कोकणपट्टीकरील सुंदर बीचेस

कोकणपट्टीकरील सुंदर बीचेस

कोकणपट्टीकरील सुंदर बीचेस

महाराष्ट्रातील नद्या आणि समुद्र… सौंदर्य आणि संस्कृती यांचा अनोखा मिलाफ पर्यटकांसाठी पर्वणीच

कोकणपट्टीकरील सुंदर बीचेस, किनाऱयांकडे झेपावणाऱया सागरलाटा आनंद देऊन जातात. अथांग समुद्र, सुंदर खाडय़ा, नारळ-सुपारीच्या आणि आंबा-काजूच्या हिरक्यागार बागा, समुद्रात बांधलेले ऐतिहासिक वारसा मिरवणारे मजबूत जलदुर्ग, समुद्रकिनाऱयांकर कसलेली  टुमदार गावे आणि सागरतटांची शोभा वाढवणारी देवालये…..कोकणचे सौंदर्य डोळ्यात सामावून घेताना सुटीचे चार दिवस कसे निघून जातील याचा पत्तादेखील लागत नाही. महाराष्ट्राला लाभलेला कोकणचा समुद्रकिनारा पर्यटनांचे उत्तम डेस्टिनेशन झालंय… तर, याच समुद्राला येऊन मिळणाऱया महाराष्ट्रातील प्रमुख काही नद्यांच्या किनारी विकसित झालेल्या पर्यटनाला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. पर्यटनाचा अनमोल खजिना खास निसर्ग पर्यटनाला निघालेल्या पर्यटकांसाठी…

मालकण किनारपट्टी गजबजली

मालकण किनारपट्टीकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. मन थक्क करणारा समुद्रकिनारा, किल्ले सिंधुदुर्ग आणि सागरी विश्व न्याहाळण्यासाठी असलेला स्कुबा डायविंग हे पर्यटकांचे खास आकर्षणाचे हॉटस्पॉट बनले आहेत. उन्हाळी हंगामासाठी पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी पर्यटन व्यावसायिक  सज्ज झाले आहेत. मालवण समुद्रात जैवविविधतेचे व्यापक विश्व  लपलेले आहे. त्यामुळे हे व्यापक विश्व पर्यटक न्याहाळण्यात दंग झाले आहेत. मालवणसह तारकर्ली, वायरी, देवबाग याठिकाणीही जलक्रीडा प्रकार उपलब्ध असल्याने या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते.

देवगडची डॉल्फिन सफर

देवगडच्या मुख्य बीचकरून टेकडीवरील पवनचक्क्यांकडे चढून जायला कळणदार चिरेबंदी पायऱया आहेत. या पायऱयांकर बसूनदेखील समुद्र निरीक्षणाचा आनंद घेता येतो. मधेच डॉल्फिन माशांची एखादी टोळी पाण्याच्या पृष्ठभागाकरून हवेत सूळकांडय़ा मारताना दिसते. आकाशामध्ये घारी आणि ससाणे घिरटय़ा घालताना पाहायला मिळतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी लालबुंद सूर्यबिंब हळूहळू समुद्रात बुडताना पाहणे आणि पौर्णिमेच्या रात्री एखाद्या खडकाकर बसून चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या समुद्राची अद्भुत शोभा पाहणे हा खरोखरीच अविस्मरणीय अनुभव आहे.

कोंडेश्वर..बदलापूर-कर्जत मुख्य महामार्गाकर खरकई गावात येताच कोंडेश्वरकडे जाणारा एक मार्ग लागतो. सुरुवातीला तुम्हाला लागतं भोज धरण, या धरणातून वाहणाऱया पाण्यावर एक बंधारा बांधण्यात आलाय. त्यामुळे कोंडेश्वरला जाण्याआधी पर्यटकांची पाकलं आधी या भोज धरणाकडेच कळतात. कोंडेश्करमधलं  वैशिष्टय़ म्हणजे प्राचीन शिवमंदिर. इथल्या कुंडाचं पाणी अतिशय खोल आहे.

महाबळेश्वर..महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्कर. थंड हवेचे ठिकाण. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री या पंचनद्यांचे उगमस्थान आणि पवित्र महाबळेश्वराचे देऊळ म्हणजेच महाबळेश्वर.  भरपूर पर्जन्यामुळे इथला संपूर्ण परिसर दाट वनश्रीने वेढलेला आहे. महाबळेश्वराच्या राजकळ कृष्णाबाई  व अतिबलेश्वर ही दोन मंदिरे आहेत. क्षेत्र महाबळेश्वर (जुने महाबळेश्रवर) यालाच धोम महाबळेश्वर असेही म्हणतात. महाबळेश्वर पाचगणी रोडवर २.५ कि.मी. अंतराकर वेण्णा नदीचे पाणी साठल्याने निर्माण झालेला वेण्णा तलावाच्या मागे घनदाट अरण्यही आहे.

तापोळा..यालाच महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणतात. हे प्रसिद्ध आहे ते येथील नौकाकिहारासाठी, बाजूला असलेली घनदाट झाडी व उंच डोंगर व त्यामध्ये असणारा विस्तीर्ण असा शिवसागर जलाशयाच्या फुगवटयाची शेवटची बाजू होय. या जलाशयाच्या काठाकर डोंगर पायथ्याशी अनेक छोटी-छोटी खेडी कसलेली आहेत. त्यामध्ये तापोळ्याबरोबर बामणोली, खरसुंडी, पावशेवाडी इ. गावांचा समाकेश आहे. तापोळयाला जाण्यासाठी दुतर्फा झाडी असलेला एकपदरी पक्का डांबरी रस्ता आहे. तीव्र उताराचा वळणावळणाचा रस्ता उतरताना गर्द झाडांनी भरलेले डोंगर पाहून मौज काटते.

वज्रेश्वरी.ठाणे जिह्यातील भिवंडी शहरात वज्रेश्करी आहे. मुंबईपासून ४५ कि.मी.कर वसई हे रेल्के स्थानक आहे. तेथून ३१ कि.मी.कर वज्रेश्करी आहे. वज्रेश्करी हे नावच मुळी इथे असणाऱया वज्रेश्करी देवीच्या मंदिरामुळे पडले आहे. या परिसरात ज्वालामुखी  डोंगर आहेत आणि तेथून औषधी गुणधर्म असणारे गरम पाण्याचे झरे वाहतात. या गरम पाण्याच्या झऱयांसाठी ही वज्रेश्करी प्रसिद्ध आहे. वज्रेश्करी मंदिरापासून ३ कि.मी. अंतराकर असलेले पेल्हार तळे ही इतर काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. ५ कि.मी.च्या परिघात गरम पाण्याचे झरे असणारी २१ ठिकाणे आहेत.

समुद्री पर्यटनाला जाताना घ्यावयाची काळजी 

स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे.

ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नका. कारण ओहोटी आत खेचून घेते. भरती बाहेर फेकते.

काही बीचेस एकदम खोल होत जातात, काही बीचेसवर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे खूप धोकादायक ठरू शकतात.

पाण्यात उतरताना मद्यपान करू नका.

कोणत्याही समुद्रकिनाऱयाकर, विशिष्ट अंतरापर्यंत पुळण असते, तिथवरच कंबरभर पाण्यात धोका कमी असतो. या विशिष्ट अंतराच्या पुढे किनारा समुद्रात एकदम उतार पकडून खोल खोल जातो.

बीचवर पॅरासेलिंग वगैरे करणार असाल तर त्यांचे सेफ्टी मेजर्स बघून निर्णय घ्या.

Leave a Reply