पांढ-या केसांची समस्या

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली सर्रास दिसून येते. काही जणांमध्ये आनुवंशिकता, तर काही जणांमध्ये पोषणअभावी आणि योग्य निगा न राखण्यामुळे ही समस्या उद्भवते. वेळेतच यावर उपचार केले, तर ही समस्या कमी होऊ शकते.

……………..

सर्वसामान्यपणे केस पांढरे होण्याची समस्या आपल्यापैकी अनेकांना भेडसावत असते. वेळी-अवेळी खाणं, केसांना योग्य पोषण न मिळणं, त्यांची निगा न राखणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अगदी कमी वयातच पांढऱ्या केसांची समस्या आढळून येते. अशा समस्येवर उपाय म्हणून हेअर कलर्सचा वापर केला जातो. पण यामुळे केसांवर रासायनिक क्रिया होते. याचा परिणाम पांढरे झालेल्या केसांबरोबरच काळ्या केसांवरही होतो आणि हे केस पांढरे होतात. अशा वेळेस कमी प्रमाणात असणारे पांढरे केस लपवण्यासाठी मेंदीचा वापर करावा. यामुळे जे केस पांढरे आहेत ते काळ्या केसांमध्ये लपून जातील. याशिवाय मेंदीचा आणखी एक उपयोग म्हणजे शरीरातील उष्णतेचं प्रमाण आटोक्यात राहतं. याचं कारण म्हणजे मेंदी ही थंड प्रवृत्तीची आहे.

केस अचानक पांढरे होत नसतात. त्याची लक्षणं अगोदर दिसू लागतात. केसांच्या त्वचेलगत ज्या रक्तवाहिन्या असतात त्या कमी कार्यशील होतात. तसंच तैलग्रंथीतील तेल बाहेर टाकण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे त्वचा रुक्ष होते. त्वचा रुक्ष झाल्यावर केसांना आवश्यक असणारं अन्न कमी पडू लागतं. त्यामुळे केस रुक्ष होऊन त्यांना फाटे फुटायला लागतात. काही वेळेस तर केस मधूनच तुटायला लागतात. केसांचा रंग अगोदर पिंगट फिका वाटायला लागतो. कारण केसांना रंग देणाऱ्या मेलॅलिनचं प्रमाण कमी होत जातं आणि केस पांढरे होऊ लागतात. हे चक्र जर वेळीच लक्षात आलं, तर पांढऱ्या केसांची समस्या बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकते.

याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपण जो शाम्पू वापरतो तो केसांना सूट होतो का, हे व्यवस्थित जाणून घ्या. कारण यातील रासायनिक दव्यं केसांना रंगकण देणाऱ्या दव्यावर परिणाम करू शकतात.

केसांची स्वच्छता हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. केसांची निगा राखण्यासाठी केस वेळोवेळी आणि योग्य प्रकारे धुणं आवश्यक आहे. केसातील कोंडा, डोक्यात येणारा घाम यासारख्या अनेक कारणांमुळे केसांच्या मुळांशी संसर्ग (इन्फेक्शन) होतं. यामुळेही केसांचं आरोग्य बिघडायला सुरुवात होते.

काही जण केसांना अजिबात तेल लावत नाहीत, तर काही जण सतत केसांना तेल लावून ठेवतात. तेल लावलेले केस दोन-तीन दिवस धुतलेच जात नाहीत. यामुळे केसांमधील चिकटपणा वाढत जातो. तेल लावलेल्या केसांवर बाहेरील धूळ, माती चिकटून बसते. यामुळे जंतूंचा प्रार्दुभाव केसांच्या त्वचेशी वाढतो आणि केसांमध्ये सतत खाज येत राहते. यामुळे केस गळण्याबरोबर पांढरेही होतात. म्हणूनच केस धुण्याच्या फक्त आदल्या रात्रीच केसांना तेल लावावं आणि सकाळी केस स्वच्छ धुऊन घ्यावेत. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं.

कोणी कितीही सांगितलं, तरीही एकदा पांढरे झालेले केस नैसगिर्करीत्या परत काळे होत नाहीत. याचं कारण काय ते शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. पण केस पांढरे होण्यापूवीर् मात्र तुम्ही यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन निगा राखलीत, तर खरंच उपयोग होतो.

केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

न केसांना तिळाच्या तेलाने व्यवस्थित मसाज द्यावा.

न केस जास्त रुक्ष असतील, तर पार्लरमध्ये जाऊन एक्स्पर्टकडून ट्रीटमेण्ट घेण्यात दिरंगाई करू नये.

न आवळ्याचा उपयोग जेवणात करावा. आवळ्यात केश्य हा गुण आहे.

न जास्वंद, माका यासारख्या वनौंषधीचा केसांसाठी उपयोग करावा.

न आहरात तिखट पदार्थ र्वज्य करावेत.

न मोड आलेलं कडधान्य कच्चंं खावं.

Leave a Reply