी आवश्यक घटक

– परिचयातील किंवा अपरिचित दाता, मेंदू मृतावस्थेमधील कॅडेव्हेअर दाता

– मूत्रपिंडे स्वीकारणाऱ्या व्यक्तींचा फिटनेस

– ६५ पेक्षा कमी वयोमर्यादा

– मधुमेह, हृदयविकार, मधुमेह, मुतखडा, अंधत्व यासारखे कोणतेही आजार नको

दात्यासाठी नियमावली

– ६५ पेक्षा कमी वय

– मधुमेह नको

– कावीळ, पाच वर्षापासून कर्करोगासारख्या आजाराची बाधा नको

– एचआयव्ही तसेच कावीळ सारखा आजार नको

वैद्यकीय पद्धती

एकाचवेळी दोन शस्त्रक्रिया केल्या जातात, ज्यात दात्याची मूत्रपिंडे काढून मूत्रपिंडाची गरज असलेल्या पेशंटला बसवली जातात.

शस्त्रक्रियेनंतरची काळजी

– काही विशिष्ट काळासाठी औषधोपचार सुरू राहतात

– रोगप्रतिकारशक्ती क्षीण असल्याने गर्दीच्या जागी जाऊ नये

– संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात राहू नये

– मास्कचा वापर करावा

– डॅाक्टरी सल्ल्याने फॅालो अप

– औषधे स्वतःहून बंद करू नयेत

दात्यासाठी काळजी

– विशेषत्वाने कोणतेही बंधन नाही

– मात्र डॅाक्टरांचा फॅालो अप चुकवू नये

Share this:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *