थंडी

हिवाळ्यात त्वचेतील मॉइश्चरचं प्रमाण कमी होऊन त्वचा फुटणं, हातापायांना भेगा पडणं अशा समस्या हमखास सतावतात. यासाठी या दिवसांत आहारात तेलाचं प्रमाण वाढवायला हवं.
…..

पावसाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही आरोग्याची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्याप्रमाणे या ऋतूत साथीचे आजार पसरत नसले, तरी त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. याचं कारण म्हणजे थंडीच्या या दिवसांत त्वचेतील मॉइश्चरचं कमी होणारं प्रमाण. यामुळे त्वचा फुटणं, टाचांना भेगा पडणं, कोेंडा होण्याचं प्रमाण वाढणं अशा अनेक सौंदर्य समस्या उभ्या राहतात.

दिवाळीपासून आपल्याकडे थंडी पडायला सुरुवात होते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची आपली प्रथा. थंडीच्या या दिवसांत शरीराला तेलाचं मालिश करून स्नान केलं जातं. तसंच फराळ खाल्ला जातो (फराळातील सर्व पदार्थ तेलकट असतात). यामुळे शरीराला आतून आणि बाहेरून तेल पुरवण्यात येतं. आयुवेर्द, रीतीरिवाजांचं महत्त्व हे असं कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी निगडीत असतं. थंडीचा अधिक प्रमाण आपल्या त्वचेवर होतो. त्वचा रुक्ष आणि कोरडी पडते. अभ्यंग स्नान आणि फराळाच्या माध्यमातून त्वचेला तेल पुरवण्याची ही आपली पद्धत.

थंडीच्या दिवसांत हातापायांना भेगा पडतात. काही जणांना त्याचा एवढा त्रास होतो, की त्यातून रक्तही येतं. तळहाताची त्वचा सोलवटते. त्वचेचा खाज सुटते, बारीकबारीक पुरळ येतं. अशा प्रकारच्या समस्यांसाठी आयुवेर्दात

साधेसोपे उपाय सुचवलेले आहेत. यालाच आभ्यन्तर आणि बाह्य स्नेहन असं म्हणतात. आपल्या नेहमीच्या आहारातून विशिष्ट प्रमाणात स्नेह (फॅट्स) शरीरात जाणं आवश्यक असतं. वजन कमी करण्याच्या अतिरेकी हव्यासापायी आजची तरुणाई आहारात फॅट्सचं प्रमाण अजिबात घेत नाही. काही औषधांमुळेही शरीरात फॅट्स शोषले जात नाहीत. याचा दुष्परिणाम म्हणजे शरीरात अंतर्गत रुक्षता

येते. त्याचा परिणाम म्हणजे त्वचा रुक्ष बनते. आतड्यांमध्ये रुक्षता आल्याने मलबद्धता येते. सांध्याच्या ठिकाणी रुक्षता आल्याने सांधे कटकट वाजू लागतात तसंच दुखू लागतात. अती रुक्षतेमुळे डोक्यातील त्वचाही (स्काल्प) कोरडी पडते आणि कोंडा होतो.

या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे तीळाचं किंवा शेंगदाण्याचं तेल आणि लोणकढे तूप यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. सूर्यफुलाचं तेल रुक्ष असतं.

शरीराला मॉइश्चर मिळून त्वचा कोरडी पडू नये, यासाठी औषधी तेलाने मालिश करा. यासाठी चंदन बला लाक्षादी तेल, पिंड तेल, नारायण तेल आदी तेलांचा वापर करावा. शरीराला मालिश करण्याबरोबरच सांध्यांसाठी जानुबस्ती करता येईल.

केस गळणं, कोंडा होणं, अकाला केस पिकणं यासाठी औषधी तेलाची तसंच औषधांनी सिद्ध केलेल्या दुधाची शिरोधारा करावी. नाकामध्ये साजूक तूप रात्री झोपताना सोडावं. यामुळे थंडीत नाकाचा घोणा फुटून होणाऱ्या रक्तस्त्रावावर चांगला फायदा होतो. आवश्यकतेनुसार त्रिफळा सिद्ध तेलाचा मात्राबस्ती घ्यावा.

