रोज धुवा केस बिनदिक्कत!

रोज धुवा केस बिनदिक्कत!

 

केस दररोज शॅम्पूने धुण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अर्थात प्रत्येकाचं याबाबतच मत वेगळं असेल. आपल्यापैकी काही या विचाराचे असतील की दररोज शॅम्पूने केस धुणं प्रत्यक्ष केसांसाठी आणि टाळूसाठी चांगलं नाही तर काहींच्या मते, रोज शॅम्पूने केस धुणं योग्यही असेल. त्यामुळे सर्वप्रथम केस रोज शॅम्पूने धुणं योग्य आहे की अयोग्य हे ठरवणं आवश्यक आहे. त्यानंतर शॅम्पूने केस धुण्याचं महत्त्व, टाळूबद्दलची अधिक माहिती, विविध प्रकारची उत्पादनं आणि सर्वात शेवटी काही टिप्स…

खरोखरच शॅम्पूने आपण दररोज केस धुणं योग्य असतं का?

हो. विशेषत: टाळूची त्वचा तेलकट असणाऱ्यांनी दररोज शॅम्पूने केस धुणं आवश्यक आहे. मात्र हे शॅम्पू सौम्य असणं आवश्यक आहे. केसांमधले नैसगिर्क प्रोटिन फायबर्सना या शॅम्पूमुळे धक्का पोहोचता कामा नये आणि त्याचबरोबर केस स्वच्छ करण्याचं कामही या शॅम्पूला करता आलं पाहिजे. रासायनिक घटक नसलेले शॅम्पू केसांसाठी अतिशय सौम्य असतात आणि टाळूमधल्या तैलग्रंथींमधून नैसगिर्करित्या तेल पाझरण्यास त्याने मदत केली पाहिजे, जेणेकरून केस निरोगी बनतील. दैनंदिन वापरासाठी बनवण्यात आलेला एक चांगला शॅम्पू केसांची स्वच्छता राखतो, त्यांचं पोषण करतो आणि केस नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो.

शॅम्पूने केस धुण्याचं महत्त्व

केसांमधून आपलं आरोग्य प्रतिबिंबित होत असतं. आरोग्यातला कोणताही लहानमोठा फरक लागलीच केसांमध्ये दिसतो. त्यामुळे केसांची निगा राखणं आवश्यक असतं. केसांची योग्य निगा राखणं म्हणजे केसांच्या प्रकारानुसार शॅम्पूची निवड करणं, केस योग्य पद्धतीने धुणे आणि समतोल आहार घेणं. शॅम्पूने केस धुण्याची क्रिया अत्यंत महत्त्वाची असते कारण त्यामुळे टाळू स्वच्छ राहते आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळतं ज्यामुळे केस चमकदार आणि निरोगी बनतात.

तुम्हाला आपल्या टाळूच्या त्वचेची माहिती आहे का?

ही गोष्ट प्रत्येकाला माहीत असलीच पाहिजे. केसांचा तसंच टाळूच्या त्वचेचा पोत माहीत असण्याने केसांची चांगली निगा राखता येते. एखाद्याचे केस कुरळे, गुंतलेले असू शकतात पण टाळूच्या त्वचेचं वगीर्करण सर्वसाधारण, तेलकट आणि कोरडी असं करता येईल. एकदा का टाळूच्या त्वचेचा प्रकार कळला की दररोज केस धुवायचे असल्यास कोणता शॅम्पू वापरावा, हे ठरवता येतं. कारण टाळू तेलकट असल्यास त्वचेमधून जास्तच तेल पाझरतं. केसांसाठी जी उत्पादनं वापरली जातात त्यातला काही अंश केसांमध्ये राहिल्याने कदाचित हे होऊ शकतं. इतर कारणांमध्ये- हामोर्न्समध्ये होणारे बदल, ताण किंवा वारंवार केस विंचरण्यानेही ही समस्या उभी राहू शकते. त्यामुळे केस अगदी चपचपीत दिसतात. परंतु ज्यांच्या टाळूची त्वचा तेलकट नाहीए, अशांसाठी दररोज शॅम्पूने केस धुणं योग्य ठरणार नाही. दररोज केस धुतल्याने त्यांच्या केसांमधले नैसगिर्क प्रोटिन्स निघून जातील.

टाळूची त्वचा तेलकट असणाऱ्यांनी दररोज शॅम्पूने केस धुतल्यास हरकत नसली तरी त्यांनी केसांना कंडिशनर अजिबात लावू नये. कारण अगोदरच त्यांच्या टाण्ूच्या त्वचेतून पुरेसं तेल पाझरत असतं. तरीही कंडिशनर वापरायचा झालाच तर लिव्ह-इन कंडिशनर किंवा कंडिशनरयुक्त शॅम्पू वापरू नये. तसंच कंडिशनर केवळ केसांच्या टोकाशी लावावा, मुळाशी लावू नये.

नैसगिर्क घटकयुक्त उत्पादनांचा वापर

एकदा का टाळूचा प्रकार माहीत झाला की केस आणि टाळूला साजेसा शॅम्पू निवडावा. केमिकल्सयुक्त उत्पादनं केसांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे नैसगिर्क उत्पादनंच वापरावीत. शॅम्पूतल्या नैसगिर्क घटकांमुळे केस तर स्वच्छ झालेच पाहिजेत त्याचबरोबर त्यांनी केसांना योग्य पोषणही पुरवलं पाहिजे. तसंच केसांना निरोगी बनवलं पाहिजे आणि ते सहजपणे सांभाळता आले पाहिजेत. शॅम्पू केसांसाठी सुरक्षित आणि सौम्य असावा. त्याच्या वापरामुळे केसांमधलं नैसगिर्क फायबर लुप्त होता कामा नये तसंच केसगळती रोखण्यासही त्याने मदत केली पाहिजे.

केसाच्या प्रकारांनुसार वेगवेगळे शॅम्पू उपलब्ध आहेत. केसांसाठी योग्य शॅम्पू निवडण्यासाठी तुम्हाला कदाचित थोडी शोधाशोध करावी लागेल. हे कदाचित त्रासदायकही असू शकेल, पण केसांच्या आरोग्यासाठी आपल्याला एवढे कष्ट घेणं आवश्यकच आहे.

शॅम्पू निवडताना त्यात चणे, आवळा, भृंगराज, ज्येष्ठमध, हरडा आदी घटक असावेत ज्यामुळे शॅम्पू केसांसाठी सौम्य ठरतो आणि तो दररोजही वापरता येतो. चण्यांमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात ज्यांच्यामुळे केसांना पोषण मिळतं तर आवळ्यामुळे केस मुळापासून निरोगी बनतात. या विविध घटकांमुळे केसांना चांगलं पोषण मिळून ते बळकटही बनतात. भृंगराज, बदाम आणि हरडा केसांना संसर्गापासून वाचवतात. तर मेंदीमुळे केसांना थंडावा मिळतो.

तेलकट केसांमधला अतिरिक्त तेलकटपणा काढून टाकणं तसंच मुळाशी असणाऱ्या रंध्रांपाशी जमणारी मृत त्वचा काढून ती रंध्रं मोकळी करणं हे शॅम्पू आणि कंडिशनरचं मुख्य काम आहे. केसांची रंध्रं बंद झाल्याने केस गळणं, टाळूला संसर्ग होण्यासारख्या समस्या उभ्या राहतात.

चांगल्या शॅम्पूंमध्ये केसांना आवश्यक असणाऱ्या प्रोटिन्स, खनिजं आणि जीवनसत्त्वांचं योग्य प्रमाण असतं.

तेलकट टाळूसाठी…

तेलकट टाळूची काळजी केस नियमितपणे धुण्यापर्यंतच मर्यादित नसते. त्यामध्ये आणखीही बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. त्यातली एक म्हणजे वनौषधींचा समावेश असलेल्या शॅम्पूचा वापर. त्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते. शॅम्पू लावल्यानंतर केस भरपूर पाण्याने धुणंही आवश्यक असतं. कारण शॅम्पूचा थोडा अंश जरी केसांमध्ये राहिला तरी केस तेलकट बनतात.

पुढील टिप्सचा अवलंब केल्यास केसांच्या तेलकटपणापासून मुक्ती मिळवता येते…

केस धुण्यापूवीर् ते विंचरावेत. अशाने केस धुताना तुटण्याचं प्रमाण बरंचसं कमी होतं आणि केसांच्या वाढीला चालना मिळते.

रोज केस धुवत असाल तर नैसगिर्क शॅम्पू, विशेषत: प्रोटिन शॅम्पूचा वापर करावा. हे शॅम्पू सौम्य असतात आणि ते दररोज वापरता येतात.

टाळूला शॅम्पूने मसाज करावा. मात्र हे करताना शॅम्पूचा अतिवापर टाळावा. केसांच्या लांबीप्रमाणे शॅम्पूच्या वापराचं प्रमाण ठरवावं.

शॅम्पूने मसाज करताना बोटांच्या टोकाने करावा. हा मसाज गोलाकार पद्धतीने तीन मिनिटं करावा.

शॅम्पू लावलेले केस भरपूर पाण्याने धुवावेत. अन्यथा ते तेलकट आणि निस्तेज दिसतील. केस धुण्यासाठी कोमट पाणीच वापरावं. गरम पाण्यामुळे केसांमधलं तेलाचं प्रमाण आणखी वाढतं.

तेलकट केसांना कंडिशनर वापरू नये. अशाने त्यातलं तेलाचं प्रमाण आणखी वाढेल.

केस ब्लो-ड्रायरने सुकवू नयेत.

हेअरस्टाइल शक्यतो साधी आणि छोटीच ठेवावी.

नियमितपणे केस कापल्याने ते टोकाशी दुभंगत नाहीत.

तेव्हा आता बिनदिक्कत केस धुवा… दररोज.

Leave a Reply