निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकून राहण्यासाठी तसेच व्याधीग्रस्त रुग्णाचा आजार नष्ट करण्यासाठी आयुवेर्द पंचकर्म चिकित्सा केली जाते. पंचकर्माच्या उपचाराची लहान आवृत्ती अर्थात पंचकर्मातील उपकर्म केल्याने क्षणात आराम मिळतो. दिनचयेर्तील कर्णपुरण (कानात कोमट तेल सोडणं), नासापुरण (नाकात तुप टाकणं), गंडुष (औषधी दव्याच्या गुळण्या करणं), डोक्याला तेल जिरवणं (शिरोभ्यंग) इ. क्रियांचाही उपकर्मात समावेश होतो. असेच काही प्रमुख उपकर्म…
शिरोधारा :-
आयुवेर्द उपचाराची माहिती अथवा जाहिरात बघितल्यास शिरोधाराचे छायाचित्र हमखास लावलेले दिसते. स्त्री अथवा पुरुष व्यक्तीला सपाट जागी झोपायला लावून कपाळावर (भ्रुमध्यावर) औषधीसिद्ध दव्य किंवा तेलाची धार ठराविक अंतरापासून सतत पडत राहण्याला शिरोधारा म्हणता येते. अभिषेक पात्राच्या आकाराचे सुवर्ण, रजत किंवा मातीचे विशिष्ट आकाराचे पात्र बनवून त्याच्या बुडाला छिद ठेवून आतील दव्याची धार कपाळावर सतत साधारणत: ३ ते ४ इंच अंतरावरुन सोडली जाते. विशिष्ट शयनविधी अवस्था व कपाळावर पट्टी लावूनच सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान, ऊन नसताना शिरोधारा करण्याचे संकेत आहेत. वात व कफ दोषांसाठी तिळतेल व पित्त विकारासाठी घृताचा वापर केला जातो. व्यवहारात मात्र चंदनबलालाक्षादी तेल, धान्वंतर तेल, क्षीरबला तेल, यष्टीमधू स्नेह वापरला जातो. साधारणत: २० ते ४० मिनिटांपर्यंत शिरोधारा केली जाते.
याशिवाय तक्रधारा हा उपक्रम केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, तसेच मूत्र, हृदयविकार, हायपायास भेगा पडणे इ. आजारात तात्काळ फायदा देणारा असतो. मुरुता व आवळा चुर्णाचे विरजण लावून बनलेल्या दह्याच्या ताकासोबत आवळ्याच्या काढ्याने धारा करतात म्हणून त्याला तक्रधारा (बटरमिल्क) म्हणतात.
धारा केल्याने वाचा व मन स्थिर होते. शरीरबल, ओज वाढते. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मानसिक तणाव कमी होत असल्याने शब्दात न मांडता येणारे आत्मिक शांती, समाधान प्राप्ती होते. स्वरात गोडवा, मैथुन कर्मात आनंद मिळतो, शरीराची अतिरिक्त उष्णता कमी होते, शांत झोप येते. आजच्या तणावयुक्त वातावरणात प्रत्येकाने शिरोधाराचा अनुभव घ्यायलाच हवा असा असतो.
आयुवेर्दात याशिवाय डोक्याच्या काळजीच्या दृष्टीने शिरोबस्ती, शिरोपिचू, शिरोभ्यंग असे उपकर्म सूचविले आहेत.
नेत्रतर्पण :-
सकाळच्या वेळी निवांत स्थानी झोपून डोळ्याभोवती उडीद व यवाचे पीठ भिजवून तयार केलेले पाळे ठेवून त्यात औषधी घृत सोडण्याला नेत्रतर्पण किंवा नेत्रबस्ती म्हणतात. डोळे औषधात पूर्णपणे बुडतील एवढे दव्य असावे. या काळात पापण्यांची उघडझाप सुरू ठेवावी. हे कर्म ठराविक वेळेपर्यंत केले जाते.
नेत्रबस्ती केल्याने डोळ्यांची प्रकाश सहन करण्याची क्षमता वाढते. चष्म्याचा नंबर नियंत्रणा येतो. आजकाल अनेकांत दिसणाऱ्या ‘कम्प्युटर विजन सिण्ड्रोम’मुळे डोळ्यांना येणारा कोरडेपणा, डोळ्यांवरचा ताण हे त्रास पूर्णपणे बरे होतात. मोतीबिंदू व काचबिंदूचाही प्रतिबंध या उपचार पद्धतीतून करता येतो. नेत्रतर्पणानंतर उन्हाकडे बघणे टाळावे, आकाशाकडे टक लावून बघू नये. धमुपान (नाकाने औषधी धूर ओढणे) करावे.
कटिबस्ती :-
विविध मणक्यांच्या विकारात (स्पॉण्डिलायसिस, मणक्यांतील गॅप) यावर अनेक उपचार करुनही फारसा लाभ न झाल्याचा अनुभव अनेक रुग्णांच्या पदरी असतो. अशा अवस्थेत दुखणाऱ्या भागाभोवती उडीदाच्या पीठाचे पाळे करुन त्यात औषधी जिरवून नंतर स्वेदन केल्यास क्षणात दुखणे कमी होते.
जानूबस्ती :-
गुडघ्याची विकृती (जसे सांधेदुखी, सुज, झिज होणे, आवाज येणे) यात ‘टोटल नी रिप्लेसमेण्ट’ सांगितले असतानासुद्धा अशा रुग्णांत जानूबस्तीचा चांगला लाभ होतो.
हृदयबस्ती :-
मस्क्युलर पेन, काडिर्याक पेन, छातीत धडधड, वॉल्व्हचा दोष असताना हृदयप्रदेशी तेल जिरविल्याने फायदा होतो. विशेषत: बायपास ऑपरेशननंतर पुढील अनेक त्रास हृदयवस्तीने टाळता येतात. याशिवाय विविध औषधांचे लेप अर्थात लेपन चिकित्सा, पावडर मसाज (उद्वर्तन), संवाहन इ. कर्म केल्यास अनेक असाध्य आजारांवर मात करणे शक्य होते. स्त्रियांच्या विकारात योनी धावन, धुपन, योनीपिचू इ. उपक्रम केल्याने आयुष्यभराचे आजार टाळता येतात. म्हणूनच या अनेक उपकर्मांचा वापर करण्याचे आयुवेर्दाने सूचविले आहे.