How to take care of hair? केसांची काळजी कशी घ्याल?

प्रदूषित वातावरण , थकवा आणि रोगांमुळे केस निस्तेज होण्याचे प्रमाण वाढले आहे . केसांची योग्य काळजी न घेणे , केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन , प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात , गळतात आणि निस्तेजही होतात . ‘ आपल्याला जगण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नाची गरज भासते त्याप्रमाणे केसांसाठीही पोषक आहाराची गरज असते .

केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा . मासे , सोया , कॉटेज चीझ आणि डाळी यांचा आहारात समावेश करावा . संत्र , पिवळी फळे आणि भाज्यांत बीटा केराटीन आढळते . बी १ , बी६ , बी १२ , सी आणि ए विटॅमिन केसांसाठी पोषक असते . शाकाहारी असणाऱ्यांनी दोन टेबलस्पून प्रोटीनयुक्त पावडरचा आहारात समावेश करावा .

केसांची काळजी घेण्यासाठी काही टीप्स

* ओले केस कधीही विंचरू नयेत .

* केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा . केस विंचरताना कमऱ्यात वाकून केस चेहऱ्यावर आणा आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरा . रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी १०० वेळा केसांत कंगवा फिरवणे आवश्यक आहे .

* शॅम्पू केल्यानंतर प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांना लावावेत .

* जोजोबा तेल , कोरफड आणि सोडीअम लॉरेथ सल्फेटयुक्त शॅम्पूने केस धुवावे . कंडिशनर लावताना कानाच्या मागील केसांपासून केसांच्या टोकापर्यंत लावावे . डोक्यावरील त्वचेला कंडिशनर लावू नये . कंडिशनरमुळे केस मजबूत , चमकदार होतात .

* केस कोरडे असताना कंडिशनर लावावे आणि कोमट पाण्याने ते धुवावे .

* केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र धुवू नयेत . त्यामुळे केसांत गुंता होवू शकतो . केस मोकळे सोडून मगच केसांना शॅम्पू लावावा व ते धुवावेत .

* केस धुतल्यानंतर केस नैसगिर्कपणे कोरडे होवू * ा . ब्लो ड्राइंग करण्याआधी केसांना कंडिशनरही लावू शकता . ( हेअर ड्राइंग मशिन कोल्ड मोडवर ठेवावी ) केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून केस कोरडे करू नयेत . डोक्याला पाच ते सात मिनिटे टॉवेल बांधावा आणि हलक्या हाताने केस पुसावेत .

* डॅन्ड्रफ , पुरळ किंवा डोक्याला खाज उठत असेल तर त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्यावा . अँटी डँन्ड्रफ लोशन रात्री लावावेत . जेणेकरून केस कोरडे होणार नाहीत . आठवड्यातून एकदा नरिशिंग कंडिशनर लावल्याने तसेच रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केस चमकदार होतात .

Leave a Reply