For dark black hair – काळ्याभोर केसांसाठी

hair-cair

हल्ली ऐन तारुण्यात केस पांढरे होण्याची समस्या अनेक मुला-मुलींमध्ये दिसून येते. सुंदर दिसायचं असेल तर चेहऱ्याबरोबरच केसांची काळजी घेणंही तितकंच मस्ट आहे. कारण काळेभोर आणि लांबसडक केस हे सुंदरतेचं लक्षण मानलं जातं. म्हणूनच तुमच्या केसांची काळजी कशी घ्याल त्याविषयी…

सुंदर दिसण्यासाठी, व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी चेहऱ्याप्रमाणे केसांनाही विशेष महत्व आहे. काळेभोर, लांबसडक केस हे सौंदर्याचं लक्षण आहे. केसांचं सौंदर्य टिकून राहण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे तेल, शँपू, कंडिशनर, हेअर मास्क, सिरम उपलब्ध आहेत आणि ते सर्रास वापरलेही जातात. या आशेवर, की माझे केस चांगले राहतील आणि लवकर पांढरे होणार नाहीत.

केस पांढरे होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वय झाल्यावर आपोआपच काळ्या केसांचं रूपांतर पांढऱ्या केसात होऊ लागतं. सध्या मात्र केस पांढरे होणं, ही एक मोठी समस्या झाली आहे. शाळेत जाणाऱ्या पाचवी-सहावीतल्या मुलामुलींना आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांनाही ही समस्या भेडसावू लागली आहे. अगदी तारुण्यात, म्हणजे वयाच्या २०व्या वर्षीसुद्धा केस पांढरे व्हायचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे बदललेली जीवनशैली आणि निसर्गापासून दूर जाणं. पूर्वीच्या काळी विविध वनस्पतींपासून केसांसाठी लेप, तेल, तयार केले जायचे. कालांतरानं स्त्रिया शिकेकाई-रिठा वापरून केस धुवायला लागल्या. त्यानंतर शिकेकाईचा साबण निघाला, तर सध्या खूप आकर्षित करणारे शॅम्पू निघाले आहेत. ते दैनंदिन जीवनातील आवश्यक गरजही बनले आहेत.

केसांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या पेशंट्सना शिकेकाई वापरण्यास सांगितलं, तर त्यांना ते एकदम कालबाह्य वाटू लागतं आणि त्यासाठी लागणारी मेहनतही नकोशी वाटते.

केसांचं आरोग्य बरेच दिवस टिकवायचं असेल, तर त्याला नैसर्गिक वनस्पतींशिवाय पर्याय नाही. ही आवड लहानपणापासून लागणं आवश्यक असतं. याच वयात जर त्याचं महत्व समजलं आणि सवय लागली, की कोणत्याही जाहिरातींचा परिणाम मुलींवर होणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे.

त्यामुळे जर ही समस्या भेडसावत असेल तर प्रथम डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार सुरू करावेत, तसंच आपल्या जीवनशैलीत आवश्यक बदल करावा.

*केस पांढरे होण्याची कारणं

अनुवांशिकता

अयोग्य आहार

हार्मोनल बदल

कॉम्बिफ्लेम, अॅस्पिरिन यांसारख्या औषधांचा अतिवापर

डाय, शॅम्पू, केमिकल्सचा अतिवापर

जास्त उन्हात फिरणं

धूम्रपान, मद्यपान

मानसिक ताण, मानसिक धक्का

केसांत खूप घाम येणं

अति गरम पाण्यानं केस धुणं

*उपाय काय?

केस शिकेकाई-रिठ्यानं धुवावेत.

हेडमसाज करण्यासाठी माका, आवळा, जास्वंदयुक्त तेल वापरावं.

आवळ्याची पेस्ट केसांना लावून अर्ध्या तासानं केस पाण्यानं धुवावेत.

रात्री लोखंडाच्या कढईत त्रिफळा भिजवून दुसऱ्या दिवशी लेप लावून दोन तासांनंतर केस धुवावेत.

केस थंड, कोमट पाण्याने (ऋतूनुसार) धुवावेत.

गुलकंद, मोरावळा खावा

आहारात दूध, तूप, मनुका, खजूर, गाजर, हिरवे- मूग, आवळा, कडधान्य यांचा समावेश करावा.

Leave a Reply