Attractive Bun Hair style

आकर्षक बन हेअर स्टाईल

पारंपरिक हेअर बनची फॅशन साठच्या दशकात मोठ्या प्रमाणात होती. त्यानंतर ट्रेंड बदलत गेला आणि वेगवेगळ्या हेअर स्टाईल आल्या. आता पुन्हा ही जुनी बन हेअर स्टाईल महिलांची पसंती ठरू लागली आहे.

हेअर बन या हेअर स्टाईलमध्ये मानेवरचे सगळे केस उंच बांधले जातात आणि अतिशय आकर्षक पद्धतीचा नॉट तयार केला जातो. या हेअर स्टाईलमुळे चेहरा अधिक आकर्षक पद्धतीने डिफाईन होतो आणि मानही उंच व आकर्षक दिसते. तुम्ही जर बेसीक फ्रेंच बन घालणार असाल तर त्यासाठी काही स्टाईल ट्राय करू शकता.


साईड बन Side Bun – सर्व प्रथम सगळे केस एका बाजूला विंचरून घ्यावेत आणि नंतर रबर बॅन्डने ते बांधावेत. पोनी टेलमधील काही केसांचा भाग घ्यावा आणि रबर बॅन्डमध्ये तो स्टफ करावा. नंतर उरलेले केस बँन्ड भोवती गुंडाळावेत जेणेकरून स्टफ केलेला भाग झाकला जाईल. त्यासाठी भरपूर पिनांचा वापर करावा. केसांच्या काही बटा कानावरून सोडता येऊ शकतात. तसेच सजावटीसाठी काही स्ट्रॅन्डस वापरता येऊ शकतात.


सोक बन Soak Bun- हा बन थोडासा ट्रिकी असतो. यासाठी सर्वप्रथम उंच किंवा खालच्या बाजूला पोनी टेल घालावी. त्यानंतर केस बाहेरच्या बाजूने वळवून, ते आतून पिनेने बांधावेत. अशा प्रकारे सोक बनची उंच हेअर स्टाईल तयार होते.
पफ बन Puff Bun – सध्या तरुणींमध्ये ही अगदी आवडती हेअर स्टाईल आहे. यामध्ये केसांच्या पुढच्या भागाचा पफ बांधायचा आणि मुकुटासारखा तो उंच करायचा. तो सरळ राहण्यासाठी पिन्स लावायच्या. उरलेल्या केसांचा बन बनवायचा. पुढचा आणि मागचा रो मानेवर सोडल्यानेे हेअर स्टाईल अधिक आकर्षक बनते.


बॅले बन Balle Bun – हा अतिशय साधा बन असून, आपल्या नेहमीच्या कपड्यांवरही घालता येतो. त्यासाठी केसांची पोनी टेल बांधायची नंतर टाईट रोपच्या सहाय्याने केस ट्विस्ट करायचे. नंतर पोनी टेल बांधली आहे तिथे ट्विस्ट केलेले केस बांधावे आणि पिनेने ते अधिक सुरक्षित बनवावेत. अशा प्रकारे बॅले बन तयार होतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *