कॅन्सर बरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या केमोथेरपीमुळे दरवषीर् अनेक महिला आपले केस गमावतात . केस हे महिलांसाठी सौंदर्य असल्याने ते गमावल्यास महिलांना मानसिक धक्का बसतो , अशा महिलांना भावनिक आधार आणि त्यांचे दु : ख कमी करण्यासाठी मनस्विनी संस्थेतफेर् विग भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे .
‘ दुमिर्ळ होत असलेल्या लांबसडक केसांना प्रोत्साहन देण्यासाठी मनस्विनी संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवित असते . काही महिन्यांपूवीर् संस्थेने केस गमावलेल्या कॅन्सर पेशंट महिलांना विग देण्यास सुरवात केली असून , आतापर्यंत पुण्यासह इतर जिल्ह्यातील तीसहून अधिक महिलांना त्यांना विग भेट दिले आहेत ,’ अशी माहिती मनस्विनी संस्थेच्या प्रमुख मंजिरी भागवत यांनी ‘ मटा ‘ ला दिली .
‘ सध्या हे विग आम्ही स्वखर्चाने विकत घेऊन महिलांना भेट देत आहोत , पण यापुढील काळात महिलांना कापलेले केस गोळा करून त्यांचे विग तयार करण्याचे प्रशिक्षण आम्ही घेणार आहोत . यामुळे अधिकाधिक महिलांना आम्हाला विग देता येतील . विगचे प्रशिक्षण घेतल्यास पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात वाया जाणाऱ्या केसांचा चांगल्या कामासाठी वापर करणे शक्य होणार आहे . कॅन्सरच्या पेशंटसाठी काम करणाऱ्या संस्थांना आमच्या उपक्रमाविषयी माहिती दिली असल्याने महिला आता स्वत : हून आमच्याशी संपर्क साधत आहेत ,’ असे भागवत यांनी सांगितले .
संस्थेच्या इतर उपक्रमांची माहिती देताना त्या म्हणाल्या , ‘ हल्लीच्या स्टेप कट , ब्लंट कट , लेअर , मशरूम कटच्या जमान्यात लांबसडक काळेभोर केस असलेल्या मुली अगदीच अपवादाने पाहायला मिळतात . कॉलेज आणि नोकरीच्या धावपळीत केसांची काळजी घेणे त्यांना शक्य होत नाही . प्रदूषणामुळेही केस खराब होतात , त्यामुळे मुली केस वाढवत नाहीत . मुलींना लांब केस ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने दरवषीर् लांब आणि निरोगी केसांची स्पर्धा घेण्यात येत असून , आत्तापर्यंत सहा ते सत्तर वयोगटातील महिला यात सहभागी झाल्या आहेत .’