थंडीत चेहऱ्याची त्वचा कोरडी पडणं ही तक्रार सर्व वयोगटात आढळून येते. यावर प्रभावी उपाय म्हणजे कोमट करून गार केलेल्या तीळाच्या किंवा कुमकुमादी तेलाने चेहऱ्याला मसाज क रा. यामुळे त्वचेला चांगला फायदा होतो. चेहऱ्याची कांती सतेज ठेवण्यासाठी आणखीही काही उपाय करता येतील :

* नाकपुडीत नेमाने पंचेंदीय वर्धन तेलाचे थेंब घालावेत

* कोरफडीचा गर आणि भिजवून वाटलेले बदाम चेहऱ्याला लावा.

* साबणाऐवजी कापर कचरी, नागरमोथा, अनंतमूळ, अर्जूनयुक्त उटण्याचा वापर करावा.

* मुलतानी मातीचा वापर त्वचेला काहीसा रुक्ष करू शकतो, हे लक्षात घ्या.

* रस आणि हळद यांचा लेप त्वचेच्या कोरडेपणावर उत्तम उपाय आहे.

थंडीत त्वचा फुटण्याबरोबरच ओठांना सुरकुत्या पडणं, ओठ फुटणं ही समस्याही हमखास सतावते. यासाठी टिप्स :

* साय आणि मध हा उत्तम उपाय

*गायीच्या तुपापासून तयार केलेलं शतधौत घृत वापरावे

हे लक्षात ठेवा

* मौखिक आरोग्यासाठी त्रिफळा काढ्यात समप्रमाण तीळाचं तेल घालून गुळणी केल्यास दातांचं आणि हिरड्यांचं आरोग्य सुधारतं.

* केसांच्या मुळांना माका, ब्राह्माी, जटामांझी, गोकर्ण, वडाच्या पारंब्या, जास्वंद आदींचा अर्क असलेल्या तेलाने मसाज करावा.

* कोंड्यासाठी औषधी काढ्यासहीत ताकाची शिरोधार उपयुक्त

* तळपायांच्या भेगांसाठी शतघौत घृत वापरावं

…….

* थंडीच्या दिवसांत शरीराचं तापमान गरम राखण्यासाठी आहारातून कॅलरीजचं प्रमाण वाढवायला हवं. यासाठी आलं, लसूण, मिरी यांचा वापर थोडा अधिक करायला हवा.

* कान आणि डोकं झाकणारी टोपी घालून शरीराला थंड हवा लागणार नाही, याची काळजी घ्या.

* खूप थंडी असल्यास स्वेटर, ब्लँकेट, बंडी वापरा.

* या दिवसांत स्किन टॅन होण्यापासून वाचवण्यासाठी टोमॅटो ज्यूस दिवसातून दोनदा घ्या. तसंच कच्चे टोमॅटो खाता येतील. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. तसंच संत्र खा.

* तुमचं वय 35हून अधिक असेल, तर फूट फेस पॅक लावा. यासाठी पिकलेल्या पपईचा गर, मध, व्हिटॅमिन ‘ई’ची कॅप्सूल, दूध आणि ग्लिसरीनचे काही थेंब एकत्र करून पॅक बनवा. या पॅकमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल.

* पायांना भेगा पडलेल्या असल्यास बाहेर जाताना सॉक्स घाला. रोज रात्री झोपण्यापूवीर् पाय साबणाने स्वच्छ धुवा. पायांना व्हॅसलीन आणि ग्लिसरीन लावा. झोपताना पायात कॉटन सॉक्स घाला.

* रोजच्या रोज आंघोळ करा. आंघोळ करताना पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि तुळशीची पानं टाका. यामुळे त्वचा चमकदार होईल.

Leave a Reply