ओ हसीना झुल्फोवाली

ओ हसीना झुल्फोवाली

 

आपल्यापैकी अनेकांना केसाची काही ना काही समस्या सतावत असते. कोणाला रुक्ष तर कोणाला तेलकट केसांची समस्या सतावते, तर कोणाला कोंडा… एकंदरीत प्रत्येकाने या प्रकारच्या समस्यांना कधी ना कधी तोंड द्यावं लागतं. केसांच्या समस्या जाणून घेतानाच केस म्हणजे काय, केसांचा पोत कसा असतो… याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

स्त्रीसौंदर्याचा केस हा एक महत्त्वाचा भाग आहे. केस म्हणजे एक प्रकारचा नैसगिर्क धागा असून त्याचा उगम त्वचेतून होतो. त्यामुळे त्वचा तेलकट आहे की रुक्ष यावर आपल्या केसांचा पोत अवलंबून असतो. केसांची काळजी घेताना आपले केस कोणत्या प्रकारात मोडतात हे आधी पडताळलं तर त्यांची निगा चांगल्या प्रकारे राखता येऊ शकते. केसांच्या पोतानुसार तुमचे केस निरोगी आहेत की आजारी ते ठरतं. केसांचा निरोगीपणा त्यांच्या स्वच्छतेवर तसंच प्रत्येकाच्या खाणंपिणं आणि चांगल्या-वाईट सवयींवर अवलंबून असतो.

[ad name=”HTML”]

केसांचे मुख्यत: चार प्रकार आहेत

सर्वसामान्य केस – असे केस निरोगी असतात म्हणूनच ते सुदृढ दिसतात. मानेच्या मोहक हालचालींनीही ते सळसळतात.

कोरडे केस – बाहेरील वातावरणातील बदल तसंच केसांवर होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया यामुळे किंवा अशा अनेक कारणांमुळे केसांचा पोत बिघडू शकतो. या प्रकारच्या केसांचा स्पर्श हाताला खरखरीत लागतो. अशा केसांना सुरक्षित राखण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार करायला हवेत.

[ad name=”HTML”]

तेलकट केस – जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या तेलग्रंथींमुळे केस तेलकट दिसतात. नैसगिर्क तेल केसांमध्ये असणं फार आवश्यक आहे. यामुळे केसांना चांगली चमक येते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. म्हणूनच अती तेलकट केस म्हणजे जंतूंचं माहेरघर. या जंतंूच्या साम्राज्यामुळे केसांत चिकट कोंडा होणं किंवा उवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मिश्र केस – त्वचेजवळ तेलकट आणि टोकाला कोरडे असणारे केस मिश्र या कॅटेगरीत मोडतात. ऋतूप्रमाणे या केसांचा पोत बदलतो. थंडीत असे केस कोरडे वाटतात, तर उन्हाळ्यात खूप चिकट होतात.

[ad name=”HTML”]

केसांची वाढ प्रत्येक व्यक्तीचं वय आणि आरोग्यावर अवलंबून असते. पण तितकाच प्रत्येक ऋतूचाही केसांच्या वाढीवर परिणाम होत असतो. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात केसांची वाढ जास्त असते, तर हिवाळ्यात केस गळण्याची प्रक्रिया जास्त होते. दिवसाला ६० ते १०० केस जाणं हे नैसगिर्क आहे. पण किती केस गळताहेत ते काही आपण मोजू शकत नाही. त्यामुळे नियमित निरीक्षण करून आपले केस गळताहेत की नाही ते लक्षात घ्या. केस जास्त गळत असतील, तर केसांची विशेष काळजी घ्यायला हवी.

केसांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा

ु रात्री झोपताना मोठ्या दाताच्या कंगव्याने केस विंचरून झोपावं.

ु केस धुतल्यानंतर लगेच विंचरू नयेत. कॉटनच्या कपड्याने केस १० ते १५ मिनिटं बांधून ठेवावेत.

ुतिळाच्या तेलात लिंबाचा रस घालून हे मिश्रण गरम करून कापसाने केसांना लावावं.

ु केस गळण्यावर शवासन करणं हा एक उत्तम उपाय आहे.

ु रोज सकाळी काळे तीळ खावेत.

Leave a Reply