लांब केसांच्या लेटेस्ट स्टाइल्स

लांब केसांच्या लेटेस्ट स्टाइल्स

 

लांब केस म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेला एक अनमोल नजराणा असून त्याची निगा राखणं हे आपल्या हातात असतं. ती राखताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चांगल्या आयुवेर्दिक तेलाने केसांना मसाज करणं. नंतर ते तेल रात्रभर केसांमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी चांगल्या शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत. असं आठवड्यातून तीन वेळा नियमितपणे केलं तर हा नैसगिर्क ठेवा उत्तमरित्या जोपासता येऊ शकतो. लांब केस मेण्टेन करण्यासाठी खास वेळ काढावा लागतो असं बऱ्याच जणींचं म्हणणं असतं. परंतु केस लांब असो वा लहान, त्यांची निगा ही राखायलाच हवी. लांब केसांसाठी १०-१५ मिनिटं जरा जास्त देऊन तुम्हाला ते व्यवस्थित मेण्टेन करता येऊ शकतात. अर्थात जर तुम्ही ठरवलं तरच ते शक्य आहे.

पाटीर्, लग्न किंवा इतर महत्त्वाचे समारंभ आपल्या जीवनात वारंवार येतच असतात. अशावेळी व्यक्तिमत्त्वात भर घालण्यासाठी केसांची नीटनेटकी रचना करणं आवश्यक असतं आणि ती गरज छान हेअरस्टाइलच पूर्ण करू शकते. कोणतीही स्टाइल करण्याआधी केस स्वच्छ धुवावेत. त्यात तेल अजिबात राहू देऊ नये. लांब केस मोकळे सोडण्याची स्टाइल करायची असल्यास आणि केस सरळ असल्यास त्यांना ब्लो ड्राय करावं. वेव्ही असल्यास आणि तुम्हाला स्ट्रेट हवे असल्यास आयनिर्ंग करावं. सरळ केस असतील आणि त्यांना बाऊण्सी वेव्हव्ज हव्या असल्यास रोलर्सच्या मदतीने तो लूक शक्य आहे. तर या आहेत लांब केसांच्या काही खास स्टाइल्स…

हेअर स्टाइल अधिक उठावदार दिसण्यासाठी पूवीर् खऱ्या फुलांचा आणि मोठ्या ब्रोचेस वापर केला जायचा. पण आता ते आऊटडेटेड झालं असून आता डायमण्ड किंवा कुंदनचे ब्रोचेस वापरण्याचा ट्रेण्ड आला आहे. गोल्ड, सिल्व्हर किंवा कलर्ड बिड्स हेअरस्टाइलची शोभा अधिक वाढवतात. केसांच्या या सर्व स्टाइल्स कोणत्याही समारंभात करता येण्यासारख्या असून त्या कुठल्याही पेहरावावर उठून दिसणाऱ्या आहेत.

Leave a Reply